आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40

चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी

जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी

काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी

ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती

गुलमोहर: 

कुत्रीमपणे न नटलेल्या/न सजलेल्या पण अंगभूत सौंदर्याने खुललेल्या तरुणी सारखी वाटली ही गझल. Happy

जागो मोहन प्यारे.. जागो जल्दी जागो
लवकर भानावर या. चांगले काव्य रचण्याची क्षमता आहे तुमच्यात. Happy

छान

Pages