आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

Submitted by जागो मोहन प्यारे on 4 May, 2012 - 04:40

चूल आणि मूल सोडुन ती उडाली स्वामिनी
राघवामागून सीता लालुपाठी राबडी

जीवनाच्या रंगमंची खेळ रंगे रोजचा
तीसर्‍या अंकाअखेरी होइ काया नागडी

काव्य नाही सूर नाही गान आहे बेसुरे
ताल नाही भावते पण आज कोलावेरि डी

ढाळ आसू बोलतो तू भार होण्या मोकळा
आठवांची अंतरी ही रांग आहे लांबडी

बाळ दे चाहूल पोटी स्वप्न नेत्री दाटले
गोजिर्‍या पोरीस आता गोजिरी गं टोपडी

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/34734 आणि देवप्रिया वृत्ताबाबतची माहिती

गुलमोहर: 

मतला म्हणजे गझलेचा पहिला शेर.ज्याच्या दोन्ही ओळींत काफिया -रदीफ असतात. जर गझल गैर मुरद्दफ असेल तर दोन्ही ओळीत काफिया असतो.

वृत्त आणि यमक ( काफिया) ही गझलेची मिनिमम रेक्वायरमेंट आहे,

किमान ५ शेर असावेत

शेराच्या पहिल्या ओळीत प्रस्तावना व दुसर्‍या ओळीत प्रभावी समारोप असावा.

शेर प्रासादिक असावा

सहजगत्या संप्रेषित होणारा असावा.

अशी इत्यादी यादि वाढू शकते. Happy

तुम्ही दिलेल्या लिन्क मधल्या मूळ रचनेत बाराखडी असा एक काफिया आहे बघा ............तो केवळ काफिया नसून मराठी गझलेची भगवद्गीता आहे ती ..............ती वाचा ..नाही समजली तर
त्या मूळ रचनाकाराकडून (ज्या रचनेवर आपली ही रचना बेतलेली आहे असा आमचा वकूब आहे, त्या रचनाकाराकडून........ ) " गीतारहस्य" जाणून घ्यावे Wink Wink Wink

प्रेरणा म्हणजे 'त्या' गझलेवरुन शेवटी डी असणारे शब्द घेऊन शेर लिहिणे ही प्रेरणा मिळाली. तसे पाच शब्द आधी शोधले, मग त्यांच्यामागे शेर तयार केले Proud

स्वागत जामोप्या(गाववालं)

जमलीये.........

(ज्या रचनेवर आपली ही रचना बेतलेली आहे असा आमचा वकूब आहे, त्या रचनाकाराकडून........ )

"वहीम" म्हणायचंय का? Happy

स्मायली चुकला ज्ञानेश, तुम्हाला डोळा मारायचा होता, पण पार्श्वभूमी पाहून स्मितहास्याइतके साहस झाले असावे

आणखी एक शंका.. गजलेला टायटल देताना दहा ओळींपैकी कोणतीही ओळ वापरली तर चालते का? का पहिल्याच शेरातील ओळ वापरावी लागते? ओळीतील काही शब्दच किंवा एखादा शब्द शीर्षक म्हणून चालतो का?

मंदारराव, त्यांनी केलेला हा पहिलाच प्रयत्न आहे हो, पहिल्याच प्रयत्नाला खच्चीकरण करणे बरे नव्हे Wink

एक 'प्रभावित' प्रतिसाद>>

कुणाचा प्रभाव? भटसाहेबांचा की अन्य कुणाचा? Wink

rejection seems to be under control

which is why you are spending so much time on a gazal

:haahaa:

मंदार_जोशी | 4 May, 2012 - 16:23 नवीन
काँग्रेस भाजप वादाचा काही संबंध नाही. मला खरंच नाही आवडली. प्रांजळ प्रतिसाद.
>>

अहो पहिला अटेंप्ट आहे, जरा सबूरीने घ्या?

Pages