नेटवरच्या खोट्या स्त्री प्रोफाईल्स कशा ओळखाव्यात - दहा टिपा

Submitted by सुंदर बापट on 11 April, 2012 - 05:16

नेटवर अनेकदा स्त्री प्रोफाईलशी सामना होतो. त्या ख-या कि खोट्या याबद्दल मनात गोंधळ होतो. अशा वेळी काय करावं याबद्दल माझ्या अनुभवातून मायबोलीच्या सदस्यांना माहिती देत आहे. ( मी इथे नवीन आहे)

१) एखादं स्त्री प्रोफाईल खूप विनोद करू लागलं कि सावध व्हावं. ख-या स्त्रियांचं विनोदाशी वावडंच असतं. ( त्यांना विनोद आवडतात पण झेपत नाहीत आणि करता येत नाही हा कळीचा मुद्दा आहे )
२) स्त्री प्रोफाईल डिस्कशन फोरम मधे भाग घेतं आणि विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकतं. प्रत्यक्षात स्त्रिया असे फोरम टाळतात. अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.
३) स्त्री प्रोफाईल चित्कारण्याचे आवाज टाईप करतं. उदा. ईईईईईई किंवा शीईईईईईई असे. प्रत्यक्षात स्त्रिया कितीही कर्कश्श असतील तरी असं त्या लिहून दाखवत नाहीत.
४) बरेचदा फेक प्रोफाईल फोटो लावतं. प्रत्यक्षात स्त्रिया पानं, फूल, निसर्गचित्र, अ‍ॅक्ट्रेस यांची चित्रं लावतात. जुन्या परिचयाच्या स्त्रिया फक्त आपले जुने फोटो लावताना दिसतात. माझ्या माहितीत एक आज्जी आहेत त्या स्वतःचे दुरून काढलेले फोटो लावत असतात. क्वचितच फोटोवाल्या स्त्रिया ख-या निघतात. अपवाद असतोच तसं.
५) फेक स्त्रिया ताबडतोब लक्ष वेधून घ्यायला सुरूवात करतात. कविता, चित्रं असलं काही तरी टाकत असतात. प्रत्यक्षात स्त्रिया ओळखी झाल्याशिवाय असं वागत नाहीत.
६) खोट्या स्त्रिया कधीच कुकिंगबद्दल काही लिहीत नाहीत. ख-या स्त्रिया मात्र जुन्या असोत कि नव्या अशा ठिकाणी पटकन लिहीत्या होतात.
७) खोट्या स्त्रिया क्रिकेट बद्दल भरभरून बोलतात. ख-या स्त्रियांना ते आवडत नाही.
८) खोट्या स्त्रिया राजकारणावर मार्मिक कोट्या करतात. ख-या स्त्रियांना त्यातलं काही कळत नाही.
९) खोट्या स्त्रिया अर्थकारणावर बोलतात. ख-या स्त्रियांना त्यात काही रस नसतो.
१०) खोट्या स्त्रियांना अपराधी भावना असते. त्यातून त्या सारख्या क्षमा मागतात. क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही. म्हणतात ना, मॅन लर्न्स फ्रॉम हिज मोस्टेक्स.....नॉट वूमेन !

वरील दहा टिपा समजून घेतल्या तर तुम्हाला खोट्या स्त्रिया ओळखता येणं कठीण नाही. ओळ्कहल्यावर त्यांना तसं कळू देऊ नका. फक्त निरीक्षण करत रहा. त्यांचे हेतू तपासून पहा. काही दिवसांनी त्या ख-या कोण हे आपोआपच कळून येइल.

धन्यवाद.

सुंदर बापट

गुलमोहर: 

गिरीकंदजी
अनेकदा या स्त्रिया म्हणजे पुरूषच असतात. पुरूष आयडी म्हणजे स्त्रिया असं आढळलेलं नाही. असेल तर माहीत नाही

अरे वा!! सभासद झाल्यापासुन २५व्या मिनीटाला तुम्ही हा लेख पाडलात यावरुन काय समजायचं ते समजुन जातील माबोकर..

अहो ! मायबोलीकरांच्या माहीतीसाठी आणि त्यांना सावध करण्यासाठीच सभासदस्त्व घ्यावं लागलं. तसं लिहीता येत नाही ना..

कल्पना चांगली आहे, पण लेख फारसा पटला नाही. स्त्री-विरोधी मतं वाटली.
लेखाऐवजी खाजगीत ईमेल फिरवला असता तर योग्य ठरलं असतं. जाहीर फोरम मधे असं लिहीणं ( स्त्री-विरोधी मतं वगैरे) कितपत योग्य आहे ते ठरवा.

>>मायबोलीकरांच्या माहीतीसाठी आणि त्यांना सावध करण्यासाठीच सभासदस्त्व घ्यावं लागलं. तसं लिहीता येत नाही ना..
बरोबर आहे बापट......इथे काही लोकं स्वतःला माबोचे सर्वेसर्वा समजतात, तुम्ही लक्ष देऊ नये Happy
आता तुमच्या सभासदत्वाला 39 मिनिटे 29 सेकंद झाली आहेत. Proud

अनेकदा मुलं अशा मुलींच्या मागे वेळ घालवतात. नंतर त्यांना जो मानसिक धक्का बसतो तो बसू नये म्हणून असा लेख लिहायला नको का ?

खरा नेटिझन इतर प्रोफाईलच्या लिंगाचे अनुमान लावत बसत नाही.
आणि त्याला "मानसिक धक्का" वगैरे तर अजिबातच बसत नाही.

सुंदर बापट, आपण मायबोलीवर नविन आहात ना? आधी इथली चर्चा/मते/अथवा डिस्कशन फोरम वाचायचे होते मग हा लेख लिहायचा होता ना?

उगाच मिळाला कीबोर्ड आणि लागला बडवायला.

अत्यंत फालतू आणि निरूपयोगी लेख..

हे विनोदी लेखन म्हणून लिहिल असेल तर ठीक आहे :), असे १० थिन्ग्स अबाऊट मेन्/वुमेन चे मेल फिरत असतातच
पण हे सिरियसली लेहिले असेल तर ...................... कठीण आहे Happy

चोरलेलं नाही मेल मधून.>>>

अगदी अनुभसिद्ध!! Proud

बरेचसे अनुमान बाद झालेले दिसतात!!
शेवटी इतरांना जागृत करायचे अभियान हातात घेतले!!

त्यांना विनोद आवडतात पण झेपत नाहीत आणि करता येत नाही हा कळीचा मुद्दा आहे>>

अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.>>

प्रत्यक्षात स्त्रिया कितीही कर्कश्श असतील तरी>>

ही सर्व 'असंयुक्ता' मते आहेत, ह्यांना येथे अ‍ॅप्रूव्हल लागते

अनेकदा मुलं अशा मुलींच्या मागे वेळ घालवतात. नंतर त्यांना जो मानसिक धक्का बसतो तो बसू नये म्हणून असा लेख लिहायला नको का ? >>>> हे जबरी आहे. Lol

सगळ्यांचा इतका विचार केलात त्या बद्दल धन्यवाद.
लेख पटला नाही.

एक शंका - माबो सदस्य झाल्यावर अर्ध्यातासाच्या आत लेख लिहीलात तोही शुध्धलेखनाचे एकही चुक न करता. Uhoh

>>> १) एखादं स्त्री प्रोफाईल खूप विनोद करू लागलं कि सावध व्हावं. ख-या स्त्रियांचं विनोदाशी वावडंच असतं. ( त्यांना विनोद आवडतात पण झेपत नाहीत आणि करता येत नाही हा कळीचा मुद्दा आहे )

>>> ४) बरेचदा फेक प्रोफाईल फोटो लावतं. प्रत्यक्षात स्त्रिया पानं, फूल, निसर्गचित्र, अ‍ॅक्ट्रेस यांची चित्रं लावतात. जुन्या परिचयाच्या स्त्रिया फक्त आपले जुने फोटो लावताना दिसतात. माझ्या माहितीत एक आज्जी आहेत त्या स्वतःचे दुरून काढलेले फोटो लावत असतात. क्वचितच फोटोवाल्या स्त्रिया ख-या निघतात. अपवाद असतोच तसं.

मी तुम्हाला हवं असल्यास थोपु वरचं एक प्रोफाईल देतो. ती महिला साधेसुधे नव्हे तर प्रौढांसाठीचे विनोद आपल्या पानावर टाकते. तिने आपली प्रकाशचित्रे व संपूर्ण व्यक्तीगत माहिती आपल्या पानावर दिलेली आहे.

<<स्त्री प्रोफाईल डिस्कशन फोरम मधे भाग घेतं आणि विद्वत्तापूर्ण भाषणं ठोकतं. प्रत्यक्षात स्त्रिया असे फोरम टाळतात. अशा ठिकाणी मतं देणं त्यांना जमत नाही.<< Uhoh

<<<फेक स्त्रिया ताबडतोब लक्ष वेधून घ्यायला सुरूवात करतात. कविता, चित्रं असलं काही तरी टाकत असतात. प्रत्यक्षात स्त्रिया ओळखी झाल्याशिवाय असं वागत नाहीत.<< Uhoh

<<<क्षमा मागणे हे ख-या स्त्रीचे लक्षण नाही<<< Uhoh Uhoh

Pages