नेटवरच्या खोट्या स्त्री प्रोफाईल्स कशा ओळखाव्यात - दहा टिपा

Submitted by सुंदर बापट on 11 April, 2012 - 05:16

नेटवर अनेकदा स्त्री प्रोफाईलशी सामना होतो. त्या ख-या कि खोट्या याबद्दल मनात गोंधळ होतो. अशा वेळी काय करावं याबद्दल माझ्या अनुभवातून मायबोलीच्या सदस्यांना माहिती देत आहे. ( मी इथे नवीन आहे)

१) एखादं स्त्री प्रोफाईल खूप विनोद करू लागलं कि सावध व्हावं. ख-या स्त्रियांचं विनोदाशी वावडंच असतं. ( त्यांना विनोद आवडतात पण झेपत नाहीत आणि करता येत नाही हा कळीचा मुद्दा आहे )
२) स्त्री प्रोफाईल डिस्कशन फोरम मधे भाग घेतं आणि विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकतं. प्रत्यक्षात स्त्रिया असे फोरम टाळतात. अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.
३) स्त्री प्रोफाईल चित्कारण्याचे आवाज टाईप करतं. उदा. ईईईईईई किंवा शीईईईईईई असे. प्रत्यक्षात स्त्रिया कितीही कर्कश्श असतील तरी असं त्या लिहून दाखवत नाहीत.
४) बरेचदा फेक प्रोफाईल फोटो लावतं. प्रत्यक्षात स्त्रिया पानं, फूल, निसर्गचित्र, अ‍ॅक्ट्रेस यांची चित्रं लावतात. जुन्या परिचयाच्या स्त्रिया फक्त आपले जुने फोटो लावताना दिसतात. माझ्या माहितीत एक आज्जी आहेत त्या स्वतःचे दुरून काढलेले फोटो लावत असतात. क्वचितच फोटोवाल्या स्त्रिया ख-या निघतात. अपवाद असतोच तसं.
५) फेक स्त्रिया ताबडतोब लक्ष वेधून घ्यायला सुरूवात करतात. कविता, चित्रं असलं काही तरी टाकत असतात. प्रत्यक्षात स्त्रिया ओळखी झाल्याशिवाय असं वागत नाहीत.
६) खोट्या स्त्रिया कधीच कुकिंगबद्दल काही लिहीत नाहीत. ख-या स्त्रिया मात्र जुन्या असोत कि नव्या अशा ठिकाणी पटकन लिहीत्या होतात.
७) खोट्या स्त्रिया क्रिकेट बद्दल भरभरून बोलतात. ख-या स्त्रियांना ते आवडत नाही.
८) खोट्या स्त्रिया राजकारणावर मार्मिक कोट्या करतात. ख-या स्त्रियांना त्यातलं काही कळत नाही.
९) खोट्या स्त्रिया अर्थकारणावर बोलतात. ख-या स्त्रियांना त्यात काही रस नसतो.
१०) खोट्या स्त्रियांना अपराधी भावना असते. त्यातून त्या सारख्या क्षमा मागतात. क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही. म्हणतात ना, मॅन लर्न्स फ्रॉम हिज मोस्टेक्स.....नॉट वूमेन !

वरील दहा टिपा समजून घेतल्या तर तुम्हाला खोट्या स्त्रिया ओळखता येणं कठीण नाही. ओळ्कहल्यावर त्यांना तसं कळू देऊ नका. फक्त निरीक्षण करत रहा. त्यांचे हेतू तपासून पहा. काही दिवसांनी त्या ख-या कोण हे आपोआपच कळून येइल.

धन्यवाद.

सुंदर बापट

गुलमोहर: 

स्त्री प्रोफाईल चित्कारण्याचे आवाज टाईप करतं. उदा. ईईईईईई किंवा शीईईईईईई असे. प्रत्यक्षात स्त्रिया कितीही कर्कश्श असतील तरी असं त्या लिहून दाखवत नाहीत.
>>>>>> मी लिहुन दाखवलं. मंद्या कळलं Happy

वरील दहा टिपा समजून घेतल्या तर तुम्हाला खोट्या स्त्रिया ओळखता येणं कठीण नाही. ओळ्कहल्यावर त्यांना तसं कळू देऊ नका. फक्त निरीक्षण करत रहा. त्यांचे हेतू तपासून पहा. काही दिवसांनी त्या ख-या कोण हे आपोआपच कळून येइल.

>>>>>>>>>>

दहा टिपा नंतर
निरिक्षण करणे , हेतु तपासणे... या दोन टिपा.

