या पावसाळयाआधी
तयारी करावी म्हणतोय थोडी..
भेगा पडल्यात थोड्या त्या बुजवून टाकाव्यात ..
नाहीतर ऐन पावसाळ्यात
पाउस भेगातून मनभर पसरतो उगाच
या वेळी असं व्हायला नको..
आपली चादर स्वप्नांची ..
ती स्वच्छ धुवून ,
कोरडी करून घ्यायला हवी ..
नाहीतर पावसाळाभर ..
तिच्या पापणीला ओली स्वप्न येतात हल्ली ..
या वेळी असं व्हायला नको..
ती छत्री आपली . .
तिचं काय काय दुरुस्त करायचं कळत नाही..
तुटल्या काडया ,
कि कापड रंगबेरंगी ?
ते करता येईल
तुझ्या माझ्या मिठया चोरट्या ,दुरुस्त होत नाहीत ..
पण तरी छत्री नीट करायला हवी ..
काळं कापड लावावं ..
कुठल्याच रंगामुळे काहीच आठवायला नको ..
या वेळी असं व्हायला नको..
खरंतर हे सगळं ..
केलं होतंच की मागच्या वेळीही !!!
पण तरी चुकार पाउस गाठतो मला!
झिरपतो अवचित कुठूनही ..!
अन मग....
ते सगळं होतं जे व्हायला नको..!
तरी दर वेळी वाटतं ...
की ...........
_विनायक
२५ मे २०१२
आवडली. पोचली. "या" ऐवजी
आवडली. पोचली.
"या" ऐवजी "ह्या" हवंय असं वाटतंय!
पावसाच्या कविता माझा विक
पावसाच्या कविता माझा विक पॉइंट. ही कवितातर सुंदरच. आवडली.
तुमच्या रूपात मा.बो.ला एक
तुमच्या रूपात मा.बो.ला एक अफाट ताकदीचा कवी भेटलाय ....., मलाही......... हे मी नक्की सन्गू शकतो
बाकी मला काही कळत नाही!!
सुंदर
सुंदर
सुंदर , तुमचा दृष्टीकोन छान
सुंदर , तुमचा दृष्टीकोन छान आहे .. लिहित राहा ...
तुमच्या रूपात मा.बो.ला एक
तुमच्या रूपात मा.बो.ला एक अफाट ताकदीचा कवी भेटलाय ....., मलाही......... हे मी नक्की सन्गू शकतो
बाकी मला काही कळत नाही!
>>>>>>
धन्यवाद
------------------------------------------------------------------------------------------------------
पावसाच्या कविता माझा विक पॉइंट
>>>>>>>>>>>>>>>
माझा Strong पॉइंट आहे .
ते सगळं होतं जे व्हायला
ते सगळं होतं जे व्हायला नको..!
तरी दर वेळी वाटतं
वेल
आवडलीच.
आवडलीच.
चादरीच्या पापण्या ही संकल्पना
चादरीच्या पापण्या ही संकल्पना समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहोत
अस्सल! पाऊस म्हटलं की दाटून
अस्सल!
पाऊस म्हटलं की दाटून येणारच..
वापरलेल्या उपमा फार सरस.. बेहद्द आवड्ल्यात!
मस्त!
मस्त!
आश्वासक लिखाण आहे.
आश्वासक लिखाण आहे. विस्कळीतपणा कमी व्हायला हवा.
कविता आवडली
कविता आवडली
चादरीच्या पापण्या ही संकल्पना
चादरीच्या पापण्या ही संकल्पना समजून घ्यायच्या प्रयत्नांत आहोत
>>>
उत्तम .
विस्कळीतपणा कमी व्हायला हवा.
>>
प्रयत्न सुरु आहेत ..!
बाकी सा-यांचे आभार !!
बाकी सा-यांचे आभार !!
वाह! मस्त उतरलंय! असा पाऊस
वाह! मस्त उतरलंय! असा पाऊस हवा-नकोसा येतोच तरीही... आणि होतंच दर वेळी ते तसं... पोहोचलंच!
विनायकजी , आपल्या अनोख्या
विनायकजी ,
आपल्या अनोख्या शैलीच्या छंदमुक्त कवितांचा मी चाहता आहेच . त्यातल्या त्यात पावसाचा त्याहूनही अधिक . पण इथे पावसावरही तुमची कविता बाजी मारून गेली आहे .
वाह अप्रतिम
वाह अप्रतिम
सुंदर सुंदर. मी मिस केली होती
सुंदर सुंदर. मी मिस केली होती ही, वर काढल्याबद्दल धन्स.
फार सुंदर!
फार सुंदर!
__/\__
__/\__
विन्या.. भारी रे एकदम..!
विन्या.. भारी रे एकदम..!
विन्या.. भारी रे एकदम..!
विन्या.. भारी रे एकदम..!
विन्या.. भारी रे एकदम..!
विन्या.. भारी रे एकदम..!
खूप सुंदर लिहिली आहे कविता
खूप सुंदर लिहिली आहे कविता .
ओघवती झाली आहे. मस्त !
छा गये विनायकराव !!
छा गये विनायकराव !!
जमलीये अगदी ....
जमलीये अगदी ....
सुंदर.. वा.. ह्या वेळी अस
सुंदर.. वा.. ह्या वेळी अस व्हायला नको...नक्किच