"मस्सालामामा की पोटली..."

Submitted by लाजो on 3 April, 2012 - 10:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चतुर मस्सालारामा...

ऐका महाराजा आमची कहाणी, खवैय्या नगरीची राजा अन राणी
राजाच नाव 'जामुन सुलतान', राणी त्याची 'बेगम पकवान'

राजा राणी खाण्याचे शौकिन, गोड असो वा असो नमकिन
महालात त्यांच्या १०० आचारी, सदैव तत्पर बनवाया न्याहारी....

पण एक दिवस बेगम रुसली, काहितरी नवे हवे म्हणाली
असे जे नसे भाजले चुलीवर, शिजले जे न वापरता कुकर

पौष्टिक हवे राखी जे फिगर, मात्र चवीला हवे एक नंबर
पिटा दवंडी सार्‍या भुमीवर, हवे मला ते देइल कोणी जर

आले बल्लव देशोदेशीचे, आणले पदार्थ नव्या चवीचे
पण बेगमला काहीच रुचेना, सुलतानाला ही मग काही सुचेना

आणि एक दिवस मस्सालामामा आला, त्याने बंद पोटलीत खाऊ आणला
ओळखा पाहु काय आहे यात, बेगमसाहेबा म्हणे है क्या बात???

Happy

-------------------------------------

लागणारे जिन्नस:

- मसाला ग्रेव्हीसाठी -
२ कांदे,
आल्याचा छोटा तुकडा.
२-४ लसूण पाकळ्या,
टॉमेटो पेस्ट,
किचनकिंग / गरम मसाला
हळद,
लाल तिखट,
मिठ चवीप्रमाणे

- अर्धा किलो चिकन / मटण;

- भाज्या - कॅप्सिकम, ब्रोकोली, बीन्स, बटाटे इ पैकी जे उपलब्ध असेल ते.

chic1.JPG

क्रमवार पाककृती: 

तर मंडळी, तुम्हीतर सगळे महा चतुर लोक्स आहात... ओळखा बर या पोतडीत काय दडलय???

क्लु हवाय??? वर दिलाय की... 'ना चुलीवर भाजले...ना कुकरात शिजले...पौष्टिक आहे आणि चव एक नंबर'

IMG_1538.JPG

---------------------------------

क्रमवार पाककृती:

मसाला ग्रेव्ही :

१. कांदा + आले + लसूण + थोडे मिठ कच्चेच मिक्सरवर वाटुन घ्यावे;
२. किचनकिंग मसाला + हळद + तिखट थोड्या पाण्यात कालवुन पेस्ट करावी;
३. मावेसेफ बोलमधे १ चमचा तेल घेऊन १ मिनीट्/गरम होईतो मावे मधे ठेवावे;
४. गरम तेलात मसाला पेस्ट घालावी व जरा मिक्स करावे. आता परत मिनीटभर मावेमधे ठेवावे. बोलवर झाकण/किचन पेपर ठेवायला विसरु नका.
५. आता या मसाल्यात टोमेटो पेस्ट घालुन परत एखाद मिनीट गरम करावे आणि मग कांद्याचे वाटण घालुन ग्रेव्ही मावेमधे शिजवुन घ्यावी. ग्रेव्ही थोडी घट्टच असावी.

पोटली:

ओव्हन १८० डिग्रीला तापत ठेवा.

६. चिकन ब्रेस्ट स्वच्छ करुन त्याचे मोठे तुकडे करुन घ्यावेत.
७. तयार ग्रेव्ही चिकनला लावुन २० एक मिनीटे मॅरिनेट करावे.

chic2.JPG

८. सिल्व्हर फॉईलचा मोठा तुकडा ट्रेमधे पसरावा. त्यावर बेकिंग पेपरचा तुकडा पसरावा.
९. या बेकिंगपेपरवर मॅरिनेट केलेल्या चिकनपैकी ६-७ पिसेस (१ सर्व्ह) ठेवावेत. त्यावर हव्या त्या भाज्यांचे तुकडे ठेवावेत.

chic3.JPG

१०. आता समोरासमोरच्या बाजु जवळ आणुन त्याची पोटली बनवावी. पोटली सगळीकडुन घट्ट बंद (सिल) झाली पाहिजे.

chic4.JPG

११. ही पोटली आता ट्रेमधे ठेऊन ट्रे गरम ओव्हनमधे ठेवावा.
१२. साधारण २० मिनीटांनी (चिकनच्या तुकड्यांच्या साईजवर अवलंबुन) पोटली बाहेर काढावी.
१३. एखाद मिनीट थांबुन मग चिमट्याने हलकेच उघडावी.

chic5.JPG

१४. चिकन शिजले आहे की नाही हे चेक करुन (अन्यथा पोटली परत ओव्हनमधे ठेवावी) मग गरमागरम भाताबरोबर / पराठ्यांबरोबर खावे.

chic6.JPG

वाढणी/प्रमाण: 
३-४ सर्व्हज
अधिक टिपा: 

१. आपल्या आवडीची कुठलिही ग्रेव्ही वापरु शकता. मावे नसेल तर नेहमीसारखी गॅसवर ग्रेव्ही बनवु शकता.
२. या पद्धतीत कमीतकमी तेल लागते आणि चिकन वाफेवर अगदी सॉफ्ट शिजते. शिवाय पाणी न घालता ग्रेव्ही देखिल बनते.
३. चिकन ऐवजी फक्त भाज्या + पनीर, मटण, लँब, फिश फिले अश्या पद्धतीने बनवु शकता.

