रबडी साठी---
१ १/२ लिटर दुध.
पाव वाटी साखर.
१/८ चमचा जायफळ पुड..
दुधमसाला १/२ चमचा..
पुरीसाठी-
२ वाट्या कणिक.
पाव चमचा मीठ.
अर्धा चमचा मोहनासाठी तेल.
पुर्या तळण्यासाठी तेल.
मोठी जाड बुडाची कढई/मोठे पॅन घ्या .
त्यात दुध ओतुन ते तीव्र आचेवर उकळुन घ्यावे..झार्याने सतत ढवळत रहावे ..
एकदा छान उकळले कि गॅस ची आच अगदी कमी करावी व झारा कढईतच ठेवावा.
आता दर ५-१० मिनिटानी दुधावर आलेली साय कढईतच एका बाजुला सरकवुन ठेवावी व दुध कढईच्या तळापासुन ढवळावे म्हणजे तळाला लागणार नाही..[दुध करपणार नाही]
दुधावर आलेली साय अशीच प्रत्येक वेळा एका कडेला सरकवायची..
एकुण दुधाच्या साधारण निम्मे दुध झाले कि दुध घट्ट होईल्,दुधाला पिवळसर रं ग आलेला दिसेल आता त्यात जायफळ पुड,दुधमसाला आणि पाव वाटी साखर घालावी व पुन्हा साखर विरघळे पर्यंत सतत ढवळत रहावे.आता रबडी तयार झाली .ती एका बाऊल मधे काढुन थंड झाली कि फ्रिज मधे ठेवावी ..२ ते ३ तासानंतर मस्त्,घट्ट ,थंडगार "लच्छेदार" 'रबडी तयार होते.हा फ्रिज मधे ठेवण्याचा वेळ मोजलेला नाही.फ्रिज मधुन बाहेर काढल्यावर जर ही रबडी खुपच घट्ट वाटली तर थोडेसे दुध घालता येते.
पण रबडी घट्टच खातात.
नेहमीप्रमाणे पुर्या करायच्या आहेत.
कढई/पॅन चा बेस जाड हवा .जर नसेल तर एकदा दुध उकळल्यावर खाली तवा ठेवुन त्यावर कढई/पॅन ठेवावे.
दुधातले पाण्याचे प्रमाण कमी होईपर्यंतच सतत ढवळावे लागते,लक्ष द्यावे लागते..त्यानंतर मंद आचेवर होत रहाते तेव्हा दुसरे काम करता -करता रबडी वर ची साय बाजुला सरकवता येते
घट्ट झालेल्या दुधात गोडपणा नैसर्गिक्च येतो त्यामुळे गोड कमी हवे असल्यास साखर पाव वाटीपेक्षा थोडीशी कमी घालावी..वाटल्यास वरुन पिठी साखर घालता येते..
रबडी घरी केलेली असली तर खात्रीलायक असल्याने बिनधास्त खाता येते.
सुरवातीला आटापिटा वाटला तरी १-२ वेळा करुन पाहिली तर त्यातला सोपेपणा कळतो.
मुख्य म्हणजे विकतच्या रबडी/बासुंदी सारख्या दुधाच्या पदार्थांची खात्री नसते.
यात लहान लहान रसगुल्ले थोडेसे पिळुन टाकावे .तसेच द्राक्ष घातल्यास अंगुर रबडी तयार होते.
एकदा रबडी तयार झाली कि रुम्-टेंप्रेचरला आणुन ती झाकुन फ्रिज मधेच ठेवायची आहे.
वत्सला,अक्षयतृतियेचा "खास
वत्सला,अक्षयतृतियेचा "खास बेत" खुपच मस्त आहे..
लाजो तुझं वजन वाढू नये म्हणून
लाजो तुझं वजन वाढू नये म्हणून वत्सला ने लहान फोटू टाकलाय
वत्सला, मस्त बेत दिसतोय
वॉव! वत्सला मस्तच बेत! आणि
वॉव! वत्सला मस्तच बेत!
आणि सुलेखा तुझाही. पण यातली मी फक्त एखादी पुरी खाऊ शकते.
पण इतरांना आवडते म्हणून कद्धीतरीच करते रबडी.
लाजो तुझं वजन वाढू नये म्हणून
लाजो तुझं वजन वाढू नये म्हणून वत्सला ने लहान फोटू टाकलाय>>>
लाजोचं वजन फार नाहीये पण, अलिकडेच भेटली होती ती.
उद्या रबडी पुरीचा बेत करणार
उद्या रबडी पुरीचा बेत करणार आहे. बरोबर कोणती भाजी जाईल?
सायो, मी परवा उकडलेल्या
सायो, मी परवा उकडलेल्या बटात्याची कोरडी भाजी केली होती आणि आंबटगोड वरण-भात. पब्लिकने रबडी/बासुंदी-पुरी आणि बटत्याची भाजी यावरच आडवा हात मारला होता.
बटाटा, कॉलिफ्लावर्+वाटाणा,
बटाटा, कॉलिफ्लावर्+वाटाणा, मिक्स भाज्यांचा रस्सा, मटकीची गोडी उसळ....
मलाही पुरीबरोबर बटाट्याची
मलाही पुरीबरोबर बटाट्याची भाजी जाईल असं वाटलं. किंवा मग एखादी रस्साभाजी वगैरे.
३ तास दूध आटवून शेवटी १ गॅलन
३ तास दूध आटवून शेवटी १ गॅलन दूधाची १ मिडीयम बोल रबडी तयार झाली. वरच्या फोटोंसारखाच बदामी रंग आलाय. लाजोच्या सुगरण मैत्रिणीसारखीच साय बाजूला काढून चॉप केलीये. त्याचं काहीतरी करावं लागेल आता.
Pages