नेटवर अनेकदा स्त्री प्रोफाईलशी सामना होतो. त्या ख-या कि खोट्या याबद्दल मनात गोंधळ होतो. अशा वेळी काय करावं याबद्दल माझ्या अनुभवातून मायबोलीच्या सदस्यांना माहिती देत आहे. ( मी इथे नवीन आहे)
१) एखादं स्त्री प्रोफाईल खूप विनोद करू लागलं कि सावध व्हावं. ख-या स्त्रियांचं विनोदाशी वावडंच असतं. ( त्यांना विनोद आवडतात पण झेपत नाहीत आणि करता येत नाही हा कळीचा मुद्दा आहे )
२) स्त्री प्रोफाईल डिस्कशन फोरम मधे भाग घेतं आणि विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकतं. प्रत्यक्षात स्त्रिया असे फोरम टाळतात. अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.
३) स्त्री प्रोफाईल चित्कारण्याचे आवाज टाईप करतं. उदा. ईईईईईई किंवा शीईईईईईई असे. प्रत्यक्षात स्त्रिया कितीही कर्कश्श असतील तरी असं त्या लिहून दाखवत नाहीत.
४) बरेचदा फेक प्रोफाईल फोटो लावतं. प्रत्यक्षात स्त्रिया पानं, फूल, निसर्गचित्र, अॅक्ट्रेस यांची चित्रं लावतात. जुन्या परिचयाच्या स्त्रिया फक्त आपले जुने फोटो लावताना दिसतात. माझ्या माहितीत एक आज्जी आहेत त्या स्वतःचे दुरून काढलेले फोटो लावत असतात. क्वचितच फोटोवाल्या स्त्रिया ख-या निघतात. अपवाद असतोच तसं.
५) फेक स्त्रिया ताबडतोब लक्ष वेधून घ्यायला सुरूवात करतात. कविता, चित्रं असलं काही तरी टाकत असतात. प्रत्यक्षात स्त्रिया ओळखी झाल्याशिवाय असं वागत नाहीत.
६) खोट्या स्त्रिया कधीच कुकिंगबद्दल काही लिहीत नाहीत. ख-या स्त्रिया मात्र जुन्या असोत कि नव्या अशा ठिकाणी पटकन लिहीत्या होतात.
७) खोट्या स्त्रिया क्रिकेट बद्दल भरभरून बोलतात. ख-या स्त्रियांना ते आवडत नाही.
८) खोट्या स्त्रिया राजकारणावर मार्मिक कोट्या करतात. ख-या स्त्रियांना त्यातलं काही कळत नाही.
९) खोट्या स्त्रिया अर्थकारणावर बोलतात. ख-या स्त्रियांना त्यात काही रस नसतो.
१०) खोट्या स्त्रियांना अपराधी भावना असते. त्यातून त्या सारख्या क्षमा मागतात. क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही. म्हणतात ना, मॅन लर्न्स फ्रॉम हिज मोस्टेक्स.....नॉट वूमेन !
वरील दहा टिपा समजून घेतल्या तर तुम्हाला खोट्या स्त्रिया ओळखता येणं कठीण नाही. ओळ्कहल्यावर त्यांना तसं कळू देऊ नका. फक्त निरीक्षण करत रहा. त्यांचे हेतू तपासून पहा. काही दिवसांनी त्या ख-या कोण हे आपोआपच कळून येइल.
धन्यवाद.
सुंदर बापट
लेख वाचून चांगलेच मनोरंजन
लेख वाचून चांगलेच मनोरंजन झाले.

आपल्या जहाल प्रतिक्रिया आवरा आता. २०१२ मध्ये लिहून बापट नाहीसे झालेत.
>>>>>अरे देवा .. मी तर फुल, फळ, पान नै ठेवले . स्वतःचा फोटू ठेवला.. म्हणजे मी 'खोटी इस्त्री'
टीनाजी, दोनपैकी खोटी इस्त्री कुठली?
न तापणारी
न तापणारी
(No subject)
Sundar bapat
Sundar bapat palalet......
Sundar bapat tirth yatrela gelet
SUNDARAA BAAPATIN ___ tiche kahitari zaley....tya thobad pustiket laplya ahet
गझलवंतांचा एक आयडी इथे, एक
गझलवंतांचा एक आयडी इथे, एक तिथे आणि एक पलिकडे सापडला.
असे खोटे स्त्री प्रोफाईल
असे खोटे स्त्री प्रोफाईल बनवून लिहीणारे पुरूष किळसवाणे वाटतात
पुरूष असून पण पुरूष आयडी घेण्यात लाज वाटणार्यांबद्दल काय बोलावे छ्या दमच नाही यापेक्षा घाल साडी अन भर बांगड्या बस करत अय्यो ब्बली
Pages