सस्मित = नन्ना? हायला. मंद्या म्हटल्यावर तुझी विपू चेक केली. तिथे कुणीतरी नन्ना अशी हाक मारली आहे.
>>>>> आता कळलं होय तुला :-D. आता सांग मी 'स्त्री प्रोफाइल' आहे की 'खरी स्त्री' आहे Lol

>>आता सांग मी 'स्त्री प्रोफाइल' आहे की 'खरी स्त्री' आहे
काहीही असेल तरी मला मानसिक धक्का बसण्याची शक्यता शून्य आहे, त्यामुळे माय फादर व्हॉट गोज? Proud

चान्गला प्रयत्न आहे. Happy
फक्त "समस्त स्त्री"जातीला दुषणास्पद ठरतील अशी डायरेक्ट विधाने टाळली तर बरे.
अन असे लेख लिहीताना, स्वतःच्या प्रोफाईलमधे स्त्री की पुरुष ऐवजी "---" अस्ल कैतरि लिहू नये, लोकं भलत्याच शन्का घेतात मग! Wink
शिवाय, हल्ली की नै, एखाद्या/एखादीच्या प्रोफाईल मधे "कोब्रा" आडनाव असेल, तर मी मात्र अशी आयडी चान्गली नीटपणे तावुनसुलाखुन पारखुन घेतोच घेतो बरं! Proud
कायेना, की कोब्रा आडनावे दाखवुन फेक आयडीने घुसण्याची बर्‍याच जणान्ची सवय आहे असे माझे मत!

बाकि हा "असंयुक्त" विषय, परवानगी हवी, हे खरेच हो! Lol

सुंदर बापट तुम्ही अजूनही स्पष्ट केलेले नाही की तुमचे प्रोफाईल कोणते?
स्त्री चे की पुरूषाचे? Uhoh
बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलीत तुम्ही. हा प्रश्न मात्र सफाईने टाळलात. Proud

सुंदर बापट तुम्ही अजूनही स्पष्ट केलेले नाही की तुमचे प्रोफाईल कोणते?
स्त्री चे की पुरूषाचे?>>>

ते टीपा पडताळून पहाण्यासाठी रिकामं सोडलयं त्यांनी. ओळखा बघू!

मी कुणाचं प्रोफाईल पाहण्याचा भोचकपणा करत नाही, पण यांचं पाहिलं.
काहीच लिहिलं नाहिये, म्हणजे नक्की काय समजायचं आम्ही? Proud

एकंदरीत तुम्हि जे काहि म्हणाल्यात किव्व म्हणालात ते पटलं मला..
तुमची विधानं आणि तुम्हि Lol खरी का खोटी यावर वाद घालायला अशीच काहि मंडळी आल्येत आणि.. :p

सुंदर बापट तुम्ही अजूनही स्पष्ट केलेले नाही की तुमचे प्रोफाईल कोणते?
स्त्री चे की पुरूषाचे? smiley-5.gif

मायबोलीवर अनेक विनोदी आणि विडबनात्मक लेख वाचण्यात आले...
परंतु पहिल्यांदाच मायबोलीवर चे लिखाण आगावू वाटत आहे.. लेखकाची कीव करावीशी वाटते .
Tried acting smart but proved funny....

मास्तुरे, अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणतात! Happy Wink

खरा नेटिझन - हे कुठे सापडले तुम्हाला? मलाहि सांगा. म्हणजे मी तिथे जाईन.
इथे स्त्री-पुरुषच काय, भाजप-काँग्रेस, ब्राह्मण-अब्राह्मण, भारतात रहाणारा की परदेशात रहाणारा असल्या वाट्टेल त्या प्रकारे भेद करून एकमेकांना वैयक्तिक शिव्या देणे याखेरीज कुठलीहि चर्चा चालत नाही!!

तुमची विधानं खरी का खोटी यावर वाद घालायला अशीच काहि मंडळी आल्येत आणि.. >> स्वतःला पण धरा त्यात रानडे, तुम्ही पण आलातच की इथे.

ज्ञानेश, बेफि Proud

अत्यंत फालतू आणि निरूपयोगी लेख..>>> नंदिनी, हा काही लेख आहे का गं? मला तर ही फक्त मळमळ वाटतेय Wink

क्या बात झक्की.. ह्या शिवाय दुसरं काहिच चालत नाहि मी तर म्हणीन..
जोशी मी अलो, बोलून गेलो.. वादात मला काहिच इंटरेस्ट नाहि..

बाकि बापट तुमच म्हणणं बर्‍यापैकी बरोबर आहे..

त्या धाग्याच फाष्टेष्ट हन्ड्रेडचं रेकॉर्ड हा धागा तोडतोय वाटतं. Happy

बाकी लेख "आवरा" कॅटेगरीतला आहे.
माझ्या आजवरच्या आंतरजालीय कारकिर्द लक्षात घेवुन ह्यातल्या टिपा नियम म्हणुन लावल्या तर बरेच उलटे सुलटे निकाल येत होते.

Pages