आम्ही काहि मित्र जुलै अखेरीस "लेह-लडाख"ला जाण्याचा बेत करत आहोत. खरंतर मुंबई-श्रीनगर-कारगिल-द्रास-लेह आणि लेह-मनाली-दिल्ली-मुंबई असा प्लान होता, पण सुट्ट्या आणि बजेट दोन्ही जुळत नसल्याने आंतरजालावर Make My Trip मध्ये लडाख पॅकेज पाहिले आणि आमच्या वेळेत आणि बजेटमध्ये बसत असल्याने जाण्याचा विचार आहे.
तरः
१. यापूर्वी Make My Trip तर्फे कुणी जाऊन आले आहे का?
२. असल्यास अनुभव काय?
३. एकुण पॅकेज व्यतिरीक्त Hidden Cost असते का?
हे आम्ही पाहिलेले लडाख पॅकेज
एकुण खर्च २७-३० हजार (यात दिल्ली ते लेह आणि परत असा विमानखर्च समाविष्ट आहे)
1. Round trip airfare with taxes in economy class (Delhi-Leh and Return)
2. Accommodation for 6 nights at specified hotels in Leh with attached bath
3. Stay on MAP basis (7 breakfasts and 7 dinners)
4. Transportation by non air-conditioned Qualis/ Tavera/ Scorpio/ Innova for arrival/ departure transfers
5. Assistance at the airport at the time of arrival and departure
6. Accommodation in Standard and Deluxe Category Hotels.
7. Accommodation for 1 night in Nubra Valley
8. Lunch on arrival in Leh and during Pangong Lake visits once during the stay
9. Sightseeing tours as per the itinerary (suitable vehicle will be used as per the group size)
10. Miscellaneous charges like inner-line permits, porter services at hotel and airport and all applicable luxury/ road taxes.
ह्या लिंकवर ७ रात्र आणि ८ दिवसाची Itinerary आहे:
http://www.makemytrip.com/holidays-india/7578-amazing_ladakh_from_delhi....
आम्हाला तरी हे पॅकेज चांगले वाटत आहे, पण यापूर्वी मेक माय ट्रिप बद्दल कुणाचा अनुभव असेल तर कृपया शेअर करा.
नुब्रा व्हॅलीला १९९७ पासून
नुब्रा व्हॅलीला १९९७ पासून सलग दहा वर्षे गेलो होतो. अधिक माहितीसाठी विपुतून संपर्क साधावा.
जिप्स्या मस्त !! आणि मेल्या
जिप्स्या मस्त !! आणि मेल्या मेक माय ट्रिप वगैरेतून काय जातोस.. ते दिवस लग्नानंतरचे रे.. !
मेल्या मेक माय ट्रिप वगैरेतून
मेल्या मेक माय ट्रिप वगैरेतून काय जातोस.. ते दिवस लग्नानंतरचे रे.. !
>> यो... जल्ला राहिले रे...
जर अॅडव्हेंचर म्हणून ट्रीप
जर अॅडव्हेंचर म्हणून ट्रीप करायची असेल तर स्वतःच ट्रीप प्लान करावी. त्याची मजा वेगळीच. >> अगदी बरोबर...
btw मधुला चंद्रावर नेताना मात्र MMT किंवा तत्सम लुटारुंचाच सहारा घे :p
सरतेशेवटी आम्ही मेक माय
सरतेशेवटी आम्ही मेक माय ट्रीपने जायचा प्लान रद्द केला.
एकुण १५ दिवसांचा प्लान केला आहे त्यात:
२९ जुन - रात्री मुंबई ते दिल्ली "दुरांतो एक्स्प्रेसने" दिल्ली
)
३० जुन - संध्याकाळी दिल्लीत
३० जुन - रात्री "झेलम एक्सप्रेसने) जम्मु (झेलमचे तिकिट पुण्याहुन उपलब्ध नसल्याने हा द्रविडी प्राणायाम.
