चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - ३

Submitted by गजानन on 1 May, 2012 - 13:10

बर्‍याचदा बंदिशीचे शब्द आणि त्यांचे अर्थ कळत नाहीत म्हणून हा धागा.

याआधीची चर्चा इथे आहे -
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक - १
चीजांचे शब्द आणि अर्थ : धागा क्रमांक -२

चीजांच्या पोष्टींचे दुवे :

पान १ :
पं. जसराज : राग सिंधभैरवी सूरदास भजन - ऊधौ जोग सिखावन आए
पं. जसराज : राग अहिर भैरव - वंदना करो, अर्चना करो।
पं. जसराज व पं. मणिप्रसाद : राग जोग धनाश्री - सखी मोहे मीत बता
संजीव अभ्यंकर- सूरदास भजन- मन ना भये दस-बीस - ऊधो, मन ना भये दस-बीस
पं. जसराज : राग दरबारी कानडा लक्षणगीत - ऐसी दरबारी गुनिजन गावे
पं. जसराज : राग अलहैया बिलावल - दैया कहां गये लोग
पं. जसराज : राग जयजयवंती लक्षणगीत - जय जय सिद्धी कराली
पं जसराज : कबीर भजन - उलटि जात कुल दोऊ बिसारी
पं. जसराज : कबीर भजन - रितु फागुन नियरानी हो, कोई पिया से मिलाये
उस्ताद रशीद खान : भजन - प्रभू की प्रीत जगी
बेगम परवीन सुलताना : ठुमरी मिश्र खमाज - रसिया मोहे बुलाये
विदुषी शोभा मुद्गल : रागेश्री - कह न गये सैंया
विदुषी शुभा मुद्गल : रागेश्री - आयो अत मतवारो साँवरो
विदुषी शुभा मुद्गल : राग तिलक कामोद - आवत घर आये
विदुषी गंगूबाई हनगल : राग जयजयवंती - अचल रहो राजा
विदुषी गंगूबाई हनगल : राग हिंडोल - लाल जिन कर हो माई सन बरजोरी
पं. कुमार गंधर्व : राग बागेश्री - सखी मन लागे ना
श्वेता झवेरी : राग यमन - मैं बैरागी तुमरे दरस की प्यासी / सुन सुन प्रिय
पं. तुषार दत्ता : राग बिहाग - कवन ढंग तोरा सजनी तू तो
पं. तुषार दत्त : राग बिहाग - अब हूं लालन मैंका
पं तुषार दत्त : राग जोग - बात बनावत चतुर, कर ले बिचार गुण अवगुणन को
उस्ताद आमीर खान : राग मेघ - बरखा रितु आयी
पं. सी. आर. व्यास : राग गौरी - खबरिया लेवो मोरी
पं. विनायकराव पटवर्धन : राग ललिता गौरी - यार कटारी मानु प्रेम दी

