"सत्यमेव जयते" - भाग २ (Child Sexual Abuse)

Submitted by आनंदयात्री on 13 May, 2012 - 06:45

दुसर्‍या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue02/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@नंदिनी, वरदा- प्रस्ताव विचाराधीन आहे!!!
चाईल्ड अ‍ॅब्युज आणि सेक्स एज्युकेशन हे वरपांगी वेगळे पण अत्यंत निगडीत विषय आहेत.

मला भाबडा म्हणून आम्ही बघा किती परिपक्व आहोत असा सुर निघत आहे वर. मी योग्य तेच प्रश्न प्रस्थापित केले आहेत. नुसती वरवर पोकळ चर्चा करुन काय फायदा ना Sad

बी, आलबेल कधीच नव्हतं. पण आता पालकांनी आणि समाजाने थोडीफार जागरुकता दाखवायला सुरुवात केल्यावर या गोष्टी 'व्हिजिबल' झाल्यात एवढंच.... 'इतकी पावलं' वगैरे उचलली गेली असती तर असा टॉक शो करायची आणि असे विषयाच्या महत्वावर शंका घेणार्‍या पोस्टी वाचायची वेळच आली नसती रे!

बी, माझ्या पोस्टीत मी तुझ्या अल्पवय आणि नको त्या गोष्टी या दोहोंचे उत्तर दिले आहे. त्यावर तुझे काय मत आहे? की ते टाळून भाबडा नी परिपकव असला त्रागाच करायचा आहे? (या वाक्यातील 'नी' हे 'आणि'चे लघुरुप आहे!!!!!!!!!!!!!!!)

अप्लवयात नको त्या गोष्टी >>> 'अल्पवय' आणि 'नको त्या गोष्टी' या दोहोंचीही व्याख्या आणि व्याप्ती पूर्णपणे बदलली आहे किंबहुना हे सर्वच अत्यंत सापेक्ष आहे हे मान्य करुनही हे एक शिक्षक म्हणून स्वानुभावाने सांगतो की परिस्थिती कधीचीच गंभीर झाली आहे.
उदा. मुलींच्या मासिकपाळीची सुरुवात होण्याचे वयच घटत चालले आहे त्यामुळे त्यासंदर्भातील सर्वच माहिती तथाकथित 'अल्पवया'तच द्यावी लागते.
माध्यमांनी केलेल्या लैंगिकतेच्या भडीमाराला तोंड द्यायचे असले तर या 'नको त्या गोष्टी' मुलांना स्पष्टपणे सांगणे अनिवार्य आहे नाहीतर परिणाम भयानक होतील, नव्हे तर ते होताना मी पाहिले आहेत.
>> आगावू, वर मी असे अनेकदा म्हंटले आहे की ही माहिती मुलांना देऊ नका असे मी म्हणत नाही आहे. तर ही माहिती कशी द्यावी? ती मुलांना कळते का? आपल्या ह्या विषयाबद्दलच्या भावना मुलांपर्यत पोचतात का? ५ ते १० वयोगटातील मुलांना हे विषय कळतात का? असे सो कॉल्ड भाबडे प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याकडे मेट्रोजमधे आणि सुशिक्षित पालकांमधे हे विषय मुलांपर्यत पोचवणे सुलभ झाले असेल.

आईवडीलांची देखरेख इतकी चोख असायला हवी की त्यांना आपल्या अपत्यासोबत कोण कसे वागत बोलत आहे ह्याची जाणिव लगेच व्हायला हवी.

या बी यांच्या वाक्यावरून आलेले ते कन्क्ल्यूजन आहे, त्यात त्यांचा अपमान करायचा हेतू नाही. त्यांच्या भाबड्या पोस्टवरून ते या बाबतीत अननुभवी आहेत असे मला वाटले म्हणून लिहिले आहे.
तरीही यात त्यांचा अपमान होतो असे त्यांना वाटले असेल तर सॉरी!

<तर ही माहिती कशी द्यावी? ती मुलांना कळते का? आपल्या ह्या विषयाबद्दलच्या भावना मुलांपर्यत पोचतात का? ५ ते १० वयोगटातील मुलांना हे विषय कळतात का<>

आमीरने कार्यक्रमाच्या शेवटी एक वर्कशॉप घेतले होते. लहान मुलांना या धोक्याबद्दल माहिती देण्याची ही शास्त्रसंमत, बहुमान्य पद्धत असावी. त्या वर्कशॉपमध्ये दिलेल्या सूचना आधीही ऐकल्या/वाचल्या होत्या.ज्या पद्धतीने त्या सूचना दिल्या त्यात मुलांच्या निरागसतेला कुठेही धक्का पोचलेला दिसला नाही.