१ जुलै - जम्मु. तेथुन श्रीनगर.
२ जुलै - श्रीनगर (आराम)
३-४ जुलै - श्रीनगर-द्रास-कारगिल-लेह
५, ६, ७, ८, ९, १०, ११ लेह-लडाख दर्शन
१२-१३ जुलै- श्रीनगरकडे प्रस्थान
१४ जुलै- श्रीनगर (आराम)
१५ जुलै - श्रीनगर-मुंबई फ्लाईटने
अजुनही भरपूर प्रश्न आहेत. ते घेऊन लवकरच येईन.

जिप्स्या.. परतीचा मार्ग तोच
जिप्स्या.. परतीचा मार्ग तोच का घेतला आहेस? मनाली मार्गे जा की.
१२-१३ जुलै- श्रीनगरकडे प्रस्थान
१४ जुलै- श्रीनगर (आराम)
ऐवजी ह्या ३ दिवसात लेह ते चंडीगड असा प्रवास करता येइल. श्री नगर काय चंडीगड काय भाडे साधरण सारखेच पडेल..
ऐवजी ह्या ३ दिवसात लेह ते
ऐवजी ह्या ३ दिवसात लेह ते चंडीगड असा प्रवास करता येइल>>> बरोबर... कुलू मनाली करत चंदिगडला यायचे... साधारण ६-७ तासांचा प्रवास आहे. हवी असल्यास चंडीगडला रहायची सोय करू शकेन. तिथून मुंबईच्या फ्लाईट ७००० हजारात मिळू शकतात.
आज या पानाच्या वरच मेक माय
आज या पानाच्या वरच मेक माय ट्रिपची लडाख २०९९९* अशी जाहिरात दाखवित आहेत
आम्ही या साईटवरून तिकिटं बुक
आम्ही या साईटवरून तिकिटं बुक केली आहेत, त्यात काही अडचण आली नव्हती. परंतू संपूर्ण पॅकेजबद्दल काही अनुभव नाही.
जमणार नाहीये, उगाच विचारतेय. पण हो आतापासून हट्ट करतेय, फोटो लगेच टाकायचे, सविस्तर वृतांतासह 
जिप्सी, मी येऊ
काही अपरीहार्य कारणांमुळे
काही अपरीहार्य कारणांमुळे आमचा लेहलडाख बेत रद्द झाला.
(:प्रचंड मूड ऑफ झालेला बाहुला: )
श्रीनगर ते मुंबई एअरलाईन्सचे तिकिट नॉन रीफंडेबल असल्याने आम्ही आता ७ दिवसांचा श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग असा बेत करत आहोत.
या धाग्याचे शिर्षक बदलले आहे. जर कुणाला लेहलडाख ट्रिप बद्दल माहिती हवी असेल तर हा धागा उपयुक्त आहे.
आंतरजालावर पहात असताना अजुन एक साईट मिळाली. यातही लेहबद्दल व्यवस्थित माहिती आहे.
http://devilonwheels.com/index.php/tag/jammu-and-kashmir/
आम्ही पण(आमचा १५/१६ जणांचा
आम्ही पण(आमचा १५/१६ जणांचा ग्रूप) जुलैमधे केसरीबरोबर चाललोय लेह लडाखला! खूप एक्सायटेड आहे. फक्त तिथल्या विरळ हवेबद्दल जरा मनात भीति आहे. कुणी लिहिणार का इथे त्याबद्दल?
आणि मी मेकमायट्रिप वरून फक्त तिकिट बिकिंग करते. पण त्यांच्या टूरला नाही गेलेली.
>श्रीनगर ते मुंबई एअरलाईन्सचे
>श्रीनगर ते मुंबई एअरलाईन्सचे तिकिट >> किती आहे रे तिकिट? तुझी हरकत नसेल तर इथे लिहिशील का?
मानुषी, विरळ हवेचा त्रास होईल
मानुषी, विरळ हवेचा त्रास होईल थोडा. डोकं दुखणं, मळमळ, भूक नाहीशी होणं, चिडचिड ही काही लक्षणं. त्यासाठी अॅक्लमटायझेशन हाच उपाय आहे. रूममध्ये/टेन्टमध्ये बसून/झोपून न राहाता मोकळ्या हवेवर फिरणं, तसंच खाण्यावर इच्छा नसतानाही बळंच पोटात अन्न ढकलावं.
डायमॉक्स गोळी ठेवा जवळ
डायमॉक्स गोळी ठेवा जवळ मानुषी, पण तुम्हांला ती चालेल का हे डॉ. ना विचारा मात्र.
कापूर ठेवा जवळ हुंगायला - आडो किंवा शर्मिलाची टीप आहे ही. आम्हांला व्हॅलीच्या ट्रेकला उपयोगी पडली होती फार. आले चोखले तरी चालते, असे वाटते.
ओक्के आडो......... लक्षात
ओक्के आडो......... लक्षात ठेवीन. धन्यवाद!
आम्ही ही वर सेनापतीने लिहिल्याप्रमाणे एकदम विमानाने लेहला न जाता मजलदर मजल
करतच जाणार आहोत. आणि केसरीने त्या दृष्तीनेच मार्ग आखला आहे असंही समजलं.
शैलजा, शर्मिलाची टीप आहे ती.
शैलजा, शर्मिलाची टीप आहे ती. मलाही तेव्हाच पहिल्यांदा कळली होती.
ओक्के शैलजा. गोळीचं डॉ. ना
ओक्के शैलजा. गोळीचं डॉ. ना विचारून नक्कीच घेऊन जाईन. नाव नोट डाऊन करते.
आणि कापूर आणि आलेही.
हो आणि आमच्या ग्रुपात आमच्याच वयाचे आहेत सगळे. (ए कोण रे ते आमचं वय विचारतंय? आँ?)त्यातही ३ डॉ. कपल्स आहेत.
कॅडबरी चॉकोलेटस् ठेवा बरोबर
कॅडबरी चॉकोलेटस् ठेवा बरोबर भरपूर. सतत थोड्याथोड्यावेळाने काहीतरी खात रहा. ज्युस वगैरे (ब्लॅक कॉफी तर बेस्टच) पीत रहा. सैलसर कपडे वापरा.
धन्यवाद प्राची सगळ्यांच्या
धन्यवाद प्राची
सगळ्यांच्या सूचना नोट डाऊन करून ठवते.
किती आहे रे तिकिट?
किती आहे रे तिकिट? >>>>>इंडिगो ८,२५६/- (सिंगल) वेळ २ तास ४० मि. (नॉनस्टॉप).
जूनमधे आम्ही ७ जन दिल्ली -
जूनमधे आम्ही ७ जन दिल्ली - मनाली - लेह - द्रास - श्रीनगर प्लान केला आहे, बाइकवरून.
अरे! आजच हा धागा पाहिला.
अरे! आजच हा धागा पाहिला.
आम्ही MMT ची १ customized trip घेऊन दिल्ली-आग्रा-भरतपूर-जयपूर असे फिरलो. आपल्या आपण करण्यापेक्षा थोडी महाग नक्कीच होती, पण व्यवस्था मस्त होती. आम्ही हॉटेल्स आणि टॅक्सी त्यांच्याकडून घेतली होती. त्यांच्या ज्या executive बरोबर आम्ही बोलणी केली तिने खूप चांगली मदत केली.
थोडे जास्त बजेट चालेल, पण प्लॅनिंग आणि ऑर्गनायझिंग नको असे असेल तर नक्कीच recommended. Air Tickets/Hotels मी खूपवेळा इथून घेते. चांगला अनुभव आहे.