पान २:
उस्ताद आमीर खान : राग ललित - तरपत हूँ जैसे जल बिन मीन
पं. शरच्चंद्र आरोळकर : राग कामोद - जाने ना दूँगी / राग खमाज टप्पा - चाल पैछानी हम दम त्यजे
विदुषी शैला दातार : राग देस - पिय कर धर देखो
पं. काशिनाथ बोडस : राग मारु बिहाग - बेगि तुम आओ सुंदरवा
विदुषी शुभा मुद्गल : राग हमीर - चमेली फूली चंपा गुलाब
पं मल्लिकार्जुन मन्सूर : राग गौड सारंग - सैंयो मै तो रचनी घड़ी वे जमाईयाँ
उस्ताद मुबारक अली खान : राग हमीर - मैं तो लागी रे तोरे चरनवा
पं. जितेंद्र अभिषेकी : राग जोग - जाने ना देहों एरी तोहे / मोरी मधैय्या सूनी लागी री
उस्ताद विलायत हुसैन खान : राग जोग - पिहरवा को बिरमायो / घरी पल छिन कछु न सुहावे
पं. यशवंतबुवा जोशी : राग गौड मल्हार - पियारे आवो जी हो जी महाराजा
पं. के. जी. गिंडे : राग रामदासी मल्हार - माधो मुकुंद गिरिधर गोपाल /कित से आया री
पं के जी गिंडे : राग शुद्ध मल्हार - धूम धूम धूम आये
पं के जी गिंडे : राग गौड मल्हार - दादुरवा बुलाई रे बादरिया
पं. गणपती भट हसनगी : राग मधुवंती - हूँ तो तोरे कारन आये बलमा / ए री आली कोयलिया बोले
उर्मिला श्रीवास्तव : कजरी - हमके सावन में झुलनी गढ़ाई दे पिया
वि. कोयल दासगुप्ता : कजरी - बरसन लागी बदरिया सावनकी
पं परमेश्वर हेगडे (कंठसंगीत) व पं. विश्वमोहन भट्ट (मोहनवीणा) : राग पूरिया धनाश्री - पायलिया झनकार मोरी / मुश्किल करो आसान
विदुषी वीणा सहस्रबुद्धे : राग पूरिया धनाश्री - आजरा दिन डूबा
रसूलनबाई : ठुमरी - अब आँगन में मत सोवो री
रसूलन बाई : दादरा - साँवरो से मेरो मन लागी रहे (ध्वनिमुद्रण : १९६१, लाहोर.)
पं वसंतराव देशपांडे : राग मारु बिहाग - उनहीसे जाय कहूँ मोरे मन की बिथा / मैं पतिया लिख भेजी
पं. वसंतराव देशपांडे : राग बिहाग - री मा धन धन री एरी मेरो लाल
पं. जसराज : राग देस संत तुलसीदास भजन (सुन्दरकाण्ड) - भरतभाई! कपि से उरिन हम नाही
उस्ताद लताफत हुसैन खाँ : राग सूर मल्हार - घननन नननन भोर भोर भोर गरजत आये / बादरवा बरसन
पं. गजाननबुवा जोशी : राग भूप - जब मैं जानी पिया की बात / जबसे तुमिसन लागली
पं. रमेश जुळे : राग अहिरी तोडी - निसदिन ध्यान धरत हूँ / हरी हरी नाम जप ले मनवा
पं. उल्हास कशाळकर : राग बसंत - कान्हा रंगवा न डारो
पं. उल्हास कशाळकर : राग अल्हैया बिलावल - कंथा मोरी जिन जाओ री
पं. उल्हास कशाळकर : राग बसंत बहार - बरजो ना माने एरी / साँवरे सलोने मदभरे नेहा लगाये

पान ३:
पं. उल्हास कशाळकर : राग देस - घन गगन घन घुमड कीनू
पं. उल्हास कशाळकर/विदुषी किशोरीताई आमोणकर : राग पट बिहाग - धन धन मंगल गावो
पं. वसंतराव देशपांडे : राग बिहाग : हो मां धन धन रे - री मा धन धन री एरी मेरो लाल
पं रामाश्रेय झा : राग चांदनी बिहाग - आज आनंद मुख चंद्र
पं. जितेंद्र अभिषेकी : राग बिलासखानी तोडी - त्यज रे अभिमान जान गुनिजन को
शबद गुरबानी, राग तोडी - मागउ दानु ठाकुर नाम
पं. ओंकारनाथ ठाकूर : राग सुघराई कानडा - माई मोरा कंथू बिदेसू
रसूलनबाई : दादरा - पनघटवा न जाबै
पं जसराज : राग जयवंती तोडी - आज मोरी अरज सुनो सिरताज
पं जसराज : भजन - युगल वर झूलत, दे गर बाँही
बेगम परवीन सुलताना : राग पहाडी - जा जा रे कगवा
विदुषी डॉ. प्रभा अत्रे : राग भैरवी दादरा - बैरन रतियाँ नींद चुराये
बेगम परवीन सुलताना : राग मलुहा मांड - सोही देत रबसे
उस्ताद आमिर खान : राग बिहाग - कैसे सुख सोवे नीन्दरिया
उस्ताद आमिर खान : राग अडाना - झनक झनक पायल बाजे
उस्ताद मोहम्मद जुमान : ठुमरी - भूल न जाना बलमवा
विदुषी अश्विनी भिडे देशपांडे : राग देस दादरा - छा रही कारी घटा
विदुषी दिपाली नाग : भैरवी ठुमरी - हँस हँस गरवा लगा ले
जोहराबाई आग्रेवाली : राग गौड सारंग - कजरा रे प्यारी तेरे नैन सलोने
पं. शौनक अभिषेकी : राग मधु रंजनी - एरी सखी आज मोहे श्यामसो मिलायके
पं. जसराज : सूरदास भजन - सबसे उंची प्रेम सगाई
पं जसराज : सूरदास भजन - ऐसो पत्र पठायो नृप वसंत
ध्रुपद गायिका पद्मश्री असगरी बाईंवरील - माहितीपट
उस्ताद आमिर खान : राग प्रिया कल्याण - सर्मद गम-ए-इश्क बुल-हवास रा न दिहन्द
उस्ताद आमिर खान : राग भटियार - निसदिन न बिसरत मूरत मुरारी
पं. श्रीकृष्णबुवा रातंजनकर : राग नारायणी - बमना रे बिचार सगुना
पं. रसिकलाल अंधारिया : राग नंद - बारी बारी पुनि-वारी जाऊं

