तुला पाहिले मी...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ग्रेसच्या ओळींवर लिहीले गेलेले अजून काही, त्यालाच अर्पण ...
........................

बाबांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन पार पडलं होतं. हॉस्पिटलमध्ये एक दिवस रहावं लागलं होतं. मी आणि बहीण दोघेही परदेशात होतो. त्यामुळे आईबाबांना ते दोन्ही बघावं लागलं होतं, याचा सल मनात होताच. अंतरांचे अवगुण अगदी प्रकर्षाने अंगावर आले. त्यातच बाबांनी हॉस्पिटलमधून घरी येताना चालत यायचा पराक्रम केला. कुठलाही रिक्षेवाला सोडायला तयार नव्हता म्हणून. मग तर तो सल अगदी चक्रवाढ पद्धतीने द.ता.द.से. वाढत होता.

अशातच एका संध्याकाळी कामावर जावे लागले होते. इथली संध्याकाळ म्हणजे करड्या रंगाच्या ढगातून पावसाची पीरपीर सुरू होती. ना धड जोरात पडत होता, ना धड थांबत होता. बाजूने गेलेला एखादा ट्रक त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी काचेवर उडवत होता. अशातच हलणार्‍या वायपर्समधून लाल रंगाचे पाणी ओघळले. एकाएकी मागचे पुढचे सगळेच ट्रॅफिक अगदी स्तब्ध झाले. माझ्यापुढे रस्त्याचे एक नागमोडी वळण होते. वळणाच्या एका टोकावरून पार अगदी पुढच्या वळणापर्यंतचे स्पष्ट दिसत होते. जणू गाड्यांच्या नदीला कुणीतरी बांध घातला होता. गाड्यांच्या अनेक खिडक्यांपैकी एका खिडकीत मी , एक हात सुकाणूचक्रावर तर एक हात कपाळाला लाऊन विचार करत बसलो होतो. सहज आकाशाकडे लक्ष गेले. स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा हिरवा मुकूट आहे तशा आकारात काळे ढग आकाशात पसरले होते. मी विचार करत होतो ही कोण चेटकीण येते आहे आता, असे पिंजारलेले काळे केस घेऊन. उन्हाळ्यात ह्याच रस्त्यावरून जाताना, उबदार अशा पिवळ्या भगव्या रंगाच्या मावळत्या सूर्यप्रकाशात, निळ्या आभाळात पांढरे ओरखडे उमटवणारी विमाने आठवली. ही विमाने अलगद मला ग्रेसकडे घेऊन गेली


तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठिवरी मोकळे |
इथे दाट छायातूनी रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे ||

असा कसा हा माणूस ? असं कसं त्याला सगळं माहिती? असे कसे त्याचे शब्द पाठलाग करत असल्यासारखे ऐन वक्ताला येऊन टपकतात ? गळा दाटून आलेला हुंदका आणि डोळा तरळलेले पाणी कसे त्याला कळते?


अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून आकांत माझ्या उरी केवढा.

तो बिल्वरांचा चुडा मात्र त्यादिवशी दिसला नाही. त्याआधीच बांध निघाला आणि पाणी मोकळं झालं.
प्रकार: 
शब्दखुणा: 

नेमकं कुठल्या वेळी कसलं सौंदर्य आपल्या पदरात पडेल सांगता येत नाही. नशीबच ते..
खूप खूप पोचलं. आणि आता लेखाच्या लांबीचा सल उरला नाही.

मला काही फ़ार ग्रेस कळत नाहीत...पण फ़क्त या गाण्यापुरता मला असं वाटतं की श्रीधर फ़डक्यांच्या चालीला सुरेशजींनी पोहोचवण्याचं काम उत्तम केलंय...नाहीतर नुस्ती कविता वाचून मला कदाचित ते तितकं आत पोहोचलं नसतं..अर्थात हा माझा एकटीचा अनुभव असू शकतो..
ही पोस्ट मात्र फ़ारच छान झालीय..आवडली....

ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित "साजणवेळा" या कार्यक्रमाचे रुपांतर मी बोलक्या पुस्तकात (audiobook) केले आहे. "पूर्वार्ध" आणि "उत्तरार्ध" अशा दोन भागात हे बोलके पुस्तक अॅपल आयफोन तसेच आयपॅड स्टोअरवर उपलब्ध झाले आहे.
जरुर पहा...
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-1/id586514412?mt=8
https://itunes.apple.com/in/app/sajanvela-part-2/id586568619?mt=8

Pages