_________________________________________
माऊली परमदयाळू आहे माझ्या चुकांना क्षमा करेलच आपणही करावीत ही प्रार्थना !!
_________________________________________
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा
सांडि तु अवगुणु रे भ्रमरा
हृदय-मुळे खाणीत लपे
विठ्ठलु तो खणु रे भ्रमरा
प्रणवकमळु परिमळु वेधी
कोण तुझ्याविणु रे भ्रमरा
'ऐर'पुरा चल पार करू
सोSहम् कि म्हणु रे भ्रमरा
उड उड चल चलू रे वेगी
द्वाड नभांगणु रे भ्रमरा
ब्रम्हतरू शोधू आपण
निश्चयु अर्पणु रे भ्रमरा
_________________________________________
गझल : रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा
वृत्त : (नाव माहीत नाहीय)
मात्रा : १५(अपवाद १६)
कवाफी : रुणुझुणु, अवगुणु, खणु, म्हणु...अर्पणु इत्यादी
रदीफ : ....रे भ्रमरा
विषय : ब्रह्मप्राप्तीचा मार्ग..... आत्मा+मन यांचा प्रवास
संदर्भ : माऊलीची कृपा + छांदोग्य उपनिषद + स्वतःच्याकाही भावना / कल्पना इत्यादी
_____________________________
वैभव वसंतराव कुलकर्णी
कुरुलकर बंगला,स्टे.रोड,पंढरपूर.
मोबाईल :९०२८५८८८४१
_____________________________
गझलु !! लिहित राहु रे भ्रमरा!
गझलु !! लिहित राहु रे भ्रमरा!
प्राजु आपला प्रतिसाद सर्वात
प्राजु आपला प्रतिसाद सर्वात आधी आला हे पाहून- वाचून आनंद झाला !!
तरीही : माऊली परमदयाळू आहे माझ्या चुकांना क्षमा करेलच आपणही करावीत ही प्रार्थना !!