अचुक किनारा - (दणक्यात) गटग

Submitted by महागुरु on 15 May, 2012 - 13:22
ठिकाण/पत्ता: 
मेगा गटग विषयी चर्चा करण्यासाठी हा धागा उघडला आहे. ह्या वेळी संयुक्त गटग एल.ए. मधे असेल. गटग ला उपस्थित राहण्यासाठई सर्व मायबोलीकरांना सस्नेह आमंत्रण. आपली उपस्थिती इथे नोंदवा. ------------------------------------------------------------------------------------------------------------------
माहितीचा स्रोत: 
मायबोली
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, December 1, 2012 - 03:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बस्कु,
मी त्या वेळी एल्.ए मधे असेन किंवा नाही या बद्दल शंका आहे त्यामुळे मी नाव नोंदणीही केली नाहीये अजुन.
पण जबरी आहे रॉक शुगर.. वेटिंग एरीया पासून सगळं जबरी :).

मला पण यायचंय ह्या गटग ला. चालेल ना? मी फिनीक्स हून येणार. रार, तुझ्या गाडीत माझा रुमाल टाकू का ? अंजू, संपर्कातून मेल कर ( किंवा करते ).

१४,१५ जुलै ला यायला नक्की जमतय असं दिसलं की नावनोंदणी करते.
गुरुजी, बेकरी ची गाडी निघणार असेल तर माझा रुमाल टाकून ठेवते Happy

फिनिक्स मधुन एक गाडी जाण्याची शक्यता आहे>>> तू असणार आहेस का त्यात की डिस्ने च्या हर्बी सारखी नुसतीच गाडी जाणार आहे गटग ला? Happy

डॉनच्या डोक्यातून एक कल्पना आली आहे: सगळ्यांनी मिळून बीचवर व्हॅकेशन होम घेतले तर? काही ठिकाणी जास्त मेंबर्स करता जास्त आकार नसतो. काही ठिकाणी मिनीमम स्टे मात्र असतो. एक-दोन जवळ-जवळ कुठे मिळतात वगैरे पहावे लागेल.

मी आत्ता बिग बेअरला गेले होते, तेव्हा हेच माझ्या डोक्यात येत होते. पण अर्थातच बिग बेअर लांब व दुसर्‍या साईडला पडेल. पण त्यासारखेच काहीतरी..

हे घ्या सॅन्टा बार्बराचं एक घर.. (ते जे ढग वाटतायेत तो समुद्र आहे , घर अप हिल होतं एकदम, दरीत समुद्राचा व्ह्यु )मी देशी वेडिंग इव्हेन्ट केला होता इथे
sb.jpg

मालिबू, सॅन्टा बार्बरा छान पडेल. बेएरिआतून येणार्‍यांना वाटेत पडेल. व थोडा प्रवास वाचेल.
(डिजे, मी तो समुद्र पाहून एकदम नॉस्टॅल्जिक झाले! ४ वर्षं मालिबू जवळ राहिलेय, आता इकडे समुद्राचे 'तसे' दर्शन होत नाही..)

सशल,
इतके लोक आहेत डिव्हाइड करायला तर जमेल बहुदा, तुम्ही किती लोक जमलायेत अत्ता पर्यंत ते बघा.
मला डिटेल्स नाही माहित, आठाव्ड्याचे ३ हजार च्या आस पास होते बहुदा रेन्ट.

एम.जी. निमंत्रण मिळाले. धन्यवाद.
जमले तर नक्कीच येईन.
सध्या पळणारी बेकरी बघून छान वाटतेय. Happy

महागुरूंनी दिलेल्या दोन्ही लिंक्स पाहिल्या. आवडल्या. किती लोकं येणार त्यावर बरंच अवलंबून आहे..

किती लोकं आहेत अजुन बेएरिआत, एलए मध्ये!! नावनोंदणी करायला, आमंत्रणं पाठवूयात आता! Happy

८०० रुपये, २००० रुपये पर नाईट... जबरी. Proud
हे एन्जेकरांना सांगा... २०० च्या हॉलला आधी किती येणार याची काळजी. Light 1
(मला परवडणार नाही. :फिदी:)

Pages