पपनस ट्रीट

Submitted by मंजूडी on 13 September, 2008 - 02:22
लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ १/२ वाटी : पपनसाचा गर
१/२ वाटी : ओलं खोबरं
१ चमचा : बारीक कापलेली हिरवी मिरची
चवीनुसार मीठ, साखर, चाट मसाला

क्रमवार पाककृती: 

पपनस सोलून त्याच्या फोडीची सालं काढून गर सुटा करून घ्यावा. पपनस हे फळ संत्र्-मोसंब्याच्या जातीचं असलं तरी त्याचा गर तुलनेने टणक असतो. आपण डाळींबाचे दाणे काढतो तसे पपनसाचे दाणे रस न गळता निघतात. दिड वाटी पपनसाच्या गरात अर्धी वाटी ओलं खोबरं, बारीक कापलेली हिरवी मिरची, मीठ, साखर आणि थोडा चाट मसाला मिसळून खाण्यास द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांसाठी प्रत्येकी एकदा
अधिक टिपा: 

फ्रिजमध्ये थंड करून खाल्ल्यास ह्याचा स्वाद अजूनच खुलतो.

हिरवी मिरची शक्यतो कमी तिखट आणि पोपटी रंगाची घ्यावी.

चाट मसाला घातला नाही तर ही ट्रीट उपासालाही चालेल.

तेला-तुपाच्या फोडणीशिवायचा हा पदार्थ आहे आणि शिवाय कुठलीही प्रक्रिया न केलेला त्यामुळे हेल्थ कॉन्शस लोकांसाठी अगदी योग्य न्याहारी ठरू शकेल.

मसाल्याच्या जेवणात कोशिंबीर म्हणूनही ही ट्रिट करता येईल.

माहितीचा स्रोत: 
माझे बाबा
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजु मस्त आहे ग रेसीपी. अमेरिकेमधे पपनस पमेलो (Pamelo) म्हणुन मिळते.
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.