माहितीचा स्रोत: 
पोटली आयडिया टीव्ही प्रोग्रॅम + माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, माझ्याकडून तुला इथेही बक्षिस Happy
ह्म्म्म कोंबडीच असावी बहुदा भरलेली ? की सुरमई ? की ईस्टर म्हणून बदकच ?
ए लवकर आटपना तुझं डिनर Wink

सही टीझर ......

१. मसाला स्पर्धेकरता = मसालेदार
२. मांसाहारी पाऊलखुणा = अंड्याचा पदार्थ (लाजोची धाव अंड्यापर्यंतच. जागू असती तर ओळखणं महाकठीण होतं)
३. नो चूल, नो कुकर = काहीतरी बेक्ड डिश.

अंडे घालून बनवलेली तिखट बेक्ड डिश.

कंझ्युमर कोर्टात तक्रार केली पाहिजे. जाहिरातीत म्हटले आहे 'पोटली खुलेगी आज डीनरटाईम' आणि आता मालकीण बाई दोन तास उशीर करत आहेत. इकडे कल्पनेनेच लाळ गळून गळून डीहायड्रेशन व्हायची वेळ आली Happy Light 1

लाजो,

आता पाककृती येऊ द्या. Happy
परीक्षक हे धागे वाचू शकतात, त्यामुळे आपल्या स्पर्धेबद्दल त्यांचं वेगळं मत बनता कामा नये.

धन्यवाद मंडळी Happy

माप्रा, घरी थोडं काम आल्याने मी आधी पाकृ टाकु शकले नाही त्याबद्दल क्षमस्व Happy

सावली यांचे उत्तर बरेच बरोबर आहे त्यामुळे ही पोटली त्यांना Happy

अरे वा लाजो!!!! मस्तच की रेसिपी Happy यम्मी!!! काहीजणांनी बर्‍यापैकी ओळखलं होतं... त्यांना काय बक्षिस देणार तू?
रच्याकने, मी कोडं वगैरे काहीच पाहिलं नाही. डायरेक्ट उत्तरच. बरं झालं. धीर धरण्याची वेळ माझ्यावर आली नाही. Proud
बाकी तुझ्या कल्पकतेवर आम्ही फिदा... Happy

ओव्हन Uhoh

पकवलंस............काहीतरी भन्नाट असे अपेक्षित होते........

नाय पण रेसिपी एकदम tongue-out-2.gif

बेगम लाजो, तुसी ग्रेट हो!
चिकन मलाही वाटलेले पण ४५ मि. चिकन होणार नाही... पिसेस असतील हे लक्षात आले नाही. तु न्याहरी ..लिहीलेस त्यामुळे चिकन नसेल असे वाटले.... असो !...बाकी तुझ्या कल्पकतेवर आम्ही फिदा.. या सानीच्या मताला अगदी सहमत!
अजुन येउ देत.

मंडळी,

मी परवा हे कोडे गंम्मत म्हणून टाकले... खुसखुषित लेखन Happy किंवा म्हणा 'रुमाल टाकला' की माझ्याकडुन अजुन एक पाककृती येते आहे असा Happy सर्व माबोकर हे खिलाडुवृत्तीने घेतिल याची खात्री होती Happy तुम्ही सर्वांनी या 'मस्सालामामाकी पोटली...' च्या कोड्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद Happy

माझ्या कोड्याला मा_प्रा यांनी आक्षेप न घेतल्याबद्दल त्यांचे विशेष आभार Happy

@ निंबुडा, इथे पाककृतीचा टीआरपी वाढवणे वगैरे उद्देश अजिब्बात नव्हता. तसा कुणाचा गैरसमज झाल्यास क्षमस्व.

@ झंपी, तुमच्या 'स्पष्ट प्रतिक्रिये' बद्दल आभार. तुमच्यासारख्या 'पाककला निपुण' सुग्रणीने इथे प्रतिक्रिया दिली यातच सगळे आले. नाही का? आणि रेटिंग बद्दल म्हणाल तर तुम्ही माझ्या पाककृतीवर दोन प्रतिक्रिया टाकुन त्याचे 'रेटिंग' दोन नंबरांनी वाढवल्याबद्दल तुमचे दोन हात जोडुन आभार Happy खरतर तुमच्याकडुनच एखादी 'खास' पाकृ अपेक्षित आहे बरका Happy

परत एकदा धन्यवाद मंडळी Happy

लाजो,
अहो किती ते आभार नेत्यासारखे... Wink
हायला मी पाककला निपुण... तुम्हाला कधी सांगितले.. वा वा छान. Proud

एकदम मस्त पाकृ..

जितकी उत्सुकता लागली होती काय असेल याची तितकेच समाधान पाकृ पाहुन वाटले. बनवायला अगदी सोप्पी आणि पौष्टीकही.

Pages