टोमॅटोच्या रश्यातील मटण

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 May, 2012 - 02:43
लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण
३ ते ४ टोमॅटो
४ कांदे
लसुण पाकळ्या ५-६
वाटण : आल एक इंच, लसुण पाकळ्या १ गड्डा, मुठभर कोथिंबीर, पुदीना, २ मिरच्या.
हिंग अर्धा चमचा
हळद १ ते दिड चमचा
मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता)
गरम मसाला १ चमचा
मिठ २ चमचे
२ मोठे बटाटे
२ ते ३ पळ्या तेल

क्रमवार पाककृती: 

मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा.

तोपर्यंत कांदा चिरुन घ्या, लसूण पाकळ्या ठेचुन घ्या.

बटाट्याच्या मोठ्या फोडी करा.

टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या.

आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसुण पाकळ्यांची फोडणी द्या व लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा.

शिजलेल्या कांद्यावर टोमॅटोचा रस टाकुन परतवा २-३ मिनीटे शिजूद्या.

नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळा.

ह्या मिश्रणावर मटण व बटाट्याच्या फोडी टाका.

परतून त्यावर मिठ टाका व परत एकजीव करा.

रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाका. नंतर मटणाचे थोडे पाणी सुटते.

कुकरचे झाकण लावुन १५ मिनीटे शिजवत ठेवा.

वाफ गेली कि झाकण काढा. (हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:)

ही अशी तयार मटणाची वाटी.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकास १ किंवा दोन वाट्या :स्मित:
अधिक टिपा: 

टोमॅटोच्या प्युरीमुळे दाटपणा येतो. त्यामुळे सुके खोबरे घालण्याची गरज लागत नाही. कमी कटकटीचा हा प्रकार आहे.

बटाटे आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतात. पण आमच्याकडे बटाट्याशिवाय मटण कोणाला रुचत नाही Lol

हेच मटण पाणी न घालता सुके बनवू शकता.

काहींना मटण टोपातच करायला आवडते. पण कुकरमध्ये लवकर शिजते त्यामुळे वेळेची व गॅसचीही बचत होते.

माहितीचा स्रोत: 
स्वतःचे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशु मी मटण शिट्यांवर नाही मोजत. एक शिट्टी आली की गेस मिडीयम करते आणि १० मिनीटे ठेवते.

वेका पद्धत कुठली आहे माहीत नाही पण सुक्या खोबर्‍याने दिवसभर अवजड, न पचल्यासारख वाटत म्हणून मी बर्‍याचदा असे करते. केवळ खोबर नको म्हणून. आणि चव ही खुप छान लागते.

श्री नाही बटाटे तसेच राहतात म्हणूनच मोठ्या फोडी ठेवायच्या.

टोकू पिऊन टाक मग. Happy

ओह ते खोबर्^यामुळे वाटतं का तसं....इतके दिवस मला मी वाटणात खसखस (संपवायला हवी म्हणून...आता मी आणणार नाहीये) घालते काहीवेळा त्याने होतं असं मला वाटायचं.....;)

जागु ,वरच्या प्लेट मधे दोन लाल रंगाचे मसाले दिस्तायेत. त्यापैकी एक लाल तिखट आहे.. पण तो दुसरा डार्क रंगाचा?? कांदालसूण मसाला आहे का?? कि अजून दुसरा कोणता??
..
कालच स्वप्नात दक्षी ,सावजी च्या तिखट्ट मटनाचे चॉप्स चावताना दिसली व्हती!!!! Proud

जागु, मस्त रेसिपी Happy
तुझ्या रेसिपीज जेवण झाल्यावरच बघतो हल्ली. कितीदा तो कीबोर्ड पुसायचा? Proud

खूपच छान........एकदम तोंपासू......३ चमचे मसाला म्हणजे लाल मिरची पूड का?

मस्त आणी तोंपासु रेसिपी!

फोटो तर मस्तच मस्त!!

मटण कित्ती फ्रेश दिसतय.....आणी तुम्ही वेगळा खडा मसाला नाही वापरला का? काळा मसाला रेसिपी प्लीज...

इथे मिळणार्या फ्रोजन मटनला विशेष चव नसते त्यामुळे बरयाच दिवसात केले नाहीये पण हे फोटोज पाहील्यावर मात्र ऊत्साह आला आहे. सो लवकरच करीन...

सान तिखट नाही मिक्स मसाला. माझी मसाल्याची रेसिपी पण आहे. http://www.maayboli.com/node/25739

निशी आम्ही जास्त गरम मसाल्याची पुडच वापरतो मटणामध्ये.

हो भाग्यश्री फक्त चिकन कमी शिजवावे लागते.

रचना कधी येतेयस बोल.

अनिष्का, वत्सला, इब्लिस धन्स.

जागु ताई
जबरदस्त............
तुम्हला मच्छि-मटणाचि खुपच आवड दिसते.......
तुम्हि आगरी आहत का?

जागु, मस्त रेसिपी! माझ्या आईकडे असेच पण टोमॅटो न घालता करतात. खोबर्‍याचेही वाटण नसते. त्यामुळे मटणाला जाडपणा नसतो पण कांदा जास्त असल्याने खुप पातळही नसते. असा रस्सा केला की वाटीभर रश्श्यात पात़ळ पोहे घालुन आम्ही खात असु. अहाहा..काय ती चव. बघ तु पण ट्राय करुन. आईकडच्या मटणातही बटाटे नाहीतर नवलकोल काहीतरी एक असतेच.

धन्यवाद जागु! मटण आवडतं पण ते बनवायचं म्हणजे सगळी बिरबलाच्या खिचडीची गोष्ट वाटायची. हे फारच छान वाटतंय. आता धाडस करीन एकदा Happy

Pages