दारु सोडवायची आहे

Submitted by हर्ट on 6 April, 2012 - 05:22

नमस्कार. हा विषय सुरु करताना खरे तर मला फार फार शल्य वाटत आहे पण हा कुणाच्या तरी आयुष्याचा आणि त्या व्यक्तीच्या संसाराचा प्रश्न आहे. माझा भाऊ वयाच्या ३० व्या वर्षापासून खूप खूप दारु पितो. त्याला ही सवय त्याच्या काही मित्रांनी लावली. त्यावेळी आम्ही अगदी लहान लहान होतो. त्याला टोकले तो आणखीनच पिऊन यायचा. त्याची पहिली पत्नी निवर्तली. तिच्यापासून त्याला एक मुलगी पण आहे. तिला खरे तर आम्हीच लहानाचे मोठे केले. भावाचे दुसरे लग्न करुन देणे खूप गरजेचे होते. पण मधे बहिणींचे क्रम होते. तरीही मी त्याचे दुसरे लग्न स्वतः त्याच्याकरिता मुली बघून त्याच्या वयाची ४० पुर्ण झाल्यानंतर करुन दिले. त्याचे दारुचे व्यसन इतके विकोपाला गेले को तो रोज २४ तास नशेतच वावरतो. आता नोकरी सोडली. चांगला पोलिस ईन्स्पेक्टर होता. पण नोकरी सोडली. बायको त्याच्यासोबत राहू शकली नाही. ती काही वर्षांपासून तिच्या माहेरीच असते. कारण हा तिला सारखे मारायचा, रागवायचा, उठसुट भांडणे करायचा. वहिनी अगदी सुसंस्कृत घरातली आहे. मला कायम गिल्ट येत असते की मी का भावाचे लग्न करुन दिले. चुक तर नाही ना केली? पण एक आशा होती की तो लग्नानंतर दारु सोडून देईन वा कमी तरी करेन. आता वहिनी माहेरी गेल्यानंतर फक्त आई आणि तोच घरी एकटा राहतो. तर त्याने आईलाही त्रास देणे, छळ करणे सुरु केले. दारुच्य नशेत तो अगदी अमानुष होतो. इतका की वाटत नाही हा आपला भाऊ आहे. मी आता आईला कायमस्वरुपी माझ्याकडे आणायचा निर्णय घेतला आहे. सगळे जण म्हणतात माझा भाऊ दारुच्या नशेत नसताना अत्यंत देवमाणूस असतो पण ऐरवी तो राक्षसच असतो. माझ्या भावाची मुलगी आता २२ वर्षाची होत आहे. काही वर्षांनी तिच्या लग्नाबद्दल आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. आईचे म्हातारपण जवळ येत आहे. सगळे काही असून फक्त दारुपायी आमचे घर खिळखिळे होत आहे.

मला इथे काही मार्गदर्शन मिळेल का? असे विषय समाजात आपण फार उजेडात आणत नाही. कारण बदनामीची भिती असते. पण इथे मला माझे घर, माझ्या भावाचे उर्वरीत आयुष्य, पुतणीचे भविष्य ह्या सगळ्यांचा विचार करावयाचा आहे.

आपल्या महाराष्ट्रात खास करुन विदर्भात दारु मुक्ती संस्था आहेत का? मला माझ्या भावाला काही महिने तिथेच ठेवून बघायचे आहे. जर कुणाला काही संस्था माहिती असतील किंवा दारुवर उपचार करणारे दवाखाने माहिती असतील तर मला त्यांचे पत्ते द्या.

ह्या पुर्वी भावाने एकेठिकाणी उपचार करणे सुरु केले होते पण तो म्हणे की ती औषध घेतली की त्याचे पोट फार खोलवर दुखते आणि दारु प्यायली की एकदम बसते. त्याला दारु हेच आता एक औषध वाटायला लागले आहे. एकीकडे माझी कर्करोगाने ग्रस्त झालेली ताई आहे. तिचा उपचार आहे. एकीकडे भाऊ आणि त्याची दारु आहे. ह्यामधून जाताना माझे काय होत आहे हे मी लिहू शकत नाही.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा जवळच्या एकीचा अनुभव
नवरा दारु प्यायचा अन घरीच येत नसत रात्र भर
दुसरीचा नवरा दारु प्यायचा अन मारहाण करायचा
त्यातल्या दुसरी ने एक औषध दीले नवर्याला
चेम्बुर -दादर मधे मिळते ४ महीन्याचा कोर्स आहे

फोन नंबर:
चेम्बुर ०२२३२२६५७७७

दादर २४१६३१५५ , २४१६३९४०

नमस्कार,

मी आत्तापर्यंत सर्वांनी दिलेले प्रतिसाद वाचले, पण मला १ पश्न विचारायचा आहे की, जर एखादी व्यक्ती अंगाणे बारीक असेल आणि व्यसनमुक्ती केंद्रात यायला तयार नसेल तर त्याला समजा औषध द्यायचे असेल तर त्या औषधाचा काही उलटा परीणाम तर होणार नाहि ना? कारण माझ्या ओळखितली १ व्यक्ती आहे ते अंगाणे भरपुर बारीक आहेत, त्यांच्यामते ते जास्त पित नाहीत. पण त्यांच्या पत्नीला त्याचापण फार त्रास होतो आहे. आणि ते बारीक असल्याने ती औषध द्यायलाही घाबरते आहे. कृपया याबाबतीत सल्ला द्यावा.

धन्यवाद.

माझ्या भावाला आम्ही पंधरा दिवसापुर्वी मुक्तांगनमधे पाठवले. त्याला सुरवातीला तिथे करमले नाही. म्हणाला जेलमधे असल्यासारखे वाटते. मग मात्र रुळला. आता परत त्याला तिथे करमत नाही आहे. पण १८ दिवस झालेत तो दारुपासून वंचित आहे म्हणून आम्हा सर्वांना फार आनंद होतो आहे. तिथे प्रत्येक व्यसनाधिन व्यक्तिला एक मानसोपचार तज्ञ दिला जातो. मी त्याच्या तज्ञाशी बोललो. ती म्हणाली जेंव्हा आमचे 'सेशन' असतात तेंव्हा आम्ही आमच्या विद्यार्थांकडे अभ्यासू नजरेने बघत असतो. हे कसे ऐकतात. काय भाव व्यक्त करतात. काय अभिप्राय देतात. पण माझ्या भावाच्या बाबतीत त्या म्हणाला त्यांचा कल खूप कमी आहे सेशन्सकडे. म्हणून कदाचित येथून परत अकोल्याला गेल्यावर परत दारु घेणे सुरु होऊ शकते. पुण्याला कृपा आणि नित्यानंद अशा दोन Re-habilitation च्या संस्था आहे. तिथे नेऊन बघा. असे त्या म्हणाल्यात. मला वाटत मी त्याला तिथेच सहा महिने ठेवावे. नित्यानंद आणि कृपानंद्पेक्षा मी सुनंदा अवचट आणि अनिल अवचट ह्यांच्या मुक्तांगनाविषयी जास्त ऐकून आहे. त्या अजून एक सांगत होत्या की व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे माणसे विकृत होतात. त्यांच्यातील ही विकृती दुर करायला प्रभावी मानसोपचाराची गरज असते. माझ्या मते असे एक काळजीवाहू पण तरीही बंदीस्त असे वातावरण जिथे आहे तिथे त्याला ठेवावे. जेणेकरुन दारुशी संपर्क येणार नाही.

नक्कीच बी. जोरदार प्रयत्न करायला हवेत. आणि तू ज्या कळकळीने हे करतो आहेस, त्याला खरेच तोड नाही.
आम्हा सर्वांच्या शुभेच्छा !

पुण्याला कृपा आणि नित्यानंद अशा दोन Re-habilitation च्या संस्था आहे. तिथे नेऊन बघा. असे त्या म्हणाल्यात.>>>>>>>> अरे पण त्या मुक्तांगणशी संबंधित असुन दुसरीकडे न्या असे का म्हणाल्या?

बी, त्यांना तू मुक्तांगणातच ठेव! तुला आणि भावाला शुभेच्छा!

मुक्तांगणाला प्राधान्य द्या. अन पुन्हा पुन्हा पाठवा.
याआधी मी बहुतेक माझ्या मामाचा इथे उल्लेख केला होता. त्याला मुक्तांगणात गेले २-३ वर्षे १-१ म. असे ठेवले होते. घरी परत आला की सुरू करायचा. Sad
अंती सांगण्यात आनंद वाटतो की त्याची दारू आता सुटली आहे. एकुलत्या एका मुलाला (तो व्यसनी झाला होता ) गेल्या वर्षी त्याने गमावले. Sad सध्या घरी न रहता दोघे वृध्दाश्रमात रहायला गेले १ ता. पासून. तिथे माणसांची सोबत राहिल..

नमस्कार,

माझा प्रश्न असा होता कि माझा १ मित्र आहे तो नेहमी नाही पण कधीतरी म्हणजे महिन्या-१ महिन्याने दारु पितो पण त्याला सुपारी अथवा बडिशोप अथवा रोज लागते पण २ दिवसांपुर्वी त्याने मला हे सर्व सोडण्याची तयारी दाखवली पण त्याच्याकडुन हे स्वताहुन सुटेल असे त्याला वाटत नाही. त्याने मला सांगितले कि तु काहिहि कर पण असे काहितरी कर अथवा काहि औषध असेल तर बघ. कृपया मला या गोष्टी सोडविण्यासाठी काहि उपाय अथवा मुंबईमध्ये कोणती संस्था असेल तर सांगावे.

धन्यवाद,
अक्षरा

मी या परीस्थीती मधुन गेलोय आमच्याकडे खेडेगावात अगदी कासराभर अंतराने गावठी दारु भेटते परीनामी माझे चुलते खुप नशेच्या आहेत त्यांना दारु नसल्यावर ते थरथर कापततात
रस्त्याच्या कडेला दारु सोडवा नावाचे पोस्टर असते त्यांच्याकडे चुकुनही जाऊ नका

अक्षरा, बडीशेप किंवा सुपारीही वाईट नाही. दोन्ही औषधी आहेत, सोबत तंबाखू नसेल तर चांगले. पण व्यसन अर्थातच वाईट.

मेंढका, त्या पोस्टरवाल्यांचा वाईट अनुभव असेल तर तो पण लिहिणार का ? बर्‍याच ठिकाणी बघितलेय ते पोस्टर.

ते कसलेतरी पातळ औषध देतात ते औषध घेतल्यावर दारु पिनाराला भयंकर ऊलट्या होतात इतक्या ऊलट्या होतात कि आतड्यांना सुज येते अजुनही बरेच अघोरी ऊपाय करतात

Pages