तोंडल्याची कोशिंबीर

Submitted by अवल on 13 May, 2012 - 05:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तोंडली १० ते १२
दाण्याचे कूट
३ हिरव्या मिरच्या
मीठ, साखर चवीप्रमाणे
दही वाटीभर
फोडणीसाठी २ चमचे तेल
अर्धा चमचा जिरे
चिमुटभर हिंग
४-५ कढिपत्त्याची पाने
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

तोंडल्याची दोन्ही बाजुची टोकं काढून ४ भाग करुन घ्यावेत.
ग्राईंडरमध्ये तोंडल्याचे तुकडे, मिरच्या भरड वाव्यात. अगदी जाडसरच ठेवावे.
आता हे कुकरमध्ये भाताप्रमाणे शिजवावे.
कुकर गार झाल्यावर त्यात दही, मीठ, साखर, कोथिंबीर, दाण्याचे कूट घालावे. वरुन जिरे, हिंग, कढिपत्त्याची फडणी द्यावी.
तयार आहे तोंडल्याची कोशिंबीर.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

काकडीच्या कोशिंबीरीसारखीच चव लागते. तोंडलीची भाजी मुलं खात नाहित, किंवा काकडी मिळत नाही तेव्हा जरुर करुन बघा

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरडलेली तोंडली
1336902933866.jpg

साहित्य
1336902966147.jpg

तोंडल्याची कोशिंबीर
1336902995959.jpg

मस्तच! Happy

मला तोंडली फार आवडतात. पण इथे ताजी मिळत नाहित आनि फ्रोझन तोंडल्यांची भाजी छान नाही लागत. आता त्यांची अशी कोशिंबीर करुन बघते Happy

छान प्रकार.
तोंडली मला पण आवडतात. बर्‍याच दिवसात खाल्ली नाहीत.
(तोंडली ठेचून ती लसूण आणि लाल मिरच्यांवर परतलेली भाजी, खास आवडती)

तोंडली भरड वाटून घेतली नाहीत तरी चालतात. देठ काढून अक्खी तोंडली शिजवायची आणि नंतर ती mash करायची . हि कोशिंबीर खूप मस्त लागते.

तोंडली भरड वाटून घेतली नाहीत तरी चालतात. देठ काढून अक्खी तोंडली शिजवायची आणि नंतर ती mash करायची . हि कोशिंबीर खूप मस्त लागते.>>> अगदी अगदी. शिजवुन मग ठेचायची. यात थोडा चाट मसाला पण टाकल्यास मस्त चव येते.

छान आहे रेसिपी!

परतलेल्या तोंडल्यांच्या कुरकुरीत काचर्‍या / चकत्या घुसळलेल्या दह्यात घालून देखील एक वेगळे तोंडीलावणे तयार होते. दह्यातील कुरकुरीत भेंडीप्रमाणे.