बाळ कैरीचे लोणचे..

Submitted by सुलेखा on 4 April, 2012 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१० -१२ बाळकैर्‍या.
४ टे.स्पुन मीठ.
१ टे.स्पुन मेथीदाणा.
१/४ टी.स्पुन्.खास लोणच्यासाठीचा हिंग.
१/२ टे.स्पुन हळद.
२ टे.स्पुन लाल तिखट.
४ टे.स्पुन मोहोरीची डाळ.
१/२टे.स्पुन बडीशोप.
१ /२ टे स्पुन तेल [जे रोज वापरत असाल ते.]
१ वाटीभर सरसो /मोहोरी चे तेल.[नेहमीचे घेतले तरी चालेल]

क्रमवार पाककृती: 

बाळ कैर्‍या धुवुन ,पुसुन त्याची डेखे काढावीं. नंतर सुरीने कैरीला उभा चिर देवुन त्यातील कोय काढावी.या कैर्‍यांना १ चमचा मीठ लावुन एका टोपात ७ ते ८ तास तशाच झाकुन ठेवाव्या.मीठ लावलेल्या कैर्‍या अशा दिसतील.
bal kaireeche lonache.. 0011.JPG
७-८ तासानी या कैर्‍यातले मीठाचे पाणी टाकुन द्यायचे आहे.
त्यानंतर आता लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे.
त्यासाठी मसाल्याचे साहित्य एका ताटात सज्ज आहे.balkaireeche lonache22.JPG
यातील मेथीदाणा १/२ टी स्पुन तेलावर मंद आचेवर परतुन घ्यावा.लालसर रंग आला कि लगेच त्यात हळद व हिंग घाला.गॅस बंद करुन परता,हिंग फुलल्याने मेथीदाणा व हिंगाचा वास येवु लागेल.मेथीदाणा व हिंग बारीक वाटुन घ्या.[मिक्सरमधे १ टे.स्पुन मोहोरीची डाळ टाकुन बारीक वाटले जाईल]
सर्व मसाल्याचे सामान एका ताटात एकत्र कालवा.
हा मसाला बाळकैर्‍यांमधे भरा.
पुन्हा झाकुन निदान एक दिवस तसेच ठेवा.
दुसर्‍या दिवशी सरसो तेल/शेंगदाणा तेल/रोज वापरातले तेल एका कढईत चांगले गरम करुन थंड करा.
थंड तेल लोणच्यावर ओता व चमच्याने लोणचे हळुवार पणे ढवळुन घ्या.
मी चीनी मातीच्या दगडी मधे हे लोणचे ठेवले आहे .
balkaireeche lonache33.JPG
३-४ दिवस मुरल्यावर हे लोणचे अधिकाधिक स्वादिष्ट लागते.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी एक तर हवीच.
अधिक टिपा: 

हे लोणचे करायला सुरवात करुन ते मुरेपर्यंत ४ -५ दिवस तरी लागतात .
मसाला भरलेल्या कैर्‍यांवर वरपर्यंत तेल दिसायला हवे.तरच लोणचे टिकेल.
मेथीदाण्याचे प्रमाण या लोणच्यात नेहमीपेक्षा जास्त असते.लोंणचे मुरल्यानंतर मेथीचा कडुपणा अजिबात जाणवत नाही.
जर तयार लोणचे मसाला वापरला तर त्यात जास्तीच्या खारासाठी मोहोरीडाळ व त्याप्रमाणात मीठ घालुन मसाला तयार करावा.
मुरलेल्या लोणच्यातील बडीशोपेची चव ही छान लागते.

माहितीचा स्रोत: 
पिढी दर पिढी चीच पद्धत ...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रॅडी, मी कोणतेही लोणचे घालताना ,मोहोरीची डाळ एकदाच मिक्सरमधे फिरवुन घालते.त्यामुळे खार मिळुन येतो.मोहोरीची डाळ हाताला टचटचीत लागत नाही.

सुलेखा घातलं लोणचं वीकएंडला. मुरतंय अजून.मी रेडिमेड लोणचं मसाला वापरलाय. हा फोटो. रेसिपी करता आणी शंका निरसना करता धन्यवाद !!
pickle.jpg

.

.

प्रॅडी,लोणचे घातल्यावर दुसर्याच दिवसापासुन खायला सुरवात करायची.संपेपर्यंत मुरत रहाते.ताज्या लोणच्याचा मोह आवरत नाही.
अजुन एक मस्त टिप्--या लोणच्यातला मसाला उरला तर त्यात कांद्याच्या मोठ्या फोडी /लहान कांदे असतील तर मधुन २ काप देवुन-एका वेळी जितक्या संपतील जेवायला बसण्याच्या ५ च मिनिटे आधी घालायच्या.लगेच मुरतात्.असा कांदा खुप छान लागतो.

तोंडाला पूर आलाय. मंडईत बाळकैर्‍या नक्की मिळतील. तेव्हा उद्या जाऊन आणाव्याच लागतील.

प्रॅडी, तू घेतलेल्या कैर्‍या वडू लोणच्याएवढ्या लहान नाहीत ना? हल्ली इंग्रोमध्ये लिंबापेक्षा थोड्या मोठ्या कैर्‍या असतात त्याचं केलं आहेस ना?

सायो वडूच्याच आहेत त्या कैर्‍या. खूप लहान आहेत. मधेच कधीतरी मिळून जातात.
सुलेखा मीठ लावून ठेवायच्या स्टेप पासूनच खाणं सुरू झालंय.जसं मुरतंय तशी चव अजून खुलतेय. कांद्याची टीप छान आहे. पर्ल अनियन्स घालून नक्की करून बघेन.

Pages