वर्षाविहार २०१२ - स्वयंसेवक नोंदणी

Submitted by admin on 29 May, 2012 - 02:48

गेली बरीच वर्षे सातत्याने आणि वाढत्या प्रतिसादाने चालणारा मायबोलीचा एक उपक्रम म्हणजे वर्षाविहार. पावसाळा जवळ येत चालला आहे आणि बहुतेक मायबोलीकरांना वर्षाविहाराची प्रकर्षाने आठवण येत असेल.

मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे इथे कळवा म्हणजे त्यातून ववी संयोजक मंडळ स्थापन करता येईल. या मंडळात आधी काम केलेले काही अनुभवी संयोजक असतीलच. तेव्हा तुमचा विभाग आणि कुठले काम करायला उत्सुक आहात ते इथे कळवा.

गेली ५/६ वर्षे सातत्याने आपण ववीबरोबरच टीशर्टही तयार करत होतो. यंदा या उपक्रमाला विश्रांती देण्याचे ठरवले आहे. पुढल्या वर्षीपासून हा उपक्रम जरा वेगळ्या ढंगात पुन्हा सुरू करू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाकोणाची नावे येताहेत ते आधी पाहून मग आपलं नाव द्यायचे की नाही ते ठरवणार्‍या 'चाणाक्ष' माबोकरांनी मैदानात उतरायला हरकत नाही, बरीच नावं आली आहेत Wink

आगाऊ, मनकवडा आहेस. Happy दोन दिवस वाचते आहे. चला उतरतेच मी मैदा॑नात.

मी पुणे संयोजन समितीत काम करेन. फक्त वविला येइन याची खात्री नाही. असं चालत असेल तर माझं नाव लिहा.

नील तुम्ही दिलेले कामाचे स्वरूप पाहता मला सहभाग घ्यायला नक्की आवडेल. आता तर उत्सुकता दसपटीने वाढलीये Happy

कोणाकोणाची नावे येताहेत ते आधी पाहून मग आपलं नाव द्यायचे की नाही ते ठरवणार्‍या 'चाणाक्ष' माबोकरांनी मैदानात उतरायला हरकत नाही, >>> Lol

मुंबईच्या पूर्वानुभवी संयोजकांनो (मी वगळून), ऑल द बेस्टच, बरं का... Proud

मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे

नागपुरकरांना काही वॉवच नाही Sad

स्मितू,तुम्ही संयोजनात जरी नसाल तरी वविला येऊ शकता बरं. तिथे पूर्ण वॉव आहे>>> +१
स्मितु, नागपुरकरही येउ शकतात वविला...

अरे व्वा .. वविच्या सर्व नवसंयोजकाना शुभेच्छा.. Happy
टी शर्ट बंद केल्याबद्दल धन्यवाद अ‍ॅडमीन..:)

Pages