पान ४:
पं. कुमार गंधर्व : राग लगन गंधार - सुध ना रही मोहे, अरी वो जब देखा तोहे
पं कुमार गंधर्व : राग केदार - बैठी हूँ अकेली पिया बिन रतियाँ
पं. कुमार गंधर्व : राग भीम - पार न पायो नाद भेद को, नैंकु गोपालहिं मोकौं दै री
पं कुमार गंधर्व : राग मिश्र कल्याण होरी - बरसाना में खेलत होरी
पं. कुमार गंधर्व : राग शुद्ध मल्हार - रितु बरखाई बरसन लागी
कुमार गंधर्व : राग भैरवी तुलसीदास भजन (रामचरितमानस - बालकाण्ड) - चतुर सखीं लखि कहा बुझाई
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - अब लौं नसानी, अब न नसैहों
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - सखि नीके कै निरखि कोऊ सुठि सुंदर बटोही
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन - मुनि पद कमल बंदि दोउ भ्राता। चले लोक लोचन सुख दाता॥
पं. कुमार गंधर्व : राग मारवा - सूझो ना कछु मोहे रे
पं. कुमार गंधर्व : तुलसीदास भजन (बालकाण्ड रामचरितमानस) - थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
पं. कुमार गंधर्व : राग मारवा - मारु कवन काज कवन गत चलियो
पं. शशांक मक्तेदार : राग कोमल रिषभ आसावरी - मिलन को जिया मेरा चाहत है
पं. शशांक मक्तेदार : राग मियाँ की मल्हार, सूरदास भजन - सुमर नाम को मनही के मनमें
पं. शशांक मक्तेदार : राग शुद्ध सारंग - दिन दिन दिन आनंद करत
पं कुमार गंधर्व : राग हिंडोल - सोहे ना येरी
पं. अजय पोहनकर- बागेश्री - सखी मन लागे ना काउ जतन किया/जो हमने तुमसे बात कही
पं. अजय पोहनकर : राग बिलासखानी तोडी - घुंगरिया ठुमकत चाल चलत है/कोयलिया काहे करत पुकार
पं. अजय पोहनकर : राग सिंध भैरवी ठुमरी - सजनवा तुम क्या जानो प्रीत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरुंधती, शरण तोरे आयो री.. Happy
धागा क्र. १ वरील एक रचना, 'लट उलझी सुलझा जा बालम' चे शब्द हवे आहेत..तिथे दिलेली स्निप्स ची लिंक माझ्या यंत्रावर चालत नाहिए.
तुमचा जादुचा बटवा धुंडाळून तेवढी ही उलझन सुलझाउन टाका..
या धाग्यांवर इतकं भरभरून आहे...पण काय करणार, कधीतरी कान तृप्त झाले तरीही मन होतच नाही..
Happy

पं भीमसेन जोशी : कैसे सुख सोवे आणि लट उलझी

राग बिहाग

लट उलझी सुलझा जा बालमा
हाथों में मेहंदी लगी है मोरी |

मथे की बिन्दियाँ बिखर गयी मोरी
अपने हाथ सजा जा बालम ||

याला जोडूनच बहुदा द्रुत बंदीश गातात.

देखो मोरी रंग में भिगोये डारी
लाल लाल कर दीने मोहे नटखट
देखो मारी पिचकारी

नटखट नंद के लाल ना माने
हमरी सुने ना, मै तो उनसे हारी

०००

या लट उलझी मधे जरा वेगळा अर्थ आहे. जवळीक साधायचा तो बहाणा आहे.
मेंदीने हाथ माखलेले आहेत त्यामुळी माझी मी करु शकत नाही, असा चलाखपणा आहेच
शिवाय जवळ आल्यावर, हातासरशी बिंदी लाव.. म्हणजेच विवाह कर, असाही अर्थ आहे.

