झणझणीत लसुण-मसाला चटणी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 April, 2012 - 02:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) सुके खोबरे १ वाटी (किसुन)
२) १ गडा किंवा लसुण पाकळ्या सोलून
३) चवीनुसार मिठ (साधारण १ चमचा)
४) १ चमचा लाल तिखट

क्रमवार पाककृती: 

आता क्रम वरती टाकले आहेत त्यामुळे क्रमवार पाककृती तशी काही राहीलीच नाही. वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमधून फिरवा आणि भाकरी किंवा चपातीसोबत कधीही खा. एकदम तोपासु.

हाहाहा

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ चमचा
अधिक टिपा: 

१) मिरची पुड ऐवजी तुम्ही सुक्या मिरच्याही वापरू शकता.

२) जर जास्त टिकवायची असेल तर खोबरे थोडे भाजून घ्या.

३) तिखटाचे प्रमाण कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..