नेटवर अनेकदा स्त्री प्रोफाईलशी सामना होतो. त्या ख-या कि खोट्या याबद्दल मनात गोंधळ होतो. अशा वेळी काय करावं याबद्दल माझ्या अनुभवातून मायबोलीच्या सदस्यांना माहिती देत आहे. ( मी इथे नवीन आहे)
१) एखादं स्त्री प्रोफाईल खूप विनोद करू लागलं कि सावध व्हावं. ख-या स्त्रियांचं विनोदाशी वावडंच असतं. ( त्यांना विनोद आवडतात पण झेपत नाहीत आणि करता येत नाही हा कळीचा मुद्दा आहे )
२) स्त्री प्रोफाईल डिस्कशन फोरम मधे भाग घेतं आणि विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकतं. प्रत्यक्षात स्त्रिया असे फोरम टाळतात. अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.
३) स्त्री प्रोफाईल चित्कारण्याचे आवाज टाईप करतं. उदा. ईईईईईई किंवा शीईईईईईई असे. प्रत्यक्षात स्त्रिया कितीही कर्कश्श असतील तरी असं त्या लिहून दाखवत नाहीत.
४) बरेचदा फेक प्रोफाईल फोटो लावतं. प्रत्यक्षात स्त्रिया पानं, फूल, निसर्गचित्र, अॅक्ट्रेस यांची चित्रं लावतात. जुन्या परिचयाच्या स्त्रिया फक्त आपले जुने फोटो लावताना दिसतात. माझ्या माहितीत एक आज्जी आहेत त्या स्वतःचे दुरून काढलेले फोटो लावत असतात. क्वचितच फोटोवाल्या स्त्रिया ख-या निघतात. अपवाद असतोच तसं.
५) फेक स्त्रिया ताबडतोब लक्ष वेधून घ्यायला सुरूवात करतात. कविता, चित्रं असलं काही तरी टाकत असतात. प्रत्यक्षात स्त्रिया ओळखी झाल्याशिवाय असं वागत नाहीत.
६) खोट्या स्त्रिया कधीच कुकिंगबद्दल काही लिहीत नाहीत. ख-या स्त्रिया मात्र जुन्या असोत कि नव्या अशा ठिकाणी पटकन लिहीत्या होतात.
७) खोट्या स्त्रिया क्रिकेट बद्दल भरभरून बोलतात. ख-या स्त्रियांना ते आवडत नाही.
८) खोट्या स्त्रिया राजकारणावर मार्मिक कोट्या करतात. ख-या स्त्रियांना त्यातलं काही कळत नाही.
९) खोट्या स्त्रिया अर्थकारणावर बोलतात. ख-या स्त्रियांना त्यात काही रस नसतो.
१०) खोट्या स्त्रियांना अपराधी भावना असते. त्यातून त्या सारख्या क्षमा मागतात. क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही. म्हणतात ना, मॅन लर्न्स फ्रॉम हिज मोस्टेक्स.....नॉट वूमेन !
वरील दहा टिपा समजून घेतल्या तर तुम्हाला खोट्या स्त्रिया ओळखता येणं कठीण नाही. ओळ्कहल्यावर त्यांना तसं कळू देऊ नका. फक्त निरीक्षण करत रहा. त्यांचे हेतू तपासून पहा. काही दिवसांनी त्या ख-या कोण हे आपोआपच कळून येइल.
धन्यवाद.
सुंदर बापट
समदं डोस्क्यावरनं गेलं. कायबी
समदं डोस्क्यावरनं गेलं. कायबी झेपलं नाय. कायपन कड्या पाठिवत्यात लोक टपालात.
उद्देश चांगला असला तरी
उद्देश चांगला असला तरी लिखाणाची पद्धत चुकली आहे तुमची बापट.
फरक काय पडतो प्रोफाईल स्त्री
फरक काय पडतो प्रोफाईल स्त्री किंवा पु आहे याचा .............
यावर चाटींग करणारे कुठे आपल्या सहका-याशी एकनिष्ठ असतात ते आपल आज पूजा कल दूजा ,नाहीतर
EMI ( extra marital Item) साठी प्रयत्न करत असतात अशा लो़कांची फसवणूक झाली तर झाली .
