अमेरिकेत हायस्कूल पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी उपलब्ध असलेले पर्याय तसेच शैक्षणीक खर्चाच्या नियोजन याबाबत चर्चा करण्यासाठी हा धागा.
उपयुक्त लिंक्स:
http://www.savingforcollege.com/
http://www.sec.gov/investor/pubs/intro529.htm
AP course बद्दल अधिक माहिती http://www.collegeboard.com/student/testing/ap/about.html
उपयुक्त माहिती असलेल्या पोस्ट्स:
स्वाती_दांडेकर | 6 April, 2012 - 16:21
अमेरिकेत कॉलेज शिक्षणासाठी पैशांची तजवीज करायला पर्याय बरेच असतात, पण खात्रीपूर्वक मार्ग असे नसतात. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कॉलेजची फी सतत वाढत असते आणि आईवडिलांची बचत करण्याची कुवत कधीकधी त्यापुढे कमी पडू शकते.
मुलांच्या किंवा आईवडिलांच्या अपेक्षांना थोडा लगाम घालणे हा एक उपाय आहे, तसेच बरीचशी स्थानिक मुले साधारण ११वी १२वी पासून कसलीतरी लहानसहान कामे करून पैसे साठवतात हाही एक मार्ग आहे. त्यामुळे त्यांना पैसे खर्च करताना विचार करण्याची सवय लागते. स्कॉलर्शिप किंवा इतर ग्रँट अंडरग्रॅडला फारच थोड्या उपलब्ध असतात. पण युनिवर्सिटीत छोटीछोटी कामे उपलब्ध असतात, तिथे थोडे काम करून जेवणाचा खर्च किंवा रहाण्याचा खर्च भागू शकतो. अर्थात अभ्यास सांभाळून नोकरी कठीणच असते, पण शिकण्याची जिद्द असली तर काही मुले असे करतात. माझ्या माहितीत काही मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत फुलटाईम नोकरी करून वर्षाच्या जेवणाच्या खर्चाची तजवीज करतात. या नोकर्यांमधला अनुभव त्यांना इतर ठिकाणी उपयोगीही पडतो. उदाहरणार्थ, शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टसाठी.
बचत आणि गुंतवणुकीसाठी मी वापरलेले काही पर्यायः
१. UTMA/UGMA - ५२९ प्लॅनच्या पूर्वी हा एकच मार्ग होता - दर वर्षी मुलाच्या नावे प्रत्येक पालक, आजी-आजोबा किंवा इतर नातेवाईक $१३००० पर्यंत रक्कम जमा करू शकतात. Custodian मूल statutory vesting वयाचे होईपर्यंत मालक असतो, नंतर मुल स्वतः या अकौंटचा मालक असते. इतर कुठल्याही गुंतवणूकीसारखेच पर्याय असतात, व नुकसानीची शक्यता असते. मुलाच्या नावे टॅक्स रिटर्न भरल्यास रेट कमी असू शकतो -फक्त व्याज किंवा capital gain वर दर वर्षी टॅक्स लागू होतो. पैसे काढताना ते मुलाच्या नावाने असल्याने त्याच्या नावे बँक अकाउंट असल्यास थोडे सुलभ होते. कोणत्याही शाळा/कॉलेजसाठी ही रक्कम वापरता येते.
२. Educational Coverdell IRA - $२००० पर्यंत जमा करू शकतो ते आईवडिलांच्या उत्पन्नावर दरवर्षी बदलते. गुंतवणूकीचे बरेच पर्याय असतात. पैसे काढल्याच्या वर्षी १०९९Q हा आणखी एक फॉर्म मुलाच्या टॅक्स रिटर्नमधे जोडावा लागतो. शिक्षणासाठी वापरल्यास टॅक्स माफ असतो. कॉलेजची फी, पुस्तके, रहाणे, जेवण ह्यापैकी कोणताही खर्च करू शकतो. कोणत्याही शाळा/कॉलेजसाठी ही रक्कम वापरता येते.
३. ५२९ प्लॅन - दरवर्षी $१३००० पर्यंत प्रत्येक पालक किंवा नातेवाईक जमा करू शकतात. किंवा एकरकमी जमा केल्यास चार वर्षाचे जमा एकदम धरता येतात. गिफ्ट टॅक्सचे नियम याला लागू होतात. गुंतवणूकीचे बरेच पर्याय आहेत. अकौंट पालक आपल्या नावावर ठेवू शकतात. पैसे काढताना थोडे फॉर्म जास्त भरावे लागतात. काही स्टेट्समधे स्टेट टॅक्स मधे सवलत मिळते. काढताना शिक्षणासाठी वापरल्यास कर माफ - १०९९Q फॉर्म जोडावा लागतो. एका मुलाने न वापरल्यास दुसर्याला किंवा इतर नातेवाईकाला, नातवंडाला देता येतात. शिक्षणाच्या व्यतिरिक्त इतर खर्चासाठी काढल्यास वाढीव रकमेवर टॅक्स लागू होतो. कोणत्याही कॉलेजसाठी उपयोग करता येतो.
