बोगोर बुदुर .. भाग १४

Submitted by अविनाश जोशी on 31 March, 2012 - 04:45

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १ http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २ http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३ http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4 http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर भाग ५ http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६ http://www.maayboli.com/node/33730
बोगोर बुदुर भाग 7 http://www.maayboli.com/node/33764
बोगोर बुदुर भाग 8 http://www.maayboli.com/node/33765
बोगोर बुदुर भाग 9 http://www.maayboli.com/node/33778
बोगोर बुदुर भाग १० http://www.maayboli.com/node/33788
बोगोर बुदुर भाग ११ http://www.maayboli.com/node/33842

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे,
कथा “सवत माझी लाडकी” http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास http://www.maayboli.com/node/33369

--३२--

समीरच्या मनात काहीतरी कल्पना घोळत होती.

" राणे एवढे निराश होउ नका. शिकार आहे पण मीळत नाही म्हणल्यावर शिकारी काय करतॊ ?"

" समीर असा कोड्यात बोलु नकोस "

" शिकारी शेळी बांधतो. शिकारी रान उठवतो. आपणही तसा प्रयत्न करुन बघुया "

" काय करायचा विचार आहे तुझा ? "

" सोप आहे. आपल्या दोघांना जश विषयी संशय आहे. पेटवुन देउ रान "

" काय करायच ते सांग "

" हे बघा हा कुणाल आहे त्याच्याकडुन एक्स्क्लुजीव्ह म्हणुन काही सुचक बातम्या छापुन आणु. तुम्ही चॊकशीच्या निमित्ताने जशच्या ऑफीसमधे आणी फॅक्टरीत चकरा मारायला लागा. "

" अरे पण उगीचच चकरा मारु? "

" अहो तुम्ही कशाला जाता. माखानीलाच तुमच्या ऑफीसमधे बोलवा. फॅक्टरी कुणाला तरी पाठवा. थोडक्यात जशवर प्रेशर आणायला सुरुवात करु. "

" काय उपयोग आहे?"

" अहो आजपर्यंत आपल्या हातात काहीही क्लु नाही. जशच्यावर प्रेशर आल्यावर खुनी काहीतरी चुक करेल "

" आणी तो गप्पच बसला तर?"

" तर मात्र तो फारच हुशार आहे. पण माणसाचा इगो त्याला गप्प बसु देत नाही. "

"ok..let's try"

" अजुन मला एक करावसे वाटते. तुम्ही जरा जोर लावुन इंडोनेसियातुन चोरीला गेलेल्या सर्व वस्तुंचे
वर्णन आणी फोटो पब्लिश करायची व्यवस्था करा. आणी कुठल्यातरी मीडीयावाल्याला बाइट द्या. बघा कसा प्रभाव पडतो ते. "

" मला कमीशनर साहेबांना विश्वासात घेउन त्यांनाच सांगायला लागेल"

" मी ही कुणाल व सोनलला जेवायला बोललो आहे. त्यावेळेस जरा सोनलला काही हींटस देतो. आणी माझ्या पद्धतीने तपास करतो. "

"झाल. म्हणजे माझ्या मागे तु काहीतरी नवीन लचांड मागे लावणार."
--३३--

राणे गेल्यावर समीरला माखानीच्या सॅटेलाइट फोन वरुन डाउनलोड केलेल्या डाटाची आठवण झाली. आज तो डाटा सर्व तपासण्याचे त्याने ठरवले.

तानाजीला सांगुन त्याने स्टडीमधेच सॅंडवीच आणी बीयर मागवली आणी आपण घरात नाही असा निरोप ठेवला.

त्याने पहिल्यांदा पर्चेस आणी सेल्स तारखेनुसार जुळवण्याचा प्रयत्न केला. पण तसा काही धागादोरा सापडायला तयार नव्हता. सर्व डाटा तपासुनही कुठे पैसा लपवलेल्याच्या खुणा नव्हत्या. नाही म्हणायला थोडीफार कॅशची जुळवाजुळव होती. पण ती प्रमाणाबाहेर नव्हती.

सर्व माहीतीत कुठलीही माहीती उपलब्ध नव्हती. तशा पार्टीज मोजक्याच होत्या आणी सगळ्याच लिमीटेड कंपनी दिसत होत्या. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या विषयी जास्त माहीती मिळवता आली असती. चार पाच तास घालवुमही हाताला काहीच लागले नव्हते. एक आळस देउन तो उठणार तोच तानाजी डोकावला.

" कुणालसाहेब आणी कुणी पोरगी आली आहे. त्यांना कटवु का बसवु ? "

" बसव. बागेतच बसव आणी मी फ्रेश हौन आलोच असे सांग"

थोड्या वेळाने तो वॉश घेउन बागेत गेला, तेंव्हा कुणाल व सोनल गप्पा मारत होते. म्हणजे सोनल गप्पा मारत होती आणी कुणाल तीच्याकडे पहात बसला होता.

" काय रिपोर्टर. काय नवीन ब्रेकींग न्युज ?"

’ आत्ता तरी काही नाही. तसा मला खबरने ह्या दोन खुनांकरता सोडलेच आहे"

" मी ते नाही विचारत. मी तुमच्या दोघांबद्धल बोलतोय. "

कुणालची तारांबळ उडाली. सोनल त्या मानाने कुल होती.

" समीर अजुन तरी तस काही नाही " सोनल

" बर काय अजुन खबर ? " समीर

" सगळीकडे कस शांत आहे. शहाच्या खुनाचा पत्ता नाही आणी आता तर तारीही मेला " कुणाल

" कुणाल तुझ्याकरता एक न्युज आहे. तारीचा खुनच झाला आहे आणी खुनाचे कारणही सापडले आहे "

" काय सांगता काय? "

" हो . डिटेल्स राणेंनाच विचार कारण त्यांचा आत्ताच फोन आला होता. बघ तुला ते एक्सक्लुझिव्ह देतात का?

" हो लगेच " कुणालने राणेसाहेबांचा नंबर फिरवला.

" राणेसाहेब . कुणाल बोलतोय. "

"बोल"

"तुम्ही मला काही खास बातम्यांतुन बाजुला ठेवताय का ? "

" तु समीर कडे बसलेला दिसतोस. "

"हो का ? "

" अरे मला ही आत्ताच बातमी मिळाली. ती मी समीरशिवाय अजुन कुणालाच सांगीतली नाही. "

" मी बातमी छापु का ? "

" छाप पण माझे नाव न घेता. आणी कूठल्याही डीटेल्स न देता "

" डिटेल्स द्यायला माझ्याकडे आहेत काय ? "

"ठीक आहे. बहुतेक एक दोन दिवसात कमीशनर साहेब पत्रकार परीषद घेतील त्याला ये. तारीच्या बातमीत पोलीसांच्या सुत्रांकडुन कळले असे कुठेही उल्लेखही नको. तुझा अंदाज म्हणून बातंमी छाप. खुन कसा झाला ह्याचे फारतर अंदाज बांध "

" थॅंक यु साहेब. "

समीरने लगेच खबरला फोन लावुन एक मोघम बातमी द्यायला सांगीतली.

" हेड्लाइन द्या " तारीचा खुनच आणी तो सुद्धा विषबाधेने.
त्यात जरा तीखट मीठ लावा.
खाद्याच्या पदार्थात विष कसे मिसळतात आणी ती कशी अपाय करतात ती माहीति द्या.
आणी मग ती तारीच्या खाण्यात किंवा पिण्यात कशी गेली नसावीत ते सांगा.
थोडक्यात बातमी कमी पण रकाने भरा. आपल्या मीडीया चॅनलावरही ब्रेकींग न्युज द्या.
वाटल्यास तीन चार विष तज्ञांना बोलवा.
काहीतरी रोखठोक चर्चा करा. थोडक्यात जरा पोलीस खात जाग होइल असा माहोल तयार करा. "

"कुणाल. तुम्ही लोक खरच राईचा पर्वत करु शकता " सोनल

" समीर खुन कोणत्या विषाने झाला? " कुणाल

"मला. काही कल्पना नाही. तु राणेंनाच का नाही विचारलेस? "

" ते सांगण थोड कठीणच दिसत आहे. बर ते जाउ देत. पण हा खुन कोणी केला असेल.?" कुणाल

" खुनी फार हुशार आहे. त्याने काहीही माग ठेवला नाही. "

" विषप्रयोग झाला असेल तर ती व्यक्ती तारीच्या ऒळखीचीच असणार. पण तारी सुटल्यावर थेट घरीच आला होता "

" सुटल्यावर त्याचा ऑफीसला फोन आला होता. मीच त्याच्याशी बोलले. तो जरी सुटला असला तरी त्याची गुन्ह्याची पार्श्वभुमी समजल्यामुळे जशमधे तो आता राहु शकणार नाही. म्हणजे माखाणी साहेबांनीच तसा निर्णय घेतला आहे. त्याचे राहीलेले पैसे त्याच्या अकांउट्ला जमा केले आहेत. " सोनल

" बिचारी मेरी. आता निदान तारीला काही आगापीछा नाही तर त्याचे उरले सुरलेले मेरीला मिळायची काहीतरी व्यवस्था झाली तर चांगले" समीर

“ ते अवघडच आहे. तारीने काही व्यवस्था केली असेल असे वाटत नाही. बघुया जश मधुन तीला काही मदत देता येते का” सोनल
--३४--

गप्पा चालुच होत्या. तेवढ्यात तानाजी मेरीला घेउन आला.

मेरी पुर्ण भेदरलेली होती. सोनलला पाहील्यावर तर ती जास्तच अस्वस्थ झाली.

तीच्या हातात वर्तमानपत्र दिसत होते.

“मेरी बस . मी तुझी मॅडम ऑफीसमधे. अशी का घाबरली आहेस?”

समीर ने तीची ओळख करायला सुरुवात केली. “ मॅडम तर तुला माहीतीच आहेत. आणी हा कुणाल कोहली”

“माहीती आहे साहेब. शहा साहेबांचा खुन झाला तेंव्हा होते तीथे”

“अरे हो की. पण तुला काय झाले? आइची तब्येत तर ठीक आहे ना?”

“आई ठीक आहे. पण तुम्ही हे वर्तमान पत्र बघीतलेत का?”

“आपण सर्वच जेउन घेउ आणी मग सावकाश बघु. मेरी तुही जेवुन घे. उगाच नाही नाही म्हणू नकोस”

सोनल “ मी आणी मोनल रोज रात्री एकत्र जेवतो”

“मग तीलाही बोलावुन घे. आणी जेवणाचे काय?”

“आमची कुक ८.३० / ९ पर्यंत येते आणी गरमागरम मेनु देते. रात्री ती आमच्या इथेच झोपते आणी सकाळी ब्रेकफास्ट देउनच जाते.”

“wonderfull”

“तिला थोड्यावेळाने फोन करुन सांगेन”

सोनल बराच वेळ फोन लावत होती.

“मोनल फोन उचलत नाही”

“ती ऑफीसातच असेल. तीथे फोन कर. कीतीवाजता जाते?”

“साइट असेल तर केंव्हाही. आज ती ८ लाच बाहेर पडली आणी मी १० च्या आसपास”

शेवटी एकदाचा फोन लागला.

फोनवर बोलत असताना सोनल पांढरी फटक पडली आणी धाडकन खुर्चीवर बसली

मेरीने तिला पाणी पाजले. समीरने बोलती केले.

“काय झाल?”

“मोनल आज ऑफीसला गेलीच नाही.”

“हात्तीच्या. फील्डवर गेली असेल”

“नाही. सकाळी तीला ९:३० ला client कडे जायचे होते. तीची असिस्टंट तीची वाट बघुन एकटीच गेली.ऑफीसने दिवसभरात २०/२५ तरी फोन केले पण कुणाचेच लागले नाहीत.”

समीर विचारात पडला

“बर मी राणेंना बोलावतॊ. तो पर्यंत आपण जेवुन घेउ: “

“नको मला नाही स्वस्थ जेवता येणार. मी घरी जाते” सोनल

“ठीक आहे. कुणाल तु सोनल ला घेउन पुढे जा. तीच्याकडेच जेवण कर. आम्ही येतोच .”

“आणी सोनल धीर धर. मोबाइल वरुन माणसाला शोधायच तंत्र बरेच पुढारलेले आहे”

दोघेही गेले. समीर विचारातच पडला होता. मेरीचा त्याला विसरच पडला होता.

ती पण भांबाउन गप्पच होती.

राणे आल्यावरच समीर तंद्रीतुन बाहेर आला.

“काय समीर? आणी ही मेरी ईथे काय करतीय?”

“मलाही माहीत नाही. पण प्रथम जेवुन घेउ.”

जेवता जेवता समीरने मोनल कथा सांगीतली. राणंना त्याचा फारसा सिरीयसनेस जाणवला नाही. समीर एवढा गंभीर का हे ही त्यांना समजेना.

“राणे काहीतरी आपल्या डोळ्यासमोर आहे. पण आपल्याला दिसत नाही. बर मेरी तु का आली होतीस ?”

“साहेब हा पेपर पाहीलात का?”

“बर मग?”

“साहेब असाच गणपती मी तारीला दिला होता”

“काय?” राणे

“होय . मी समीरसाहेबांना सांगीतले पण होते”

“तरीच समीरला गणपती बद्दल एवढी उत्सुकता होती”

“तस समजा. “ समीर. राणेंना अंदरकी बात कुठे माहीती होती?

“पण काय ग मेरी तु बोलताना हाच गणपती असे न म्हणता असाच म्हणलीस.?” राणे

“ साहेब हा गणपतीची कीम्मत कोटीत आहे. मला सापडलेला गणपती केरात होता”

“केरात?”

“होय साहेब”

“कुठे?”

“जश मधे पॅकीम्गच्या”

“राणे मेरीला जाउद्यात. पण जरा police escort देउन पाठवा. काही दिवस लक्ष ही ठेवा”

“ठिक आहे.”

“आणी हो त्या कुणाल आणी सोनललाही संरक्षण द्या”

तेवढ्यात समीरचा फोन वाजला.

कुणाल घाबरत बोलत होता.

“समीर इथे या.”

“काय झाले?”

“सोनलचे घर पार अस्ताव्यस्त केले आहे. फोनच्या वायर्स कट केल्या आहेत.”

“तुझ्याकडे रिव्हॉल्वर आहे ना?”

“हो.”

“आम्ही येतोच. आम्ही आल्याशिवाय कुणालाही आत येउ देउ नकोस”

गुलमोहर: