तेडे

Submitted by मंजूताई on 1 June, 2012 - 05:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

तेडेसाठी - २ वाट्या तांदूळ, १ वाटी जाड पोहे, आलं, हिरवी मिरची, मीठ चवीनुसार पाव वाटी तेल
चटणी साठी - १/२ वाटी ओला नारळ, १ चमचा जिरे, ४ पाकळ्या लसूण लिंबु, मीठ लाल मिरच्या चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

तेड्या साठी तांदूळ ६ तास भिजवावे वाटण्यापूर्वी १० मि आधी त्यात पोहे टाकावे. दोन्ही एकत्र रवाळ वाटावे व आंबवण्याकरिता ठेवावे. तेडे करण्यापूर्वी त्यात मीठ आलं-मिरचीचं वाटण टाकावे. छोट्या कढईत तेल टाकून पळीभर पीठ टाकावे. झाकण ठेवावे. दुसर्‍या बाजूनेही तेल टाकून शेकून घ्यावे.
चटणीसाठीचं सगळं साहित्य एकत्र वाटून घ्यावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

काल मी ४६.३ डीग्री तापमानात एका दिवसात भिजवणे - आंबवणे प्रक्रिया केली. हा वेळ तुमच्या गावाच्या तापमानानुसार बदलू शकतो. पीठ दोश्याच्या पीठा इतके पातळ असावे.

माहितीचा स्रोत: 
मामे बहिण चित्रा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ दिनेशदा मला माहित नाही कुठला पदार्थ आहे ते. नारळ गूळ घालून गोडाचा प्रकारही करता येईल पुढच्या वेळी करुन पाहीन.