<<आपल्याकडे मेट्रोजमधे आणि सुशिक्षित पालकांमधे हे विषय मुलांपर्यत पोचवणे सुलभ झाले असेल.>> मुळीच नाही असं काही.
तसंही खेडेगाव असो, शहर असो किंवा काहीही, मुलींना त्यांच्या आया 'गुड टच - बॅड टच' किंवा 'डूज-डोन्ट्स' शिकवतातच की प्युबर्टीच्या वेळेस. आणि आजकालची गोष्ट नाहीये ही. त्याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. तीच गोष्ट आणखी थोड्या लहान वयात मुला-मुलींना दोघांनाही त्यांच्या पातळीवर समजावून सांगायची.

आईवडीलांची देखरेख इतकी चोख असायला हवी की त्यांना आपल्या अपत्यासोबत कोण कसे वागत बोलत आहे ह्याची जाणिव लगेच व्हायला हवी >>>>>>>>>>

यात काहि भाबडे आहे किंवा बी अननुभवी आहे म्हणुन असे लिहिले आहे असे वाटत नाहि. मुले १२-१३ वर्षाची होइपर्यत आईवडीलांची देखरेख चोख असायलाच हवी. पण याचा अर्थ असा नाहि कि मुलांना याची जाणीव करुन देउ नये.

एक लक्षात आलं का, त्या कार्यक्रमाच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला तुमचा बॉडीगार्ड कोण वाटतो हे सांगितल्यावर १०० % मुलांनी वडिल म्हणून सांगितले. एकाच मुलीने वडिल्,आई, आजी,आजोबा असे म्हटले.
असं का असावं?
आणि त्याचवेळी ज्याही लोकांनी आपण आपला अ‍ॅब्यूज झाला असं घरात सांगितलं तेव्हा पहिल्यांदी आईला सांगितलंय पण त्यावर योग्य ती अ‍ॅक्शन आईकडून घेतली गेलेली नाहीये.
आपल्या समाजाला स्ट्राँग आयांची गरज आहे.

साती, हो माझ्याही ते लक्षात आलं होतं. मला वाटतं त्याचे कारण बॉडी गार्ड हा शब्द. मुलांना आपले बाबा खुप स्ट्राँग आहेत असे बर्‍याच वेळा वाटते. ( कारणे काहीही असोत) त्या बॉडीगार्ड शब्दाऐवजी बेस्ट फ्रेंड, सगळ्यात आवडती व्यक्ती, जिला सगळी सिक्रेट सांगता येतील अशी व्यक्ती असे म्हटले असते तर उत्तरे बदलली असती.

बी तो वर्कशॉप तू पाहिला आहेस का? त्यात जे सांगितलं/ दाखवलं आहे ते इथे प्री के पासून मुलांना शिकवत असतात. त्यात काही त्यांच्या निरागसतेवर वगेरे काहीही परिणाम होत नाही. त्यांना कळेल अशाच भाषेत सांगतात. डॉ. सुद्धा सांगतात आपल्यासमोरच.

एक लक्षात आलं का, त्या कार्यक्रमाच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला तुमचा बॉडीगार्ड कोण वाटतो हे सांगितल्यावर १०० % मुलांनी वडिल म्हणून सांगितले. एकाच मुलीने वडिल्,आई, आजी,आजोबा असे म्हटले.
असं का असावं?
>>>>> हा प्रश्न मलाही पडला होता. म्हणून आज हे वर्कशॉप माझ्या लेकीला दाखवलं तेव्हा त्या प्रश्नापाशी टिव्ही थांबवून तिला उत्तर विचारलं तर तिनंही डॅडी असंच सांगितलं. म्हणून मी तिला विचारलं की बये, आई तुझी बॉडीगार्ड असू शकत नाही का? तर ती अगदी सहज म्हणून गेली की अमीर खाननी "ऐसा कौन आदमी है" असं विचारलं "'औरत"" नाही म्हणाला. Happy

साती, मला पण ते जाणवले. या आधी अशाच एका वर्कशॉपची लिंक बघितली होती, कोणी मराठि डॉक्टर होते, चर्चा इंग्रजीतूनच होती बहितेक. पण माझ्या आठवणीप्रमाणे त्यात मुला-मुलींनी आई चे पण नाव घेतले होते. त्यात बहुतेक तुम्हाला सेफ वाटते, तुमचा विश्वास आहे अशी कोण व्यक्ती आहे असे विचारले होते. मी बघते कुठे लिंक मिळते का.

आमिर च्या या एपिसोड ची आयडिआ घेऊन तो मूर्ख खोटारडा शाहरुख स्वत:चं पाप लपवायला लहान मुलांचा आडोसा घेतोय.. स्टेडियम मधे गैरवर्तन का केले तर म्हणे सिक्युरिटी वॉज मनहन्ड्लिंग चिल्ड्रन.. १२ -१३ वर्षाच्या मुलींना धक्के मारत होते सिक्युरिटीचे लोक म्हणून माझा तोल सुटला म्हणे.. थापाडा.!!

<यात काहि भाबडे आहे किंवा बी अननुभवी आहे म्हणुन असे लिहिले आहे असे वाटत नाहि. मुले १२-१३ वर्षाची होइपर्यत आईवडीलांची देखरेख चोख असायलाच हवी<> जेव्हा मुला/मुलीचे काका, आजोबा मामा मुलाचे लाड करण्याच्य निमित्ताने किंव आइवडिलांच्या अनुपस्थितीत लैंगिक शोषण करत असतील तर ते पालकांच्या लक्षात येईलच असे नाही. अशा व्यक्तीबद्दल मुलेही पालकाना काही सांगू शकत नहीत. यासाठी या कार्यक्रमाची विशेष गरज आहे.

व्हा मुला/मुलीचे काका, आजोबा मामा मुलाचे लाड करण्याच्य निमित्ताने किंव आइवडिलांच्या अनुपस्थितीत लैंगिक शोषण करत असतील तर ते पालकांच्या लक्षात येईलच असे नाही >>>>> थोडी नजर सावधतेची असेल तर नक्किच लक्षात येउ शकते, स्वतःच्या मुलाच्या वर्तनातील अगदी छोटासाहि बदल आइ वडिलांच्या नजरेतुन सहसा सुटत नाहि - मुख्य म्हणजे निरागस वयातील - १०/११ वर्षापर्यतच्या!

या कार्यक्रमावर आधारित श्रोत्यांच्या बातचितीचा आकाशवाणीवरील
कार्यक्रम ऐकला. काही मनोगते :
१) मुलांनी अशा प्रकाराबद्दल पालकांना सांगितले तर याला वाचा फोडल्याने आपल्या कुटुंबाची/पाल्याची बदनामी होईल या भीतीने पालक पाल्यालाच दटावतात.
२) जसे मुलांना, तुमच्या डेंजर एरियाला कोणी हात लावत असेल तर विरोध करा असे शिकविले गेले तसेच कोणी तुम्हाला त्या व्यक्तीच्या डेंजर एरियाला हात लावायला सांगत असेल तर तेही चूकच आहे, हेही शिकवायला हवे.
हा एक अत्यंत महत्त्वाचा मुलगा सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमातून सुटला होता. लहान मुलांना कोणी मांडीवर घेऊन बसत असेल, तर त्या व्यक्तीला मुलाबद्दल खरेच प्रेम वाटते की आणखी काही हे तपासायला हवे.
३) एका महिलेने लहानपणी आपल्या पित्याकडूनच आपले शोषण झाल्याचे रडत रडत सांगितले.
४) स्कूलबस/रिक्षाने शाळेत जाणार्‍या मुलांना बसवाहक/चालकाकडून धोका असू शकतो. विशेषतः बसमधून सगळ्यात शेवटच्या थांब्यावर उतरणार्‍या मुलाला.

तिसरा भाग सुरु व्हायला अर्धा तास आहे , म्हणून थोडं विचार -विमर्श=

एका नाण्याची दुसरी बाजू पण पाहून घ्या ...
मागील रविवारी प्रसारित झालेल्या ' सत्यमेव जयते ' कार्यक्रमातील हि व्यक्ती आहे हरीश अय्यर गेली ११ वर्षे आपण बाल शोषण पिडीत असल्याचा दावा करणारी हीच व्यक्ती २९ एप्रिल २०११ च्या आय बी एन ७ वाहिनीच्या 'जिंदगी लाइव ' या कार्यक्रमात दिसला होता तेथे स्वतः ला समलैंगिक असल्याचे जाहीर करत आपल्याला समलैंगिक असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे ..
http://youtu.be/wMBmw7FMDi4
दोन वेगवेगळे शो व्यक्ती तीच पण मते भिन्न ...' सत्यमेव जयते ' कार्यक्रमाचा हेतू चांगला असला तरी च्यानेल वाल्यांचा धंदा लोकांच्या नजरेतून सुटणार नाही ...
हेच खरे सत्य ..

Pages