मटण बहारदार

Submitted by pradyumnasantu on 23 April, 2012 - 14:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

अ) मटण अर्धा किलो
ब) आले-लसूण पेस्ट तीन टेबलस्पून, दोन टेबलस्पून बडीशेप व तेवढेच धणे, आवडीप्रमाणे गरम मसाला, हळद, तिखट व मीठ
क) दोन अंडी, मूठभर बेदाणे (किसमिस) दोन टेबलस्पून साखर, गरम पाण्यात थोडेसे केशर् (ऐच्छिक).
ड) चार टेबललस्पून तेल, पाव वाटी तीळ-खसखस

क्रमवार पाककृती: 

(ब्)गटातील सर्व पदार्थ एकत्र वाटून घ्यावे. थोडे पाणी घालावे लागले तरी हरकत नाही पण बारीक वाटावे. हे वाटण मटणाला लावून अर्धा तास मुरू द्यावे. नंतर मटण शिजवून घ्यावे. वाटणाच्या पाण्यापेक्षा वेगळे पाणी घालू नये. मटण शिजल्यावर थंड होऊ द्यावे.
तेल गरम करून पाणी वगळता फक्त मटणाची फोडणी करावी व वरून तीळ व खसखस भुरभुरावे.
ओव्हन दोनशे डीग्रीवर तापवावा.
सर्व मटण एका भांड्यात ठेवून त्यावर मटणाचे राहिलेले पाणी घालावे. अंडी फोडून त्यात साखर एकजीव करावी व हे मिश्रण व बेदाणे मटणावर पसरून ओव्हनमध्ये ठेवावे.
अर्ध्या तासाने काढावे. (पाणी आटले पाहिजे व अंडे शिजले पाहिजे)
खाताना लेयर बिर्याणीप्रामाणे काढावे. म्हणजे बेदाणे, अंडे, व मटण एकत्र यावे. गरम वा रूम तापमानाला खाऊ शकता.

वाढणी/प्रमाण: 
दोन ते तीन व्यक्तींसाठी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अथक, घे फोटु.
bahar.jpg

प्रयोग करायचा म्हणून चिकनवर केला. चव सुंदर आहे. स्टोनच्या पॅनमध्ये छान होईल म्हणून बेक करायला ठेवले पण तो जरा मोठा असल्याने सैल बसले. मग अंडे वर रहाण्याऐवजी मधल्या जागेत गेले. Happy त्यामुळे थर असा नाही झाला. तिखट, गरम मसाला अगदी थोडा घातला. पण अंडे, साखर, केशर आणि ते वाटण याची चव छान येते. मुलांना आणि कमी मसालेदार खाणार्‍यांना आवडेल.

मी खिमा वापरुन पहाणार आहे. ते वाटण मिसळून न शिजवता थेट पॅनमध्येच बेक करायचा. मग थर होतील आणि नीट तुकडे कापता येतील असं वाटतंय. सॅलड, डिनर रोल आण ही डिश हे मस्त जेवण होईल.

लोला,,, चिकण बहारदार छान जमले आहे ....

मी खिमा वापरुन पहाणार आहे. ते वाटण मिसळून न शिजवता थेट पॅनमध्येच बेक करायचा. मग थर होतील आणि नीट तुकडे कापता येतील असं वाटतंय. सॅलड, डिनर रोल आण ही डिश हे मस्त जेवण होईल. >>>. हि idea पण
मस्त आहे...

लोला: फोटोसाठी थँक्स. काळ्या मनुका आहेत की द्राक्षे?
तिखट व मसाल्याचे प्रमाण वाढवल्यास मोठ्यानाही चमचमीत वाटेल.

लोला फोटुमूळे बहार आली ... नुस्तं वाचून कळत नाही आता करायला जमेल असं वाटतय... Happy
साखर नाहीच घातली तर चालेल का? मला स्वत:ला मांस गोड खायला विशेष आवड्त नाही

मनुकाच आहेत. आता मसाला जास्त घालून बघते.
वेका, २ टेबलस्पून नको घालू, पण थोडी तरी घाल. अगदी गोड नाही लागत. थँक्स स्वाती.

लोला: सुरुवातीला ओली मिरची/लाल मिरची व आले लसूण वाटून चिकनला लाव व शिजवून त्या पाणयातच पूर्ण आटव. बाकी मसाले नंतर घाल. भांडे कमी परीघाचे वापर. आणखी चव येईल.

स्वाती२, २०० फॅ. च आहे. मटण आधी शिजले असल्याने पुरते.
मी अजून खिमा वापरुन करुन पाहिले नाही. न शिजवता ठेवला तर वेळ्/तापमान त्याप्रमाणे बदलावे लागेल.