ऑगस्टमध्ये आम्ही दोघं (१० ऑगस्ट ते २२ ऑगस्ट) श्रीनगर-कारगिल-लेह अशा प्रवासाला जात आहोत. मुळात त्याच सुमारास केसरी बरोबर जाणार होतो, पण ती ट्रिपच रद्द झाली. त्यामुळे आम्ही दोघच जातोय. बुकिंग आणि बेत चालू आहेत. कोणाला बरोबर यायचय का? (दोघच जातोय, तेव्हा टॅक्सी मध्ये जागा असेल). कोणाला itinerary किंवा इतर काही माहिती हवी आहे का?
मुंबई श्रीनगर नॉनस्टॉप नाही घेतली तर विमानांची तिकिटे ५५०० च्या सुमारास आहेत
कोणाला बरोबर यायचय
कोणाला बरोबर यायचय का?>>>>वैजंयती थोडे आधी माहिती असते तर मी नक्कीच आलो असतो. :-)लेहला आम्ही चौघे जाणार होतो पण दोघांचे रद्द झाल्याने आम्ही दोघेच काय जायचे म्हणुन आम्हीही रद्द केले.
आणि आता कश्मिरचे फायनलसुद्धा झालेय.
मुंबई श्रीनगर नॉनस्टॉप नाही घेतली तर विमानांची तिकिटे ५५०० च्या सुमारास आहेत>>>>>जुलै महिन्यातील बहुतेक तिकिट्स ९००० च्या पुढेच आहे. फक्त इंडिगोची इतर एअरलान्स्च्या मानाने कमी होती (नॉनस्टॉप असली तरी). गो एअर १५ जुलैची श्रीनगर मुंबई १५५४० आहे (सिंगल)
मला पण अगोदर कल्पना नव्हती.
मला पण अगोदर कल्पना नव्हती. आणि हा धागा पण आधी पाहिला नव्हता. नाहीतर नक्कीच सांगितलं असतं. आत्ता तरी दोघच जातोय. खर्चसुद्धा जास्त होतोय, पण त्यापेक्षा अशा ट्रिपवर कंपनी असली की अधिक मजा येते! असो.
मी जाऊन आल्यावर खर्च धरून् सगळी माहिती देईनच इकडे.
श्रीनगर तिकिटांबद्दल बरोबर आहे. मी ऑगस्टमधली पाहिली.
btw devilonwheels.com ही वेबसाइट लेह/लडाख ट्रिपसाठी फ़ार छान आहे
आम्ही नुकतेच लेह-लडाख ट्रिप
आम्ही नुकतेच लेह-लडाख ट्रिप करून आलो. या धाग्यावर लिहिल्यामुळे आम्हाला संपूर्ण ट्रिपला छान कंपनी मिळाली.
लडाखची ही ट्रिप हा अतिशय सुंदर, कधीही न विसरण्यासारखा अनुभव होता. निळंशार आकाश, अजस्र, उघडे, गवताचं पातं सुद्धा नसलेले डोंगर, अधून मधून बर्फ....वर्णन करणं केवळ अशक्य. ज्याला ज्याला प्रवासाची थोडी तरी आवड असेल, त्याने आयुष्यात एकदा तरी ही ट्रिप करावीच!
मी फक्त itinerary देतेय. विरळ हवेचा त्रास न होण्यासाठी ही itinerary आम्हाला खूप उपयोगी पडली. तसच, नेटवरून शोधलेली हॉटेल्स वगैरे सेवा अतिशय छान निघाल्या. कोणालाही या सहलीबद्दल/हॉटेल्स्बद्दल काही विचारायचे असेल तर कधीही संपर्क करा.
दिवस १: मुंबई-श्रीनगर (विमानाने). श्रीनगरला दल लेक मध्ये Chicago Houseboat मध्ये रहिलो. व्यवस्था फारच छान होती. श्रीनगर फिरलो.
