आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 13 May, 2012 - 02:39


Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
line.pngआई शाळेत जाते

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पुढे शिकायचे झाले तर इच्छा तिथे मार्ग हे बहुतेक वेळा खरे ठरते. असं जरी असलं तरी लग्न, मुलं झाल्यावर ही तशी जवळ असणारी शिक्षणाची वाट तशी परकी होत जाते. काही जणी मात्र लग्न, मुलं झाल्यावर सुद्धा ह्या तश्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाटेवर पाऊल टाकतात. लग्नाआधी शिकण्याचा आणि सांसारिक जबाबदार्‍या असतानाचा अनुभव हा अनेक पातळीवर वेगळा. वय वेगळं, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा, जबाबदार्‍या वेगळ्या, आजूबाजूची परिस्थिती वेगळी ...कसा घडतो ह्या वाटेवरचा प्रवास ?

कोवळ्या वयात शिकतांना जीवनाचा मुख्य प्रवाहच मुळी शिक्षण असतो. मातृत्वाची मोठी जबाबदारी पेलताना शिक्षण घेणे हे प्रवाहाविरुद्ध पोहणेही ठरु शकते. शाळा-कॉलेजातलं मुक्त आयुष्य, मित्रमैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी ह्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यांवर प्रापंचिक जबाबदार्‍यांसकट शिक्षण घेताना आपल्याला भेटतात का? मुळात त्यांची गरज/उणीव भासते कां? वय वाढल्यामुळे वाढलेला अनुभव, शहाणपण ह्यांचा अभ्यास करताना जास्त फायदा होतो का ? सहाध्यायींविषयी वाटणारी स्पर्धेची भावना कमी होते की जास्त ? मुलांचे व्याप, अभ्यास सांभाळताना वेळेचे नियोजन कसे करता ? अभ्यासासाठी मनाची एकाग्रता कशी साधता ह्यासारखे अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात.

आपल्यापैकी अनेकांना मोठेपणी शाळेत गेलेल्या 'मुली' माहित असतील. अनेक सदस्या स्वतःच संसारात पडल्यानंतर, मुले झाल्यानंतर पुन्हा 'शाळेत' गेल्या असतील. मुलाबाळांच्या साथीने अभ्यास करतानाचे, परीक्षा देतानाचे अनुभव, मोठेपणी शाळेत भेटलेले मित्रमैत्रिणी आणि एकूण आपल्या या नव्या शिक्षणाने आपल्यातच घडलेला बदल हे सगळेच जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.

ह्या धाग्यावर तुम्ही स्वतःचे अनुभव लिहू शकता. त्याचबरोबर ज्यांनी आपली बायको, आई, मुलगी, मैत्रिण किंवा ओळखीतल्या कुठल्याही आईची शिक्षणासाठीची धडपड पाहिली असेल त्यांनीही अशा आयांबद्दल लिहावे असे आम्हाला वाटते.

ह्या आया कौतुकास पात्र तर निश्चितच आहेत पण शिकण्याची इच्छा पूर्ण न करता आलेल्या एका जरी स्त्रीला ह्यातून मानसिक बळ, जिद्द मिळाली तर ह्या धाग्याचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.

वाचूया, शाळेत जाणार्‍या आईचे मनोगत किंवा शाळेत जाणार्‍या आईबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणी / अनुभव.

-संयुक्ता व्यवस्थापन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रार, मस्त वाटलं वाचून. काकुंकडे संस्कृत शिकायला येत होते मी २ वर्ष. ते दिवस आठवले. काकू कधीच चिडायच्या/रागवायच्या नाहीत. त्यांना ऑल द बेस्ट!

सगळ्यांच्या पोस्टी खूप प्रेरणादायी.
गौरी , फारच सुंदर आहेत आईनं काढलेली चित्रं. आधी डो़क्टरकम्,मग चित्रकलेचे शस्त्रशुद्ध शिक्षण! सगळ्या आयांना माझा नमस्कार--/\--

Pages