४. Prepaid Tuition Plan - प्रत्येक स्टेटचे नियम व तारखा वेगवेगळ्या आहेत. मोठ्या मुलासाठी तो १२ वर्षाचा असताना तेव्हाच्या स्टेट युनिवर्सिटीच्या फीइतकी रक्कम जमा केल्यास तो कॉलेजला गेला तेव्हाची फी कॉलेजला भरली गेली - जवळजवळ ३०% रिटर्न! स्टेटमधल्या कोणत्याही स्टेट युनिवर्सिटीत ट्युशनसाठी ही रक्कम वापरू शकतो. रहाण्या/जेवणाचा/पुस्तकांचा खर्च वेगळा. मूल प्रायवेट किंवा स्टेटबाहेरील कॉलेजला गेल्यास साधारण फेस व्हॅल्यूला पैसे वापरता येतात किंवा दुसर्या मुलासाठी किंवा नातवंडासाठी ठेवता येतात. आमच्या त्यावेळच्या अकलेनुसार दोन वर्षाची फी अशी भरली. असा फायदा पैसे एकरकमी भरल्यासच होतो, मासिक प्लॅनमधे भरल्यास फारसा फायदा झाला नाही अशी उदाहरणे बघितली आहेत. मोठा मुलगा स्टेट युनिवर्सिटीत गेला व त्याच्या दुसर्या वर्षासाठी फी यातून भरली. आणखी एक वर्षाची कधी वापरायची ते तो किती क्रेडिट घेणार आहे त्यावर ठरवणार आहे.
आणखी पर्याय नंतर लिहीन.
धन्यवाद शुगोल, कायद्याने
धन्यवाद शुगोल,
कायद्याने आम्ही २२ सप्टेम्बर पर्यन्त आम्हाला अमेरिकेत पाय ठेऊ शकत नाही .
तो SAT चे class करत आहे २ महिन्या साठी. 1 जुन ला तो SAT ची परिक्षा पण देणार आहे.
तर आजुन काय तयारी करु शकतो तो? How important is SAT subject for university or he should do something else.
ACT पण द्यावी. SAT subject
ACT पण द्यावी. SAT subject test काही ठिकाणी लागतात. कुठे प्रवेश घेणार? त्यावर सबजेक्ट टेस्ट द्यायच्या की नाही, दिल्यास कुठल्या ते ठरवावे. AP courses घेणार असल्यास त्याची तयारी सुरु करता येइल. इथे या सुमारास बहूतेक १०वी ची मुले ११वीचे कोर्सवर्क ठरवतात आणि अॅप्रुव करुन घेतात. तुम्ही जवळ जवळ पहिला ग्रेडिंग पिरीअड निम्मा उलटल्यावर येणार तेव्हा कोर्स ओवरबुक झाल्याने हवा तो कोर्स न मिळणे, स्केड्युलिंग कन्फ्लीक्ट वगैरे प्रश्न उद्भवू शकतात. शिवाय क्रेडिट ट्रान्सफर किती होतील? तुम्ही येणार त्या स्टेटच्या ग्रॅज्युएशनच्या नियमांची पूर्तता(स्टेटची परीक्षा), समर रिडिंग लिस्ट्स वगैरे बरेच काही लक्षात घेणे जरुरीचे आहे. १५ डिसेंबरच्या आसपास सेमिस्टर एंडच्या परीक्षा येतील. तुम्ही आत्तापासून या सगळ्याचा विचार करुन योग्य ती पावले उचलावीत.
http://www.nytimes.com/intera
http://www.nytimes.com/interactive/2013/05/17/business/college-essays.ht...
पैशांच्या नियोजनाबद्दल नाही हा लेख.
पण न्यू यॉर्क टाइम्स ने मागवलेल्या कॉलेज प्रवेश निबंधांमधील चार निवडक निबंध. मला वाचायला मजा वाटली.
अगदी टडोपा आहेत निबंध.
अगदी टडोपा आहेत निबंध.
दुव्याबद्दल धन्यवाद मेधा.
दुव्याबद्दल धन्यवाद मेधा. यावर्षी आमच्याकडे कॉलेज प्रवेशासाठी निबंधलेखन झाले. माझ्या मुलाने नॉट्रे डेम साठी लिहीलेला निबंध माझ्यासाठी टडोपा होता. :).
Pages