~ फेसबुकावर ~

Submitted by Ramesh Thombre on 29 May, 2012 - 03:59

कितीक सारे मित्र 'च्याटले' फेसबुकावर
तुझे नि माझे नित्य 'फाटले' फेसबुकावर.

गल्लीमधली पुसती सारी 'कोण पाहुणा ?'
'विश्वची माझे सगे' वाटले फेसबुकावर.

सोशल त्याचा श्वाश जाहला, जगणे झाले
झुकरबर्ग ने द्रव्य लाटले फेसबुकावर.

अण्णा, बाबा सांगत सुटले 'देश वाचवा'
दुकान त्यांनी नवे थाटले फेसबुकावर.

प्रकांड ज्ञानी सवे बैसुनी चर्चा करती
कसे कुणाचे नाक छाटले फेसबुकावर.

आम्हास अमुचे पुस्तक प्यारे, छापुन घेऊ !
कसे रमेशा शब्द बाटले फेसबुकावर ?

- रमेश ठोंबरे

गुलमोहर: 

कितीक सारे मित्र 'च्याटले' फेसबुकावर
तुझे नि माझे नित्य 'फाटले' फेसबुकावर.

गल्लीमधली पुसती सारी 'कोण पाहुणा ?'
'विश्वची माझे सगे' वाटले फेसबुकावर.

सोशल त्याचा श्वाश जाहला, जगणे झाले
झुकरबर्ग ने द्रव्य लाटले फेसबुकावर.

प्रकांड ज्ञानी सवे बैसुनी चर्चा करती
कसे कुणाचे नाक छाटले फेसबुकावर.>>>

वा वा Lol हझल आवडली

(अवांतर - शेर संपल्यावर पूर्णविराम नका देऊ, एक आपले सुचवले, कृगैन) Happy

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

क्या बात है,,,,,,,,,,!! सहीच !!

रमेशराव........... तुम्ही राव चट्कन लक्ष वेधून घेता.....
तुमची कवाफी तसाच रदीफ मीटरसाठी चपखल व बेहद आकर्षक असतात
विषय व खयालामागचा वेगळेपणा + सखोल चिंतनही लगेच जाणवते

आभार सर्वांचे

बेफिकीरजी, अहो गैरसमज कसला ?
सुरेश भटांची गझलेची बाराखडी वाचून गझल लिहिण्यास सुरवात केली आणि
तुमचा मा.बो. वरील गझल लेखनासंदार्भातील लेखातून गझलेचे बारकावे समजून घेत आहे
त्यामुळे तुमच्या सूचना अधिक महत्वाच्या आहेत आणि त्या योग्य आहेत.

वैभव राव तुमचे हि विशेष आभार !

सुंदर हझल महाराज...

<< बेफिकीरजी, अहो गैरसमज कसला ?
सुरेश भटांची गझलेची बाराखडी वाचून गझल लिहिण्यास सुरवात केली आणि
तुमचा मा.बो. वरील गझल लेखनासंदार्भातील लेखातून गझलेचे बारकावे समजून घेत आहे>>

---काय बोललात !