अमेरिकेत भारतामधून आंबे मागवता येतील का?

Submitted by sulu on 3 April, 2012 - 15:39

अमेरिकेत भारतामधून विश्वासार्ह आंबे कोण पाठवते का? कृपया माहिती असल्यास कळवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

MG, आंबे ऑर्डर केल्यापासून साधारण किती दिवसाने मिळाले?
मला २ आठवड्यात हवेत, आता ऑर्डर केल्याच बॅच डेट ५/१३ दिसत आहे.

मी ऑर्डर केले त्यावेळी ४/२२ अशी shipment date सांगितले होते. नंतर कळाले की ४/२२ ला भारतातुन शिप केले. सिझनची पहिलीच ऑर्डर असल्याने कस्टम मधे वेळ (३ दिवस) गेला असे मँगोझ चे म्हणणे आहे. ४/२७ला कस्टम मधुन सुटका झाली. ४/२८ ला संध्याकाळी त्यांनी फेडेक्स ने पाठवले. ५/२ ला आम्हाला मिळाले.
२ दिवसात खाण्या योग्य झाले.

तारखे नंतर ८ दिवस तरी गृहीत धरावे. त्यांना फोन केल्यास ते तारीख सांगु शकतील.

>> नॉर्मल हापूस सारखं वागावायचं त्यांना?
नाही. एक राजा दुसर्‍या राजाला वागवेल तसं वागवायचं. Proud

सॉरी, अगदीच राहवलं नाही. तुमचं चालू द्या. Happy

१ दिवस बॉक्समधेच पडुन होता. दुसर्‍या दिवशी आम्ही भारतीय पद्धतीप्रमाणे बॉक्समधुन काढुन धान्यात ठेवले. १ आंबा लगेच दुसर्‍यादिवशी तयार झालेला दिसला. नंतर २ दिवसानी बाकीचे तयार झाले.

सिंडीनं मुद्दा पकडलेला दिसतोय ऑलरेडी.. Happy

बादवे, आंब्याला वागवणे ह्यात बस भेटण्यासारखा "वागवणे"चा वापर असूनही, तो अज्ञानातून आलेला नाही, ह्याची नोंद घ्यावी! Wink

मी पण मागवले mangozz.com वरुन. फक्त ६ (small box).

पार्सल Berkeley,CA येथुन आले ४ दिवसात.
फळ खूपच लहान आणि रंगाने हिरवट केशरी.. सगळे लासे निघाले .. कोयीचा भाग सगळा टाकला. उरलेला चवीला चांगला होता.
(not happy to see this kind of Alphonso Mangoes) पुन्हा ऑर्डर करु असे वाटत नाही.

आमचाही २४ चा बॉक्स परवाच आला. त्यातले ७ रसाकरता काढले. सगळे खराब निघाले आतून. कोयीचा भाग फेकावा लागला. मेलमधून फोटो पाठवले आहेत. बघुया काय उत्तर येतं. कायच्याकाय महाग आणि त्यातून अशी क्वालिटी असेल तर पुन्हा ऑर्डर करण्यात अर्थच नाही.

सायो मागच्या वर्षी मी पण पटेल मधून हापूस चा बॉक्स घेतला.
इतका लहान आंबा कि त्याला हापूस म्हणावे का प्रश्न पडला.
१२ पैकी ४-५ तर खराबच निघाले Sad . ४० डॉ वाया Sad
यावर्षी अजिबात आणणार नाही हापूस. मॅक्सिकन आंब्यांवर तहान भागवेन. Happy

अंजली, जर्सी सिटीच्या पटेलकडून ना? आम्ही आणले आहेत आधी २,३ दा. फळ खूपच छोटं असतं पण आतून खराब नाही निघाले कधीच. पण १,२ आठवडेच स्टॉक असतो त्याच्याकडे.

सगळे खराब निघाले आतून. कोयीचा भाग फेकावा लागला >> माझे सगळे आंबे खराब निघाले. साल नाही, कोय नाही काही नाही. पैशांची नासाडी!

sulu ! ! ! !

