या वेळी असं व्हायला नको..

Submitted by विनायक उजळंबे on 26 May, 2012 - 02:51

या पावसाळयाआधी
तयारी करावी म्हणतोय थोडी..

भेगा पडल्यात थोड्या त्या बुजवून टाकाव्यात ..
नाहीतर ऐन पावसाळ्यात
पाउस भेगातून मनभर पसरतो उगाच
या वेळी असं व्हायला नको..

आपली चादर स्वप्नांची ..
ती स्वच्छ धुवून ,
कोरडी करून घ्यायला हवी ..
नाहीतर पावसाळाभर ..
तिच्या पापणीला ओली स्वप्न येतात हल्ली ..
या वेळी असं व्हायला नको..

ती छत्री आपली . .
तिचं काय काय दुरुस्त करायचं कळत नाही..
तुटल्या काडया ,
कि कापड रंगबेरंगी ?
ते करता येईल
तुझ्या माझ्या मिठया चोरट्या ,दुरुस्त होत नाहीत ..
पण तरी छत्री नीट करायला हवी ..
काळं कापड लावावं ..
कुठल्याच रंगामुळे काहीच आठवायला नको ..
या वेळी असं व्हायला नको..

खरंतर हे सगळं ..
केलं होतंच की मागच्या वेळीही !!!
पण तरी चुकार पाउस गाठतो मला!
झिरपतो अवचित कुठूनही ..!
अन मग....

ते सगळं होतं जे व्हायला नको..!
तरी दर वेळी वाटतं ...

की ...........

_विनायक
२५ मे २०१२

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या रूपात मा.बो.ला एक अफाट ताकदीचा कवी भेटलाय ....., मलाही......... हे मी नक्की सन्गू शकतो
बाकी मला काही कळत नाही!!

तुमच्या रूपात मा.बो.ला एक अफाट ताकदीचा कवी भेटलाय ....., मलाही......... हे मी नक्की सन्गू शकतो
बाकी मला काही कळत नाही!

>>>>>>

धन्यवाद
------------------------------------------------------------------------------------------------------
पावसाच्या कविता माझा विक पॉइंट

>>>>>>>>>>>>>>>
माझा Strong पॉइंट आहे . Happy

चादरीच्या पापण्या ही संकल्पना समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहोत

>>>

उत्तम .

विस्कळीतपणा कमी व्हायला हवा.

>>

प्रयत्न सुरु आहेत ..!

विनायकजी ,
आपल्या अनोख्या शैलीच्या छंदमुक्त कवितांचा मी चाहता आहेच . त्यातल्या त्यात पावसाचा त्याहूनही अधिक . पण इथे पावसावरही तुमची कविता बाजी मारून गेली आहे .

__/\__