दिवस २: पहेलगाम फिरलो. मुक्काम Chicago Houseboat
दिवस ३: श्रीनगर-कारगिल (मुल्बेक) प्रवास. Nunkun Camp मध्ये तंबूत राहिलो.
दिवस ४: कारगिलहून अल्चि. अल्चिला Hotel Samdupling मध्ये राहिलो
दिवस ५/६ : लेहला किदार गेस्टहाऊसमध्ये राहिलो.
दिवस ७: नुब्रा वॅली तुर्तुक पर्यंत प्रवास. Hotel Stendel मध्ये मुक्काम
दिवस ८: लेहला परत. किदार मध्ये मुक्काम
दिवस ९: पॅन्गॉन्ग लेक, Camps of Ladakh च्या तंबूत मुक्काम
दिवस १० लेहला परत. किदार मध्ये मुक्काम
दिवस ११ Tso Moriri Camps of Ladakh च्या तंबूत मुक्काम
दिवस १२: लेहला परत, किदारला मुक्काम
दिवस १३: लेह मुंबई प्रवास.
चार ते सहा जणानी प्रवास केला आणि विमाना ऐवजी ट्रेनने प्रवास केला तर एखाद-दोन दिवस वाढवून, प्रत्येकी २५/३० हजारात हा प्रवास सहज करता येईल. या ट्रिप्/हॉटेल वगैरे बद्दल काहीही माहिती हवी असेल, तर जरूर विचारा.
वैजयंती ८ दिवसांत बसवता येईल
वैजयंती ८ दिवसांत बसवता येईल का हे?
शैलजा, विमानाने लेहला गेलात व
शैलजा, विमानाने लेहला गेलात व विमानाने परत आलाततर शक्य आहे, पण विरळ हवेचा त्रास होऊ शकतो. किंवा, नुब्रा/पॅन्गॉन्ग येथे मुक्काम न करता लेहला परत आलात तरी दिवस वाचतील, पण दगदगीमुळे आजारपण/ ट्रिपची मजा कमी होणे असे काहीतरी संभवू शकते.
पेंगाँगला तंबुत राहिलात हे
पेंगाँगला तंबुत राहिलात हे उत्तमच केलेत..
खुपच मस्त अनुभव असेल.
डायमॉक्स २५० मिलिग्रामची गोळी
डायमॉक्स २५० मिलिग्रामची गोळी असते.
याने मेंदूवरील सेरेब्रोस्पायनल फ्लुईडचे प्रेशर कमी होते.
रोज एक, व हळू हळू उंची वाढवताना घेणे.
यासोबत नारळाचे पाणी वा केसॉल नावाचे सिरप घेणे मस्ट आहे. अन्यथा खूप थकवा, हातापायांची थरथर जाणवते. (it contains 'acetazolamide' which is non potassium sparing diurtetic. potassium in body needs to be replaced which is aplenty in coconut water) डायुरेटिक अस्ल्याने शू जास्त होइल, काळजी करू नये. पाणी भरपूर पिण्याचे बघावे.
>>डायमॉक्स गोळी ठेवा जवळ मानुषी, पण तुम्हांला ती चालेल का हे डॉ. ना विचारा मात्र.<<
यातील डॉ.ना विचारा याबद्दल सहमत. हे महत्वाचे आहे. वरील सल्ला (रोज १ गोळी) मी तुम्ही पूर्ण हेल्दी यंग अॅडल्ट आहात अस समजून लिहिलेला आहे.
मी पुढच्या वर्षी माझ्या
मी पुढच्या वर्षी माझ्या आई-वडिलांना ह्या ट्रीपला न्यायचा विचार करते आहे. मी २०११ मध्ये कैलास-मानससरोवरला जाऊन आले. त्या धर्तीचे निसर्गसौंदर्य त्यांना बघायचे आहे, म्हणून. आईला विरळ हवेचा त्रास होतो. ती चारधाम, अमरनाथला गेली होती, तेव्हा झाला होता. तरी हे धाडस करावे का?
Pages