गुजराती /मारवाडी पद्धतीचे गोड लोणचे..

Submitted by सुलेखा on 30 May, 2012 - 04:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बिनरेषेची,दळदार १ किलो कैरी
मोहोरीची डाळ-३ टेबलस्पुन.
गुळ-१ वाटी [गुळाचे खडे मोडुन घ्यावा]
मेथीदाणा १ टी स्पुन.
खास लोणच्याचा हिंग पाव टी स्पुन .
हळद १ टी स्पुन.
लाल तिखट २ टेबलस्पुन.
बडीशोप १ टेबलस्पुन.
मीठ पाऊण वाटी/३ टेबलस्पुन.
जिरे १ टेबलस्पुन.
लवंगा ५ नग.
दालचीनी २ इंचाचा तुकडा.
तेल-मोहोरीचे/शेंगदाण्याचे/कनोला १ वाटी.

क्रमवार पाककृती: 

कैर्‍या धुवुन पुसुन चिरुन त्याच्या फोडी करुन घ्या.
या फोडीं एका मोठ्या पातेल्यात ठेवुन त्यावर चमचाभर मीठ व अर्धा चमचा हळद टाकुन मिश्रण चमच्याने ढवळुन ५ ते ६ तास त्यावर ताटलीने झाकुन र्ठेवा.त्यानंतर या फोडींना पाणी सुटलेले दिसेल्.आता या फोडी अलगद पिळुन एका ताटात पसरवा आणि २ तास वाळु द्या.[घरातच ताट ठेवा,उन्हात नको]त्यातील पाणी टिपले जाऊन फोडी कोरड्या होतील.
[ही प्राथमिक तयारी असली कि अर्ध्या तासात लोणचे घालता येते.
आता जिरे लवंगा व दालचीनी गरम होतील इतपत कढईत भाजुन त्याची जाडसर पुड करुन घ्या.
मोहोरीपुड फक्त एकदाच मिक्सर मधे फिरवुन घ्या.मोहोरी थोडी बारीक होईल यामुळे तयार लोणच्याचा खार मिळुन येतो.
अर्धा चमचा तेलावर मेथीदाणा व हिंग परतुन त्याची पुड करुन घ्या.तेल गरम करा.त्यात १ टी स्पुन मोहोरी व जिरे घालुन ते तडतडले कि गॅस बंद करा.त्यात हळद घाला व तेल थंड करण्यासाठी ठेवा.
आता एका पसरट भांड्यात कैरीच्या फोडी व सर्व मसाले,मीठ्,बडीशोप एकत्र करा.गुळ पसरवा.चमच्याने कालवा.वरुन थंड झालेले तेल टाका पुन्हा मिश्रण ढवळा.बरणीत भरा.७-८ दिवस रोज एकदा हे मिश्रण चमच्याने छान ढवळा.
मधुर चवीचे लोणचे तयार होईल.
आवश्यक टिपा:
कैरी च्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण असते.त्यामुळे तयार मसाल्याची चव २ दिवसांनी पाहुन त्यात गुळ अजुन हवा असेल तर टाकावा.
गुळात थोडेसेच पाणी घालुन त्याचा एकतारी पाक[गुळ विरघळेपर्यंतची स्टेप]करायचा. हा पाक थंड झाला कि इतर मसाल्याबरोबर घालायचा.लोणचे लौकर मुरते.
दालचीनी,बडीशोप व लवंगे मुळे या लोणच्याला एक वेगळी चव येते.
या मसाल्यात आवडत असेल तर १ टेबलस्पुन धणे भाजुन ते खरड मधे खरडुन घालतात.[लोणच्यात धणे मला आवडत नाहीत म्हणुन मी घातले नाहीत एकतर लोणचे खाताना ते खारात मिळुन येत नाहीत व त्यामुळे तोंडात येतात. ]
तिखटाचे प्रमाण हवे असल्यास वाढवु शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users