जगणे सुरात आले

Submitted by अभय आर्वीकर on 19 April, 2012 - 01:39

जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाची
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                  - गंगाधर मुटे
--------------------------------------------

गुलमोहर: 

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

छान लिहीले मुटेसाहेब

या कवितेतुन बरेच काही तुम्ही सांगुन गेले हे मात्र खरे , तरीही काही टिकाकारांना बोध होत नसेल तर ....
निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणुन मोकळे व्हावे Happy
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ' तु माझी पाठ खाजव , मी तुझी खाजवतो ' या प्रमाणे स्वःताची लाल करवुन घेणारे खुप आहेत Happy

हायल्ला, कमाल झाली

गझलेचा शून्य भाव असताना पब्लिक जान बिन कुर्बान करायला तयार झालंय म्हणजे गजब

त्या फेसबूक आणि इतर प्रतिसादकांसाठी व त्यांच्या गझलसमजुतीसाठी उभे राहून टाळ्या

प्रतिसादांनी फुलून येतो तो स्वतःचेच नुकसान करत असतो

ज्ञानेश्वरांच्या अनेक रचनांमध्येही गजलीयत स्पष्ट दिसते. याचे उदाहरण.

चंदनासी परिमळ आम्हा काय त्याचे २३ मात्रा
तुझे नाम गोड किती घेउ आम्ही वाचे २३ मात्रा

अशी अनेक उदाहरणे सापडतात. या वरून गझल पूर्वांपार हाताळली जात होती.
पण त्याला गझल असे वेगळे संबोधले जात नसावे.

उमेश जी एक प्रेमाचा सल्ला देवू का
आपण म्हणत आहात ते मला पटतंय............... १००%............
पण इतराना पटायला हवंय ना !

मी माऊलींच्या रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा या ओळींवर तरही केली; सगळे म्हणतात........ ...मी त्यांची चेष्टा केली म्हणून

तुमच्या बाबतीत असे होवू नये म्हणून काळ्जी घ्या.................

http://www.maayboli.com/node/33872

ही लिंक वाचून आपले मत जरूर कळवा ...........विचारपूस मध्ये /फोनवर .(नंबर तिथे आहे)

हा गझल अभंग होवू शकेल

योगजी,
या रचनेचे वर्गिकरण करायचे झाले तर गझलेतच करावे लागेल.
नि:संशय ही गझलच आहे. कारण गझलेच्या सर्व कसोट्या आणि नियम या गझलेने अगदी तंतोतंत पाळलेले आहेत.

बेफिंचा आक्षेप फक्त त्यांना या गझलेत गझलियत किंवा गझलेचे भाव आढळत नाही असा आहे.

त्याला माझा नाईलाज आहे. तसेही एखादी रचना अथवा कलाकृती प्रकाशित केली की त्याचा आस्वाद आपापल्या मर्जिने घ्यायला वाचक पूर्णपणे स्वतंत्र असतो.

(अपूर्ण)

Pages