4 April, 2012 - 04:39
अमेरिकेत भारतामधून विश्वासार्ह आंबे कोण पाठवते का? कृपया माहिती असल्यास कळवा.

15 May, 2013 - 03:01
ओह्ह , मी पण मागवणार होते पण आता नाही मागवत ! > > > >

ह्यावरील दोन वेगळ्या तारखांमध्ये तुमचं नांव पुन्हा दिसलंच नाही . . . .

हे असं असतं , तुमच्या एक वर्षाआधीचा प्रश्न उत्तरे मिळता-मिळता अजुनही अनुत्तरीत आहे कि मिळाले होते आंबे शेवटी ?

अंजली, जर्सी सिटीच्या पटेलकडून ना? हो आमचे अन्नदाते तेच Proud
बादवे आज एक वेदांत ट्रेडिंग नावाची वेबसाईट कळाली. तिथे आंबे नाही पण देसायांचा मँगो पल्प मिळतो छान.

मोठे मेक्सिकन आंबे पण छान गोड अन चवदार असतात. मी इंडीया कॅश अँड कॅरीतुन आणते.
तिथे हापुस मिळतो म्हणुन पाहीला तर $४ ला एक अन $ ३० ला १२चा बॉक्स अशी किंमत सांगितली. फळ पाहीलं तर अजिबात वास नाही. हापुस वाटला नाही. तुमचे अनुभव वाचुन उगाच पैसे घालवायची इच्छाही होत नाही त्यामुळे हापुस भारतात गेल्यावरच.

मंडळी, अमेरिकेत कोस्टको मध्ये शॅम्पेन आंबे मिळतात ते खूप चांगले वाटले मला. काय उगीच त्या हापूस ची पिटपिट करायची. Angry
भारतातल्या लोकांना अजून हापूसचा व्यापार करून पैसे कसे कमवायचे हे समजत नाही आणि सरकार तर ग्लोबल बिझिनेसबद्दल झोपलेलेच आहे.
तेव्हा अमेरिकेत येऊन इथे राहतोय ना आपण. इथे जे मिळत त्यावर आनंद मानूया ना.
Light 1

हो, धनश्री, कॉस्ट्कोमधले आंबे छान आहेत. त्याचा रस काढून, तुप घालून पोळ्यांबरोबर खायला लागलं की अमेरिकेत आहोत की भारतात असा प्रश्न पडतो. नुस्ती फोड खायला मात्र मला नाही खूप आवडले, त्यासाठी हापूसच हवा! :|

>>काय उगीच त्या हापूस ची पिटपिट करायची
Uhoh

इथे जे मिळते त्याला "आंबे" म्हटले तेवढे बास झाले नाही का? Angry
एवढ्या प्रयासानं ती बंदी उठली तर आता जरा नीट काय ती प्रोसेस करा आणि चांगले हापूस येऊदेत इकडं.

आमचे पण आले काल आंबे. एक पॅकेज आजी आजोबांनी गोडबोलें कडून बुक केलं होतं. दुसरं मँगोज वरून मागवलं होतं. दोन्ही पॅकेजेस शँपेन, ईलिनॉय मधून शिप झाली. फळ चांगलं आहे. बरेच आंबे अजून हिरवे आहेत. जितके काल खाल्ले ते छान रसाळ होते. जरा कोईला लागायला सुरवात होती पण तरीही फळ छान निघालं.

आत्ता कुठे मी परत हा धागा बघितला. आम्ही या वर्षी इथल्या indian store करवी हापूस मागवले. $४० ला १० पडले. ८ वाईट १ चांगला १ उत्तम!!! so ये option नही जमा!

आम्ही (भारत बझार कडून) मागवलेले हापूस आंबे ऑल्मोस्ट सर्व खराब निघाले. बरेचसे तर अगदी पूर्ण टाकून द्यावे लागले. दोनेक आंब्यांचा कोयीचा भाग खराब झाला होता तो फेकावा लागला, बाकी थोड्या फोडी खायला मिळाल्या Sad

Pages