डोसाकाई आवाकाई

Submitted by मेधा on 30 May, 2012 - 15:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भारतीय ग्रोसरीच्या दुकानात पिवळ्या-पांढर्‍या-तपकिरी रंगाच्या वाटोळ्या काकड्या डोसाकाई नावाने मिळतात.
२ डोसाकाई
दोन टेबलस्पून मिरची पूड
दीड-ते दोन टेबलस्पून मीठ
एक ते दीड टेबलस्पून मोहरीची अगदी बारीक पूड
पाव टी स्पून हळद
अर्धी वाटी तेल

क्रमवार पाककृती: 

डोसाकाई स्वच्छ धूऊन नीट कोरड्या करून घ्याव्यात .
मग आतला गर काढून टाकावा. काकडीचे बारीक तुकडे करावे - अर्धा सेमी आकाराचे. साल काढू नये.
एक भांड्यात मीठ , मिरचीपूड, हळद अन काकडीचे तुकडे एकत्र कालवावेत व १०-१५ मिनिटे मिश्रण तसेच ठेवावे.
काचेच्या बरणीत हे सर्व ओतावे व त्यावर अर्धी वाटी कच्चे तेल वरून ओतावे.
बरणी वर झाकण ठेवून बरणी २-३ दिवस उन्हात ठेवावी ( झाकण गच्च लावू नये आतून वाफ धरेल. ) रोज एक-दोनदा सर्व मिसळून घ्यावे.

तीन दिवसांनी लोणचे तयार. मी तरी फ्रीज मधे ठेवते .

वाढणी/प्रमाण: 
खाल त्यावर अवलंबून
अधिक टिपा: 

तेलुगुमधे आवालू म्हणजे मोहर्‍या, मोहरी घालून केलेल्या लोणच्याला आवाकाई म्हणतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मेधा Happy

डोसाकाई असे दिसतात ना? आमच्याकडची एशियन शॉपवाली नेहमी कौतुक करते, पण नक्की कसे वापरायचे हे माहित नसल्याने घेतले नव्हते, आता आणून बघतेच. ह्याचे सांबार सुद्धा करतात का?

dosakai.jpg

<<मग आतला गर काढून बारीक तुकडे करावे -

म्हण्जे गर काढून टाकायचा का ( वापरायचा नाही का ? )

ह्याचे सांबार छान करायची आमची सौंथीडियन कूक. बहुतेक हाटेलात स्वस्तात मस्त म्हणून हेच घालतात. (इति कूक)
>>>
ते खुप स्वस्त असत
घरच्या बागेत सहज पिकत म्हणे
म्हणून जास्त वापरात असतं
तिथे याची भाजी पण करतात Happy

मेधातै, थँक्स फोर दोसावकै. माझी उडी याच्या भाजीपल्याड गेलेली नाही अजून.
संपादत आहे. याला आवा-दोसकै म्हणायचं म्हणे-इति काकु. मी आजवर कधीच सांबारमध्ये टाकतांना पाहिले नाहीये. मुळात थोडी आंबट असल्याने असं लोणचं भारी लागतं. डाळीमध्येपण सहीच, पण सांबार Uhoh

तेलुगूमधे दोसकाया असा शब्द आहे ना..? Uhoh
आमच्या घरी दोसकाया म्हणतात म्हणून विचारलं..
लोणच्याला आवा म्हणतात, मोहरीला आवालू असं म्हणतात आमच्याकडे..
बाकी हे लोणचं फार दिवस टिकत नाही त्यामुळे लगेच फस्त करावं लागत.. Proud

मुंबईत याला सांबार काकडी म्हणतात. म्हणून आमच्याकडे फक्त सांबारात टाकण्यासाठी वापरतात. आता
असे करुन बघू.

सांबारात घालतात असं ऐकून होते, पण इतक्या वर्षात इथे किंवा भारतात कधी खाल्ली नव्हती .
इथे देशी ग्रोसरीमधे अगदी सुरेख ढीग दिसला म्हणून दोन घेतल्या होत्या. त्या घेतल्यावर 'अचार बन सकता है' असं म्हटलं नवर्‍याने . मग घरी विचारून केलं लोणचं -ते मस्त जमलं चक्क.
इथे मुळात भाज्या मोजक्या, त्याच त्या मिळतात. एखादी नवी भाजी वापरायला जमलं की तेव्हढीच व्हरायटी म्हणून इथे टाकली रेसिपी.