विनोदी लेखन वाट्ट ..........
>>ख-या स्त्रियांचं विनोदाशी
>>ख-या स्त्रियांचं विनोदाशी वावडंच असतं.
>>स्त्री प्रोफाईल डिस्कशन फोरम मधे भाग घेतं आणि विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकतं. प्रत्यक्षात स्त्रिया असे फोरम टाळतात. अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.
>> खोट्या स्त्रिया राजकारणावर मार्मिक कोट्या करतात. ख-या स्त्रियांना त्यातलं काही कळत नाही.
>> खोट्या स्त्रिया अर्थकारणावर बोलतात. ख-या स्त्रियांना त्यात काही रस नसतो.
>>खोट्या स्त्रियांना अपराधी भावना असते. त्यातून त्या सारख्या क्षमा मागतात. क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही.
>>खोट्या स्त्रिया क्रिकेट बद्दल भरभरून बोलतात. ख-या स्त्रियांना ते आवडत नाही.
एकंदरीत लेख बघता लेखक आजतागायत एकाच स्त्रीला भेटला असावा आणि नंतर ती सुद्धा फेक निघाली असा माझा दाट संशय आहे
एकंदरीत लेख बघता लेखक
एकंदरीत लेख बघता लेखक आजतागायत एकाच स्त्रीला भेटला असावा आणि नंतर ती सुद्धा फेक निघाली असा माझा दाट संशय आहे..
>> ह्यांना मानसिक धक्का बसला आहे.. सीक झालेत ते..
फुल्ल टीपी.
फुल्ल टीपी.
हही हही हही हही!
हही हही हही हही!
क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे
क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही >>>
सॉरी पण राहावलेच नाही..
मुद्दाम उकसवायला लिहिलेल्या वाक्यांची रेलचेल आहे, पण माबोकरांनी प्रगल्भता दाखवली आहे
जॉक्स अपार्ट,
माझ्या फंड्यानुसार हलकीफुलकी फ्लर्टींग करून खरेखोटे प्रोफाईल चेक करावे
तळटीप - त्या आधी ग'फ्रेंड असल्यास तिला विश्वासात घ्यावे. नसल्यास मज्जाच आहे.
खोदसाळपना करायला लिहिले का
खोदसाळपना करायला लिहिले का बापटा ?
लेखकाच्या दृष्टेपणाचे कौतुक
लेखकाच्या दृष्टेपणाचे कौतुक करावे तितके थोडेच.
हाहाहा अनोळखी स्त्रीयांना
हाहाहा
अनोळखी स्त्रीयांना add का करता राव?
आणी खोटे पुरुष प्रोफाईल कसे
आणी खोटे पुरुष प्रोफाईल कसे ओळखायचे..... ते पण लिहा ना. +१
अत्यंत फालतू आणि निरूपयोगी
अत्यंत फालतू आणि निरूपयोगी लेख..>>>+११११११११
लेखकाला स्त्रियांबद्दल बरीच माहिती दिसतीये . स्त्री profile च्या शोधत राहण्याशिवाय दुसरे उद्योग नाहीयेत वाटतं ह्यांना
मला वाटले की खरच काही उपयुक्त
मला वाटले की खरच काही उपयुक्त टिपा असतील. कोणाला तरि उपयोगी पडतील असे वाटले पण- अगदिच फ़ालतु लेख (?) आहे.
इतक जुना व असा लेख परत वर कसा आला पण?
----------------------------
नेटवरच्या खोट्या स्त्री प्रोफाईल्स कशा ओळखाव्यात - दहा टिपा
सुंदर बापट | ११ आप्रिल, २०१२ - १८:१६
मला वाटले की खरच काही उपयुक्त
मला वाटले की खरच काही उपयुक्त टिपा असतील. कोणाला तरि उपयोगी पडतील असे वाटले पण- अगदिच फ़ालतु लेख (?) आहे.
इतक जुना व असा लेख परत वर कसा आला पण? अ ओ, आता काय करायचं >> +१
अरे देवा .. मी तर फुल, फळ, पान नै ठेवले . स्वतःचा फोटू ठेवला.. म्हणजे मी 'खोटी इस्त्री'
अरे देवा .. मी तर फुल, फळ,
अरे देवा .. मी तर फुल, फळ, पान नै ठेवले . स्वतःचा फोटू ठेवला.. म्हणजे मी 'खोटी इस्त्री' >>>
ओ स्मायल्या जरा बारीक टाका.