अरे वा.
बर्‍याच दिवसांनी हा धागा वर दिसला.
दिनेशदा, लट उलझीचा आतला अर्थ तुम्ही खूप छान सांगितलाय.
तुम्ही जी 'देखो मोरी रंग मे भिगोय डारी' आहे ती पं. जसराजांनी गायिलेली आहे माझ्याकडे.
कुठे डकवता येतेय का ते बघतो.

बाकी नेहमीप्रमाणे, अरुंधती रॉक्स !! Happy

वीणा सहस्रबुध्दे यानी गायलेला राग हेमंत आणि मियामल्हार, कुणाकडे आहे का? म्हणजे त्यांच्या ऋतुरंग अल्बम मधे आहेत हे राग पण, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्हीकडे हा अल्बम उपलब्ध नाही. कुणाकडे असेल तर क्रुपया सांगाल का? हा प्रश्न कुठल्या धाग्यावर विचारायच हे माहित नसल्याने इथे विचारतोय.

सुमेधाव्ही, नैनवा बरसे चे शब्द असे असावेत, ऐकताना जसे वाटतात तसे,

नैनवा बरसे,
सजनी दिन रैन, पिया बिन पल नाही चैन ||

कौन जतन कहो, पिया घर आये,
फुल बिछाऊ, मोरे अंगना ||

बर्‍याच दिवसांनी ह्या धाग्यावर काहीतरी नवीन लिहावं म्हटलं.
पं. कैवल्यकुमार गुरव- राग तिलक कामोद
ताल- द्रुत एकताल

बोल:
मोरी मोहे कल ना परत हा
अब तो करतरजगरजले समजपी मानले (शब्द काहीच नीट कळत नाहियेत Sad )
ना जानू ना जानू कैसे कीनी बरजोरी
पकर के कर बैया जकजोरी
जिया तरतरात पग डगमगात
नजरपिया बिनती करत करत बैया मै परत गयी आज |

(नजरपिया म्हणजे कोण हा शोधही लागला नाही. गूगलबाबाकडे उत्तर मिळालं नाही याचं.
कुणाला माहिती आहे का?)
मोरी मोहे मधल्या 'मोहे' च्या 'मो' वरची सम आपल्याला वेगळं दर्शन घडवते एकतालाचं.
ना जानू ना जानू- हा अंतरा म्हणजे शब्दांतला नाद-ताल, ते शब्द आपल्याबरोबर घेऊन येतात ते सूर, कैवल्यकुमारांच्या गळ्यातले सूर आणि तबल्यावरचा ताल- ह्या सगळ्याचा मेळ ऐकणार्‍याला खिळवूनच ठेवतो.
खूप दिवसांनी असं नवीन, फ्रेश असं काही तरी ऐकलं म्हणून न राहवून यूट्यूबवर व्हीडिओ डकवला आणि इथे लिंक दिली.
अकु, शब्द ऐक आणि सांग तुला काही वेगळं ऐकू येतंय का ते.
दाद- ह्यातल्या एकतालाबद्दल तुमच्याकडून काही अजून नवीन वाचायला मिळेल असं वाटतंय.

जीडी, इथे मी कुमारांच्या पिंगे ह्यांनी घेतल्या मुलाखतीतली रागांविषयीची काही माहिती पूर्ण मतं लिहू का? म्हणजे उतारेच्या उतारे नव्हे, काही वाक्यं वगैरे असं.

चैतन्यजी,
''दहावीस असती का रे मने उद्धवा
एकमात्र होते ते मी दिले माधवा ''
याच्या मुळाचा शोध मला तुमच्या 'उधो, मन ना भये दस-बीस
एक हुतो सो गयो स्याम संग- को अराधे ईस?'' मधून लागला . धन्स!

ओके जीडी, धन्यवाद. मधून मधून असं काही सापडलं तर लिहित जाईन. Happy

हे कुमारांनी म्हटलेलं..

"मालकंस, तोडी, भीमपलास हे स्वतःसिद्ध राग आहेत. हे स्वयंभू. ते तुम्ही कितीही पिसू शकता. संकेर्ण राग म्हणजे एका रागातून निघालेले दुसरे राग. उदाहरणार्थ, चंद्रकंस हा मालकंसच्या पोटातून निघालेला आहे, भीमपलासचं तसं नाही. तो स्वयंभू राग आहे."

