बोगोर बुदुर .. भाग ९

Submitted by अविनाश जोशी on 26 March, 2012 - 22:11

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १ http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २ http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३ http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4 http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर भाग ५ http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६ http://www.maayboli.com/node/33730
बोगोर बुदुर भाग 7 http://www.maayboli.com/node/33764
बोगोर बुदुर भाग 8 http://www.maayboli.com/node/33765

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे, कथा “सवत माझी लाडकी” http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास http://www.maayboli.com/node/33369

--२१--

मेरी साक्षीला उभी राहीली.

कदम आज केस संपवायच्या मुड मधे होते.

" मिलॉर्ड मला जरा leading प्रश्न विचारण्याची संधी द्यावी कारण हा hostile witness आहे. "

" कदम तुम्ही सुरवात तर करा"

" नाव?"

" मेरी डिसुझा "

" काम काय करतेस ?"

" जशच्या फॅक्टरीत आहे. "

" आरोपीला ओळखतेस ?"

" हो "

" कशी "

" जशमधेच तो हि कामाला आहे "

" जश सोडुन तु काय काम करतेस?"

" साहेब वेळ कुठे असतो "

" पण तु प्रॉस आहेस आणी धंदा करतेस ?"

"ऑब्जेक्शन. संबध नसलेला प्रश्न आहे. "

" सस्टेन्ड"

" शहा बरोबर तु खुनाच्या रात्री जेवायला गेली होतीस ?"

" बिल कीती झाले ?"

" माहीत नाही."

" शहाने तुला रात्रीचे किती पैसे दिले?"

"ऑब्जेक्शन. संबध नसलेला प्रश्न आहे. "

" सस्टेन्ड"

" जेवल्यावर तु शाहाबरोबर त्याच्या फ्लॅटवर गेलीस.?"

" हो."

" कशाला ?"

" शहाने बोलावले होते "

" कशाला ?"

" माहीत नाही"

" शहा मुलींना फ्लॅटवर कशाला घेउन जायचा ?"

" माहीत नाही"

" पुर्वी कितीवेळेला फ्लॅटवर गेली होतीस"

" एकदाही नाही"

" इमारतीत पोहोचल्यावर काय झाले ?"

" शहांना फोन आला. त्यांनी मला फ्लॅटची किल्ली दिली आणी पुढे जाण्यास सांगीतले "

" मग. "

" मी वर गेले. किल्लीने दार उघडुन गेले तर सोनल मॅडम आत होत्या."

" मग? तुला आश्चर्य नाही वाटले?"

" वाटले ना"

" मग तारी केंव्हा आला "

" आम्ही दोघी काही बोलायला सुरुवात करणार तर बेल वाजली. आणी तारी आला. "

" तो कसा काय आला?"

" माहीत नाही"

" तु त्याला बोलावले होतेस?"

" नाही."

" शहाने बोलावले होते?"

" माहीत नाही."

" मग काय झाले?"

" काही नाही. आम्ही दोघे बोललो आणी पंधरा वीस मीनीटात तो निघुन गेला"

" इतक्या शांततेत घडले?"

" म्हणजे?"

" तारी चीडुन आला होता का ?"

"हो"

" का चिडला होता?"

" माहीत नाही "

" तुझ्याशी तो भांडला का ?"

" हो."

" का?"

" आठवत नाही "

" पण त्याने तुला थोबाडीत मारली आणी जास्त तमाशा नको म्हणून सोनलने तुम्हाला आत ढकलले? "

" ऑब्जेक्शन. Argumentive आहे "

" ओव्हररुलड"

" सोनलने आम्हाला आत जायला सांगीतले"

" शहा आले तर तमाशा नको अशी ती म्हंणाली?"

" आठवत नाही"

" मेरी तुच खुन कशावरुन केला नाहीस? म्हणजे शहाला शेवटी जीवंत पाहीलेली तुच होतीस."

" ऑब्जेक्शन. are you impeaching your own witness? आणी मेरीने शाहाला शेवटी जीवंत पाहीले कशावरुन?"

" सस्टेन्ड"

" मेरी. तु शहाबरोबर आलीस म्हणुन तारी चिडला होता का?"

" माहीत नाही"

" त्याने तुला शिव्या दिल्या का?"

" हो"

" शाहाचा गेमच करतो अस तो म्हणाला का?"

" आठवत नाही"

" दॅटस ऑल युवर ऑनर "

जे ने उलट तपासणीस सुरुवात केली

“मेरी तु वर एकटीच का गेलीस?”

“शहा साहेबांना उतरताना फोन आला. त्यांनी मला किल्ली दीली आणी फ्लॆट मधे जायला सांगीतले”

“मग”

“मी वर गेले. दार उघडेच होते. आत सोनल मॆड्म दिसल्या”

“मग”

“मी जरा चपापलेच. मॆडमही शहाबरोबर असतात काय असे वाटले”

“मला पाहुन मॆडम जरा चमकल्या. त्यांचे शहांकडे काम होते आणी आता मी आल्यामुळे ते होणार नाही असे वाटल्यामुळे त्या जरा त्रासलेल्या वाटल्या”

“conclusion of witness” कदमांचा एक प्रयत्न

“ मेरी मग काय झाल तेवढेच सांग”

“आम्ही बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात तारी आला”

“किती वेळाने?”

“२/३ मिनिट फार फार तर ५ “

“that’s all Your Honour”

गुलमोहर: