जगणे सुरात आले

Submitted by अभय आर्वीकर on 19 April, 2012 - 01:39

जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाची
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                  - गंगाधर मुटे
--------------------------------------------

गुलमोहर: 

Happy

छान

मुटे सर हीच रचना मी दुसर्‍या एका ब्लॉगवर वाचल्याचे स्मरते आहे
माझी लायकी नाही पण काही बदल सुचवू कां ? (तुमचा वरील प्रश्न वाचून मनात हे सुचले आहेत )

कविते=गझले
नये कधीही = नयेत कधिही
पद्यात =शेरात
गाण्यात =गझलेत
बहरास = बहरेस /वृत्तास
कवी = (हा तेवढा सुचला नाहीये )

असे केल्यास आक्षेप घेणार्‍याना ही गझल रचना न वाटता फक्त आणि फक्त गझल वाटेल असे माझे निरीक्षण आहे .

असो..........
न रुचल्यास रागावू नये !!
लोभ असावा ही विनंती................
आणि हो ..........कृपेची प्रार्थना देखील !!.................

मुटे साहेबांचा ब्लॉग कालच पाहिला . गुगलवर मराठी गझल सर्च केले की साहेबांचा ब्लॉग पहिल्या पानावर येतो.

जामोप्या: यू आर ना..... टू मच यार .............:)
(अ‍ॅक्च्युअली मला ३ मच ४ मच ....मचमच असे म्हणायचे होते........ पण तू रागाव्शील म्हणून म्हणालो नाही ;))

मी रागवत नाही.. काही संस्कृती रक्षक आहेत ते रागवतात. मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठल्याही भाषेत लिहा.. Happy

तू मला "तू" म्हणालास तरी चालेल .............जामोप्या

बादवे : संस्कृतीरक्षक ही कोणती नवी जमात आहे रे ..................?
एखादी माहितीपर लिंक वगैरे दे की 'वि. पू.' त.............. नक्की वाचीन

वैभव कुळकर्णी साहेब,
आपण सुचविलेल्या

नये कधीही = नयेत कधिही
बहरास = बहरेस /वृत्तास

या दुरुस्त्या स्विकारल्या आहेत. तदनुरूप बदल केले आहेत. एवढ्या मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे. पण;

कविते=गझले
पद्यात =शेरात
गाण्यात =गझलेत
कवी = (हा तेवढा सुचला नाहीये )

यात बदल करण्याचे प्रयोजन मला कळलेले नाही. मी गझलकार असलो तरी कविता, पद्य, गाणे, कवी या शब्दाची मला अ‍ॅलर्जी नाही. गझला लिहितो म्हणजे मी कवितांचा तिरस्कार करत नाही किंवा कवितेला अथवा अन्य भारतीय पद्यकाव्याला मी गझलेच्या तुलनेने कमी लेखत नाही.

माझे या देशातील पद्यकाव्यावर नितांत प्रेम आहे.

शिवाय अरबी काव्यप्रकार हाताळायला लागले म्हणजे धर्मांतर केल्यासारखे वागलेच पाहिजे, हे सुद्धा मला अजिबात मान्य नाही. Happy

सबब आपली सुचवणी मी साभार परत करित आहे. स्विकार करावा. Happy

आपला नम्र
गंगाधर मुटे

आपल्याकडे गझलेला कविता मानत नाहीत हेच दुर्दैव आहे, म्हणूनच काव्यसंमेलनांमधे गझलेचा वेगळा आणि कवितांचा वेगळा कार्यक्रम असतो Sad

मुटेजींशी सहमत पण ते अरबी काव्यप्रकार वगैरे विधान जरा अतीच वाटले, क्षमस्व!

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले>> आवडला

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!>> दुसरी ओळ आवडली

बाकी शेर रचना वा गझल या पेक्षा भजनासारखे अधिक झाले आहेत. Wink

पण ते अरबी काव्यप्रकार वगैरे विधान जरा अतीच वाटले, क्षमस्व!>> Lol

मी आधीच म्हणालो होतो सर.....माझी लायकी नाहीय म्हणून .............
तरी आपण मी सुचवलेले काही बदल स्वीकारले हे माझे सद्भाग्य आहे सर..........
धन्यवाद !!

कृपया गैरसमज नसावा
लोभ असावा ............

.........पण ते अरबी काव्यप्रकार वगैरे विधान जरा अतीच वाटले, क्षमस्व!>> सहमत

बाकी शेर रचना वा गझल या पेक्षा भजनासारखे अधिक झाले आहेत.

- माझी गझल/शेर हे जर भजनासारखे वाटत असेल तर माझ्या शेरातून मराठी मातीचा सुगंध दरवळतो, याचा तो पुरावा ठरतो. आणि ते माझ्यासाठी सन्मानजनक ठरते. Wink

- गेल्या शंभर वर्षातील एकुणच अभंग/भजन रचनाकार आणि गझल लिहिणारे गझलकार यांची संख्या लक्षात घेतली आणि सांख्यिकीशास्त्राच्या आधारे निष्कर्ष काढायचा ठरवला तर गझलेच्या तुलनेने अभंग/भजन लिहिणे हे निदान हजारपटींनी तरी कठीण कार्य आहे, हे सिद्ध व्हायला हरकत नसावी. Happy

- माझे आदर्श संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कबीर, केशवसूत, बालकवी हे आहेत. गालीबचा नंबर फार फार नंतर लागतो. त्यामुळे असे होत असावे कदाचित. Happy

-----------------------------------------------
कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!>> दुसरी ओळ आवडली

पहिली ओळ म्हणजे

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे

ही ओळ न आवडायला काय झालं?????????? Rofl

गंगाधर मुटे | 10 May, 2012 - 12:52 नवीन
बाकी शेर रचना वा गझल या पेक्षा भजनासारखे अधिक झाले आहेत.

-"" माझी गझल/शेर हे जर भजनासारखे वाटत असेल तर माझ्या शेरातून मराठी मातीचा सुगंध दरवळतो, याचा तो पुरावा ठरतो. आणि ते माझ्यासाठी सन्मानजनक ठरते.

- गेल्या शंभर वर्षातील एकुणच अभंग/भजन रचनाकार आणि गझल लिहिणारे गझलकार यांची संख्या लक्षात घेतली आणि सांख्यिकीशास्त्राच्या आधारे निष्कर्ष काढायचा ठरवला तर गझलेच्या तुलनेने अभंग/भजन लिहिणे हे निदान हजारपटींनी तरी कठीण कार्य आहे, हे सिद्ध व्हायला हरकत नसावी.

- माझे आदर्श संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, कबीर, केशवसूत, बालकवी हे आहेत. गालीबचा नंबर फार फार नंतर लागतो. त्यामुळे असे होत असावे कदाचित.""

सहमत आहे . आणि गझल आवडली.

माझी गझल/शेर हे जर भजनासारखे वाटत असेल तर माझ्या शेरातून मराठी मातीचा सुगंध दरवळतो, याचा तो पुरावा ठरतो. आणि ते माझ्यासाठी सन्मानजनक ठरते.
>>

हे विधान बेशुद्ध करणारे आहे

गेल्या शंभर वर्षातील एकुणच अभंग/भजन रचनाकार आणि गझल लिहिणारे गझलकार यांची संख्या लक्षात घेतली आणि सांख्यिकीशास्त्राच्या आधारे निष्कर्ष काढायचा ठरवला तर गझलेच्या तुलनेने अभंग/भजन लिहिणे हे निदान हजारपटींनी तरी कठीण कार्य आहे, हे सिद्ध व्हायला हरकत नसावी.>>

हे असंबद्ध

माझा एक सरळसाधा भोळाभाबडा मेंदू आहे तो मला असे सांगतो की .............
जिथे विठ्ठल-रुक्मिणी ,वीट, चंद्रभागा ;पंढरपूर , आळंदी, देहू ,पैठण , इत्यादी व अशी इतर संतांची गावे ;पुंडलिक ,ज्ञाना ,तुका, चोखा ,एका ,नामा ,सावता, निळा ,गोरा, दामा, विसोबा,नरहरी सोनार , जनी, कान्होपात्रा, बहिणाबाई, आणि इतर संतांची नावे येतात ;त्याला ओवी,अभंग इत्यादी म्हणतात वगैरे वगैरे ....................

वरच्या रचनेत तसे काही न आढळल्याने मी त्यास ओवी / अभंग म्हणत नाहीय .....इतकेच !!

जामोप्या: धन्यवाद माहितीबद्दल...........
त्या वृत्तांच्या आकृतीबंधाबद्दल जरां सविस्तर सांगाल का प्लीज ..................तो आकृतीबंध गझलेत चालतो का?............. कृपया हेही कळवावे

अभंगाचे दोन प्रकार आहेत.

मोठा अभंग :

६/६/६/४ अशी अक्षरे असतात. लघु गुरु काहीही चालते.

दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळीत यमक असते. उदा. ओंकार स्वरुपा | सद्गुरु समर्था | अनाथांच्या नाथा| तुज नमो.

लहान अभंग :

८/८ अक्षरे

उदा. जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले।। शेवटी यमक असते.

पण हे प्रकार जास्त करुन विठ्ठल भक्तीसाठीच वापरले आहेत

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%97

ओवी :

पहिल्या तीन चरणात यमक असते. चौथे चरण लहान असते. अक्षराबाबत नेमकी कल्पना नाही. पण बहुदा कमीजास्त चालते. पहिल्या तीन चरणात ६-८ अक्षरे, शेवटच्यात ४-६ अक्षरे असतात

ओम नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरुपा
देवा तूची गणेशु | सकलमती प्रकाशु| म्हणे निवृत्तीदासू | अवधारी जो जी

लोकगीततली ओवी असाही प्रकार आहे.

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%80

पण हे छंद गझलेत कसे चालवायचे कल्पना नाही. मुष्किलच वाटते. कारण यात मात्रा मोजायची पद्धत नाही.

याच गझलेवर काही रसिकांनी (जे गझलकार असेलच असे नाही) प्रतिक्रिया नोंदविलेल्या आहेत.
चला एकदा त्या प्रतिसादांवर एक नजर फिरवूया.

- जान कुर्बान अर्थात जीव ओवाळून टाकावा अशी गझल !

- दीर्घकाळपर्यंत आमच्या - नि इतरांच्याही - नजरेसमोर रहावी अशी गजल.

- फेसबूक

- फेसबूक

- श्री भिमराव पांचाळे

-------------------------------------------------------------------------------------------------------
१) वरीलपैकी कोणत्याही संस्थळावर मी कोणत्याही लेखनाला कधीही प्रतिसाद देत नाही.
त्यांमुळे "तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो" या न्यायाने वरील प्रतिसाद आलेले नाहीत.

२) वरीलपैकी कोणत्याही संस्थळावर मी कंपूबाजी करीत नाही. माझा कुठेही कोणताही कंपू नाही. त्यामुळे हे प्रतिसाद कंपूबाजी करून मिळविलेले प्रतिसाद नाही.

हे नोंदविणे अनावश्यक आणि असंबद्ध असूनही आवश्यक होते, त्यामुळे/म्हणून नोंदवित आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले.... व्वा व्वा

फार छान जमलय हे .. बढिया

Pages