मोठी कोळंबी १/२ किलो
कांदे ३
लसूण १५ पाकळ्या
तिखट २ चमचे
हळद १/२ चमचा
मीठ चवी प्रमाणे
तेल २ चमचे
चिंचेचा कोळ (एका लिंबा एव्हढी चिंच पाण्यात भिजवून काढलेला घट्ट कोळ)
६-७ पाकळ्या लसून बाजूला ठेऊन बाकीचा लसूण मिक्सरमध्ये वाटून घ्यावा.
कोळंबी निवडून स्वच्छ करून; फार मोठी असेल तर त्याचे ३-३ तुकडे करून त्याला हळद, तिखट, मीठ, वाटलेला लसूण लावून बाजूला ठेवावी.
कोशे असतील तर तेही स्वच्छ धुवून त्यालाही हळद, तिखट, मीठ, वाटलेला लसूण लावून बाजूला ठेवावे. ( कोशे म्हणजे कोळंबीचे तोंड. खवय्यांना त्याचा रस फार आवडतो. शाकाहारी लोकहो क्षमस्व ! )
कांदे बारीक चिरावेत.
चिंचेचा कोळ काढून ठेवावा.
कढईत तेल तापत ठेवावे. त्यात ६-७ पाकळ्या लसूण ठेचून टाकावा. लसूण काळा झाला ( हो काळा झाला कीच ) त्यात आधी कोशे टाकावेत. चांगले परतावे.
आता त्यात कोळंबी टाकावी छान परतावी. गॅस मोठाच ठेवावा.
कोळंबीला सुटलेला रस कोरडा झाला की त्यात चिरलेला कांदा टाकावा. आता चांगले परता.
आता त्यात चिंचेचा कोळ घालावा. परत थोडे परतावे.
मग त्यात २ वाट्या पाणी घाला. उकळी आली की गॅस बारीक करून ५ मिनिटं झाकण ठेऊन शिजवावे. तयार आहे लिप्ती कोळंबी ! चला बसा जेवायला
फुलक्या, किंवा भाताबरोबर मस्त लागते. यात फक्त लसूण अन चिंच असल्याने कोळंबीचा स्वतःचा स्वाद खुप छान लागतो.
सही
सही
मस्तच पाककृती अवल. तोंपासु
मस्तच पाककृती अवल. तोंपासु
संध्याकाळी करणार. वाटलेल्या
संध्याकाळी करणार.
वाटलेल्या लसणाचं काय करायचं?
ओ ते राहिलच की लिहायचं सॉरी.
ओ ते राहिलच की लिहायचं सॉरी. अगं हळद, तिखट, मीठाबरोबर वाटलेला लसूणही लावून ठेवायचा. करते वरती बदल. धन्यवाद
कोलंबीचं लिपतं या नावाखाली
कोलंबीचं लिपतं या नावाखाली माहेरी केली जाते. यात थोडी सिमला मिर्ची घातली तरी मस्त लागते.
अजित वाडेकर आणि शिरीष
अजित वाडेकर आणि शिरीष कणेकरांचा शब्द.. लिप्ती !
मी थोडा कोळपण लावते कोलंबीला.
मी थोडा कोळपण लावते कोलंबीला.
कालवणात कोलंबी अलिप्त असते.
कालवणात कोलंबी अलिप्त असते. कोलंबी आणि कालवणाचा रस्सा वेगवेगळा राहतो. त्याउलट या दाटसर रश्श्यात ती मिसळून जाते म्हणून लिप्ती. (हा माझा शोध)
लिप्त शब्दही लिपटना = लपटणे यावरून आला असणार. माझ्या साबा बटाटे, मटार, टोमॅटोचा एक दाटसर रस्सा बनवतात त्याला लिपिटमा म्हणतात.
स्लर्र्र्र्र्प्प..मामी शोध
स्लर्र्र्र्र्प्प..मामी शोध पटतोय..:);)
पुढ्च्या वेळी ही पद्धत करून पाहणार् ... कोशे हा माझ्यासाठी नवीन शब्द...आणि त्याच्यामुळे कालवणाला मस्त चव येते ते बाकी एकदम खरय....
मागच्या आठवड्यात दाखवलेल्या
मागच्या आठवड्यात दाखवलेल्या ज्युनियर मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाच्या एका भागात या कोशांपासून आणि इतर कवचापासून प्रॉन ऑईल करण्यात आलं. http://www.masterchef.com.au/recipes/prawn-tortellini-with-sauteed-marro...
केली. मस्त. तोंडवाली आणली
केली. मस्त.
तोंडवाली आणली मुद्दाम.
दिनेशदा, नाही हं हा आमचा
दिनेशदा, नाही हं हा आमचा सीकेपी पारंपारीक शब्द
मामी छान स्पष्टीकरण
लोला, अरे वा मस्त. मला बोलवशील ना जेवायला ?
मामी लिप्ती चा अर्थ भारी
मामी लिप्ती चा अर्थ भारी आहे.
अवल, लोला -- दोन्ही रेसेपी तो.पा.सु.
मस्तच झालि ग.. आवडली
मस्तच झालि ग.. आवडली सगळ्या.ना..
thank you अवल.
वॉव.. तोंपासु.. मामी.. थांकु
वॉव.. तोंपासु..
मामी.. थांकु गा.. लिप्ती, आलिप्त्,लिपटी...
लोलाची लिप्ती पण मस्त..
प्लीज नोट.. दिनेश दा नी नेहमीचा परश्न इथे उपस्थित केला नाहीये.. कोळंबी च्या ऐवजी काय वापरायचं???
छळ
छळ मांडला...मांडला....मांडला...........छ अ अ अ ळ.... मां....ड....ला.
(No subject)
अवल, आम्ही याला भुजणं म्हणतो.
अवल, आम्ही याला भुजणं म्हणतो. यात आम्ही आले +लसुण वाटण,कोथींबीर चिरलेली आणि चिंचेऐवजी कोकम असते. किंवा कधीतरी टोमॅटो घालतो. अहाहा.. कोशे खाताना मधे गाभोळी मिळाल्यावर तर बघायलाच नको. आणि कोशे चोखतानाचा तो रस.... आठवण काढुन तोंपासु!!!!!!!!
विद्याक, आम्ही भुजणं याला
विद्याक, आम्ही भुजणं याला म्हणतो
कोशे चोखतानाचा तो रस.... आठवण काढुन तोंपासु!!!!!!!!
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!!!!!!!!!!!