शैलजा, अजून येऊ दे!!
ही मुलाखत कुठे ऐकता येईल काय?

भारती, मलाही ते भजन खूप आवडतं. संजीव अभ्यंकरांचा आवाज फार छान आहेच आणि ते शब्द आणि त्यांचे अर्थ तर महान आहेत.

ऑडिओ नाहीये. लेखक रवींद्र पिंगे कुमारंकडे देवासला जाऊन राहिले होते आण तेह्वा त्या दिवसांता ही मुलाखत गप्पांस्वरुपांत टप्प्याटप्यातून चालली. त्यावरच्या लेखातून हे मिळाले.

हे जबरदस्त आहे - बघा.

लालजी देसाई : जोहार मायबाप जोहार :

जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥
बहु भुकेला झालो । तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥
बहु केली आस । तुमच्या दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥

अरुंधती,
राग शंकरा तली पं.भीमसेन जींची एक बंदिश (बडा ख्याल) शोधतो आहे... सुरुवात 'महादेव...' अशी आहे.
पण पुढचे शब्द कळत नाहीयेत अजिबात....आपल्या या भन्डारात पण दिसत नाहीये.
सापडली तर ईथे टाकशील का?
धन्यवाद!!

राग देशकार मधली 'फुलवारी कटवा' कोणाकडे आहे का? तसेच याच रागातील द्रुत बंदिश 'झननान झननान बाजे' याचे ही शब्द हवे आहेत

भिमसेनांची महादेव ( बडा ख्याल) + कल ना परे ( छोटा ख्याल) शंकरात आहे.

http://www.youtube.com/watch?v=AOJnsCwi0KA

हेच का? ऑफोसात स्पीकर नाही, त्यामुळे शब्द माहीत नाहीत.

मला कल ना परे चे शब्द व अर्थ हवा आहे.

आरती अंकलीकरांची 'सुमेर साहेब सुलतान, निजामुद्दीन ओ मान लिया' ही द्रुत लयीतली बंदीश ऐकली. अजूनही कानात वाजते आहे. पण त्यांनी गाण्यापूर्वी/नंतर राग सांगितला नाही, मला ओळखता आला नाही. कोणी सांगू शकेल का याबद्दल आणखी काही? वरच्या यादीत दिसली नाही.
मी लिहिलेले शब्द मला जसे ऐकू आले तसे लिहीलेत, दुसरी ओळ 'निजामुद्दीन ओ अवलिया' अशीही असू शकेल.

सई, हे वाच / ऐक :
http://www.maayboli.com/node/26871?page=3

मालिनी राजूरकर : राग सालग वराळी : आज बधाई बाजे व सुमर साहेब सुलतान
http://www.esnips.com/doc/a58f5a19-5ae4-4327-932b-15452f5183fb/Malini-Ra...

विलंबित

आज बधाई बाजे नंद महलमों सखी
जनम लिये ब्रिजराज दुलारो

मोहनी मूरत अत मन भायी, लैहो बलैया
जुग जुग जीवो रे कृष्ण दुलारो

द्रुत

सुमर साहेब सुलताने आलमन / सुमिर साहेब सुलताने आलमन
निजामुद्दिन औलिया मन

कर याद नाम परवरदिगार
करतार जिन रच्यो संसार
वोही अप्रम्पार मन

अरे वा, थँक्स अरुंधती. या रागाचं नावही मी पहिल्यांदाच ऐकलं/ इथे वाचलं. आता ऐकते. फारच आवडली ती बंदीश.

केबलवर INSYNC नावाचे संगित चॅनेल सुरू झालय.

शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, रागावर आधारीत हिंदी चित्रपटातली गाणी, वाद्यसंगीत असे भरगच्च कार्यक्रम असतात. सादर करणारे कलाकार जूने जाणते त्याबरोबरच नवोदीत असे दोन्ही प्रकारचे असतात. मधेमधे कलाकारांचे किस्से, वाद्यांची माहिती देतात. संगितप्रेमींकरता मेजवानीच आहे. इन केबल असेल तर ४९४ क्रमांकावर दिसेल हे चॅनल. बाकीच्या नेटवर्कची कल्पना नाही.

Pages