ओ स्मायल्या जरा बारीक टाका. आमची स्मायली एकदम चिल्लर पिल्लर होऊन गेली ना... तुम्ही प्रोफेसर तर नाहीत ना ?
हा घ्या सोपा उपाय.
हा घ्या सोपा उपाय. हाकानाका.
http://www.maayboli.com/node/45875
तुम्ही प्रोफेसर तर नाहीत ना ?
तुम्ही प्रोफेसर तर नाहीत ना ? >> नै ओ.. लेकरांचे शिव्याशाप या जन्मी तरी लाभणे नै मला..
बाकी बाळू पॅराजंपे तुम्ही दिलेली लींक म्हणजे _/\_ .. ज्योतिषावर माहा इस्वास नाय ..
जुन्या लोकांच रैगिंग.
जुन्या लोकांच रैगिंग.
अत्यंत फालतू आणि निरूपयोगी
अत्यंत फालतू आणि निरूपयोगी लेख..>>>+११११११११
लेखकाला स्त्रियांबद्दल बरीच माहिती दिसतीये . स्त्री profile च्या शोधत राहण्याशिवाय दुसरे उद्योग नाहीयेत वाटतं ह्यांना>>>> अनुमोदन!
आम्हाला आजवर (अं.जा.वरिल..
आम्हाला आजवर (अं.जा.वरिल..
) एकंही खरी स्त्री प्रत्तेक्ष न भेटल्यामुळे ,आंम्ही सदर ढाग्या विषय माणत नै..अशे झाहिर करतो हाये! 
आम्हाला आजवर (अं.जा.वरिल..
आम्हाला आजवर (अं.जा.वरिल.. डोळा मारा ) एकंही खरी स्त्री प्रत्तेक्ष न भेटल्यामुळे ,आंम्ही सदर ढाग्या विषय माणत नै..अशे झाहिर करतो हाये!>>>

मग तुम्ही फेक स्त्री आयडीजशी चॅट करत होता ह्याचीबी कबुली देउन टाका लगे हात
(No subject)
एक नंबर फालतू लेख. अकलेचे
एक नंबर फालतू लेख.:राग:
अकलेचे तारे तोडणे म्हणजे काय हे हा लेख वाचुन लक्षात येत आहे.
अहो, मंदा r मंदा r , बसा तवा
अहो, मंदा r मंदा r , बसा तवा चुल्ह्यावर
येती मेंदूला झटके, वीजेविना बिन शॉकर !
अहो, मंदा r मंदा r, लोटा कधी हाणू नये
शाहभौच्या कमळाला खोटा कधी म्हणू नये
अहो, मंदा r मंदा r , का हो रडनं, कुढनं
येड्या, गप्पांतली गोष्ट, म्हणू नको रे लोढणं !
अहो, मंदा r मंदा r, चार क्लोनांचा विकार
करी सुष्टांवर वार, आणि दुष्टांचा स्विकार,
कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्ती, प्राणी, कीटक अथवा आयडी यांच्याशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असे समजावे.
पण बापट लेख टाकुन कटाप झाले..
पण बापट लेख टाकुन कटाप झाले.. २ वर्ष गायब

स्वतःचा लिंगभेद कळुच दिला नाही
(No subject)
इथे आभासी प्रोफाईलबद्दल चर्चा
इथे आभासी प्रोफाईलबद्दल चर्चा चाललीय. एका व्हॉट्स अप ग्रुप मधे रिअल लाईफ बद्दल वादावादी चालू आहे. खाली एक व्हिडीओ देत आहे. काळजीपूर्वक पहा. गौप्यस्फोट करण्याआधी कुणी करतंय का ते पहायचे.
https://www.youtube.com/watch?v=CFOIJK0Jwcs
एकंदरीत लेख बघता लेखक
एकंदरीत लेख बघता लेखक आजतागायत एकाच स्त्रीला भेटला असावा आणि नंतर ती सुद्धा फेक निघाली असा माझा दाट संशय आहे अ ओ, आता काय करायचं>>+१
Pages