"लेह-लडाख ट्रिप" बद्दल माहिती हवी आहे

Submitted by जिप्सी on 25 April, 2012 - 01:36

आम्ही काहि मित्र जुलै अखेरीस "लेह-लडाख"ला जाण्याचा बेत करत आहोत. खरंतर मुंबई-श्रीनगर-कारगिल-द्रास-लेह आणि लेह-मनाली-दिल्ली-मुंबई असा प्लान होता, पण सुट्ट्या आणि बजेट दोन्ही जुळत नसल्याने आंतरजालावर Make My Trip मध्ये लडाख पॅकेज पाहिले आणि आमच्या वेळेत आणि बजेटमध्ये बसत असल्याने जाण्याचा विचार आहे.
तरः
१. यापूर्वी Make My Trip तर्फे कुणी जाऊन आले आहे का?
२. असल्यास अनुभव काय?
३. एकुण पॅकेज व्यतिरीक्त Hidden Cost असते का?

हे आम्ही पाहिलेले लडाख पॅकेज
एकुण खर्च २७-३० हजार (यात दिल्ली ते लेह आणि परत असा विमानखर्च समाविष्ट आहे)

1. Round trip airfare with taxes in economy class (Delhi-Leh and Return)
2. Accommodation for 6 nights at specified hotels in Leh with attached bath
3. Stay on MAP basis (7 breakfasts and 7 dinners)
4. Transportation by non air-conditioned Qualis/ Tavera/ Scorpio/ Innova for arrival/ departure transfers
5. Assistance at the airport at the time of arrival and departure
6. Accommodation in Standard and Deluxe Category Hotels.
7. Accommodation for 1 night in Nubra Valley
8. Lunch on arrival in Leh and during Pangong Lake visits once during the stay
9. Sightseeing tours as per the itinerary (suitable vehicle will be used as per the group size)
10. Miscellaneous charges like inner-line permits, porter services at hotel and airport and all applicable luxury/ road taxes.

ह्या लिंकवर ७ रात्र आणि ८ दिवसाची Itinerary आहे:
http://www.makemytrip.com/holidays-india/7578-amazing_ladakh_from_delhi....

आम्हाला तरी हे पॅकेज चांगले वाटत आहे, पण यापूर्वी मेक माय ट्रिप बद्दल कुणाचा अनुभव असेल तर कृपया शेअर करा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनया, हो. नक्की कर. आम्ही दोघही ५५+ आहोत आणि वयानुसार येणारी इतर अनेक बंधनंही आहेत. नवर्‍याला पण विरळ हवेचा त्रास होतो.अगोदर काळजी घेतली की झालं. तुला हवं असेल तर हॉटेल वगैरे कॉन्टॅक्ट्स आणि इतर माहिती मी केव्हाही देउ शकेन. कधीही संपर्क कर.
सेनापती, तंबूची मजा खरच और.

कारगिल सोडलं की लडाखमध्ये रस्त्यावर धाबे आहेत का? सर्वसाधारणपणे तिथे खाण्याचे काय काय ऑप्शन असतात? चव कशी असते?

आम्ही २९ ऑगस्टला निघून १० सप्टेंबरला लेहवरून परत निघणार आहोत. पेंगाँग आणि मोरिरी इथेही राहण्याचा बेत आहे. सध्यातरी मी आणि माझा नवरा आम्हा दोघांचेच जाण्याचे ठरले आहे. पूर्वी केसरीने जायचा विचार केला होता. आता स्वतःची स्वतः ट्रीप प्लान करायचे ठरले आहे. त्याकाळात इतर कोणी लडाखला जाणार असेल तर कृपया संपर्कातून कळवाल का?

कारगिल सोडलं की लडाखमध्ये रस्त्यावर धाबे आहेत का? >>

हो लामायुरू मध्ये आणि लामायुरू सोडल्यावर एका ठिकाणी पंजाबी धाबा + पंक्चर दुकान रस्त्याच्या उजव्या बाजूला लागते.

त्यापुढे लेह यायच्या आधी ४० एक किमी परत चहा वगैरेची दुकानं आहेत. कारगिल ते लेह रस्ता एकदम टार रोड आहे. सुंदर रस्ता.

सर्वसाधारणपणे तिथे खाण्याचे काय काय ऑप्शन असतात? >>> सगळीकडेच दाल - राईस / मॅगी आणि थुपका मिळते. लकी असाल तर पराठे / पोळ्या पण.

वी केसरीने जायचा विचार केला होता. आता स्वतःची स्वतः ट्रीप प्लान करायचे ठरले आहे >>> स्वतःच जा. तुमचे एक्झॅट दिवस कळवा. मी तुम्हाला प्लॅन करून देईन. आणि श्रीनगर की मनाली मार्ग आधी ते ही सांगा.

लोल इतरही ठिकाणी जिथे तुला जायचे असेल तिथ जर मी गेलेलो असेल तर नक्कीच देईन.

इनफॅक्ट त्यांनी मला पाठवलेले मेल मी पाहिलेच नव्हते बराच वेळ. त्याला बेसकरून प्लान पाठवला देखील Happy
अमेरीकेत अशी ऑफर देणारं आहे का कुणी >> कुठे जायचंच सांग. मी सध्या अमेरिकेतच आहे. Happy

कुठे जायचंच सांग. >> सध्या काहीच प्लान नाही, पण आता ऑफर असेल तर ठरवायला हवा. ;).
जोक्स अपार्ट, खरंच असा तयार प्लान मिळणं फार सॉलीड आहे कारण एरवी रहायचे हॉटेल शोधा, कुठे जायचे, काय पहायचे, कुठे किती वेळ द्यायचा, काय सोडले तरी चालेल हे सर्व ठरवण्यात बराच वेळ खर्च होतो आणि तरी ऐनवेळी धाकधुक राहतेच.

hi kedar/Veal
i m also planning for same trip can u plz share plan with me.we are 4 in group.love to do kashmir and Manali with this trip.my email id - "vsuvarna.bhandari@gmail.com" .. Thanks in advance..

मी तुम्हाला प्लॅन करून देईन. >>>>अगदी अगदी वल्लरी, केदार व्यवस्थित प्लान करून देईल. आम्ही श्रीनगरहुन पॅकेज घेतले होते.

आणि श्रीनगर की मनाली मार्ग आधी ते ही सांगा.>>>>>केदार, ते श्रीनगर मार्गे जाणार आहेत आणि परत लेह ते मुंबई विमानप्रवास. मनाली मार्ग नको आहे.

Pages