Submitted by kalpana_053 on 7 September, 2008 - 03:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
उकडलेले बीट मध्यम एक,
दोन केळी,
गोड दही वाटीभर,
साखर चार चमचे,
मीठ चिमूटभर
क्रमवार पाककृती:
उकडलेल्या बिटाचे व केळाचे बारीक तुकडे करून बाऊल मध्ये घ्यावेत. त्यात वाटीभर गोड दही, साखर व चिमूटभर मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करावे व फ्रिजमध्ये ठेऊन द्यावे. जेवणाचे वेळी फ्रिजमधून काढून सर्व्ह करावे.
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
बीटामुळे रंग खूप छान येतो. एरवी स्वीट डिश म्हणूनही जेवणानंतर छान लागेल. बीट आयर्न वाढवण्यासाठीही उपयोगी असते. (कच्चे बीट थोडे उग्र लागते.) लहान मुलांना खूप आवडेल. दही आंबट असल्यास थोडे दूध घालावे.
माहितीचा स्रोत:
--
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा