मुगाची धीरडी

Submitted by krups on 8 September, 2008 - 07:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हीरवे मुग (१ वाटी), ४-५ मीर्च्या, आल्याचा तुकडा, कोथींबीर , ५-६ लसूण पाकळ्या, हळ्द, तीखट, मीठ, तेल, तांदुळाचे पीठ

क्रमवार पाककृती: 

हीरवे मूग अदल्या दीवशी रात्री भीजत घालावे. सकाळी mixer मधून थोडे पाणी घालून त्याची बारीक paste तयार करावी. मीर्च्या, आले, कोथींबीर वेगळे वाटून ते वरील paste मधे घालावे. चवीनुसार मीठ, तीखट-हळ्द, आणी बारीक केलेल्या लसूण पाकळ्या घालाव्यात. खुसखूशीत बनवण्यासाठी २ च्मचे तांदुळाचे पीठ त्यात घालावे. paste एक्जीव करुन घ्यावी. आता गरम pan वर तेल लावून छोट्या आकाराची धीरडी घालावीत.

२ min. च्या आत सुरेख खरपूस धीरडे तयार होते, हीरवा रंगाची ही धीरडी खाण्यास रुचकर तर लागतातच पण पोटभरीची सुद्धा होतात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

krups
तुम्ही मायबोली गणेशोत्सव या गृपचे सदस्य व्हा आणि मग ही प्रवेशिका पाककृती स्पर्धेत टाका म्हणजे ती स्पर्धेत दिसेल. सध्या ती स्पर्धेत दिसत नाहीये.
मायबोली गणेशोत्सव २००८

काल करुन बघितले , मस्त चव आली . विशेष म्हणजे ते तांदुळ टाकल्यामुळे खरपुस झाली होती . बायको खुष , मी रेसीपी सांगीतलीही अन स्वत: करुन तिला खायला दिलेही म्हणुन Happy
****************************
Happy Blush Proud Lol Biggrin Rofl

वाह, धीरडी करून छान झाली हे सांगितल्य बद्दल धन्यवाद. Happy