वर्षाविहार २०१२ - स्वयंसेवक नोंदणी

Submitted by admin on 29 May, 2012 - 02:48

गेली बरीच वर्षे सातत्याने आणि वाढत्या प्रतिसादाने चालणारा मायबोलीचा एक उपक्रम म्हणजे वर्षाविहार. पावसाळा जवळ येत चालला आहे आणि बहुतेक मायबोलीकरांना वर्षाविहाराची प्रकर्षाने आठवण येत असेल.

मुंबई पुण्यामधल्या ज्या मायबोलीकरांना यंदा वर्षाविहार संयोजन समितीत काम करायला आवडेल त्यांनी आपली नावे इथे कळवा म्हणजे त्यातून ववी संयोजक मंडळ स्थापन करता येईल. या मंडळात आधी काम केलेले काही अनुभवी संयोजक असतीलच. तेव्हा तुमचा विभाग आणि कुठले काम करायला उत्सुक आहात ते इथे कळवा.

गेली ५/६ वर्षे सातत्याने आपण ववीबरोबरच टीशर्टही तयार करत होतो. यंदा या उपक्रमाला विश्रांती देण्याचे ठरवले आहे. पुढल्या वर्षीपासून हा उपक्रम जरा वेगळ्या ढंगात पुन्हा सुरू करू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खुप उत्सुकता होती हे ववि प्रकरण जाणून घ्यायची, त्यामुळे समितीत(मुंबई) काम करायला आवडेल. पुर्वानुभव काहीच नाही.

अरे घारु मला काय सांगतोस ?
तु सगळ्यात जुना जाणता संयोजक .. तु आम्हा सगळ्यांना मार्गदर्शनाच काम केल पाहिजेस.

विनय अनुमोदन. Happy

निंबे तु संयोजनात म्हणजे आपसूकच मोदक आणि चिरंजीव पण आलेच... >> Lol

टोकूरिका, हे वविप्रकरण जाणून घ्याच तुम्ही... भारी आहे Happy

लले धीर देत्येस का घाबरवत्येस ? >>> Biggrin

टोके, मी पण संयोजनात नवीन गं. काळजी करु नको. बाकी आधीच्या वव्यांचे वृ. वाच. ववि प्रकरण आपोआप कळेल Happy

नवथर, बावरलेल्या नववविहीत तरूण तरूणीं >>>> मामी या शब्दांच्या अर्थाकरता आपण च मार्गदर्शन करावे....

विनय Biggrin

विनय,
स्वागत समारंभच ठेवला असता पण त्याला वेळ कुठे असतो....

टोकुरिका
ववि संयोजनात दोन भाग पडतात,
एक म्हणजे मुख्य ववि संयोजन - ज्यात बाफवर पोस्ट टाकणे, विचारल्या गेलेल्या शंकांना उत्तरे देणे, वविसाठी स्पॉट शोधणे, स्पॉट ठरल्यानंतर तेथील सर्व अरेंजमेंट्स बघणे, वविची नोंदणी करणे, पैसे गोळा करणे, नोंदणी झालेल्या सर्व मायबोलिकरांच्या संपर्कात राहणे इत्यादी.

दुसरा भाग म्हणजे सांस्कृतिक समिती संयोजन - यात वविच्या दिवशी जे काही खेळ, स्पर्धा आयोजण्यात येतात त्या ठरवणे, त्यासाठी लागाणारी बक्षीसे विकत घेणे, इत्यादी...

संयोजक ठरले की सर्वांची एक मिटिंग होइलच त्यात विस्ताराने सर्व गोष्टी कळ्तीलच...

नवीन होउ इच्छिणार्‍या संयोजक...>>>विनय,तू नविन होऊ इच्छिणारा संयोजक आहेस? :).

पुण्यातल्या इच्छुक संयोजकांना जर काही मार्गदर्शन हवे असेल तर मी ते करू शकेन.

@_नील_- वरच्या यादीत, 'ववि झाल्यानंतरच्या कवित्वाला खमकेपणाने तोंड देणे' हे राहिले Proud
रच्याकने, ववि साधारणपणे कधी असेल याची माहिती मिळाली तर पुण्याच्या संयोजन समितीत जायचे ठरवता येईल.

रच्याकने, ववि साधारणपणे कधी असेल याची माहिती मिळाली तर पुण्याच्या संयोजन समितीत जायचे ठरवता येईल... >> आगाऊ,तेही संयोजकांनीच ठरवायचे असते.. :)पण शक्यतो आपण जुलै महिन्याचा तिसरा किंवा चौथा रविवार ठरवतो कारण त्यावेळी पाऊस बर्‍यापैकी असतो.(यावेळी पाचवा रविवार पण आहे :))

मयुरेश अरे मी नवीन लोकांच्या वतीने पोस्ट टाकलीये ... Happy

आगावा जुलै च्या शेवटच्या असेल रे .. तु असलास तर फार फार बर होइल ..

मला वविचा/गटग चा काहिच अनुभव नाही. पर्सनली मी कोणालाही ओळखत नाही. अपवाद मसाला प्रीमिअर. पण मला आवडेल समितीत काम करायला.
वर्षाविहार साधारण कधी असेल ?

सामी चिंता नसावी . कार्य्क्रमाची पूर्ण रुपरेशा आपल्यास कळवण्यात येइल.
आपला सहभाग स्वागतार्ह आहे.

आरे विनय, मामीसाहेब 'नव-ववि-हीत' म्हणजे ज्यांना वविच्या हिताची काळजी आहे अश्या नव्या ईच्छुकांबद्दल म्हणताहेत बहुतेक. तुम्हाला बरोब्बर फक्त सोयीचे शब्द prominantly दिसतात.

टोपी- टीशर्ट निराळ्या ढंगात करायचं म्हणताहेत ना अ‍ॅडमिन? बहुतेक पगडी आणि सदरे असं मराठमोळं करणार असतील. बायड्यासाठी पैठणीचे कुर्ती. Proud

Pages