बोगोर बुदुर .. भाग ३

Submitted by अविनाश जोशी on 24 March, 2012 - 14:08

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १
http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २
http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३
http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4
http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर .. भाग ५
http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६
http://www.maayboli.com/node/33730

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे, कथा “सवत माझी लाडकी”
http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास
http://www.maayboli.com/node/33369

--५--

राणे व गावडे ऒफीसला परत गेले. फोरेन्सीक कडुन अजुन रिपोर्ट आले नव्हते. नाही म्हणायला पोस्टचे प्राथमीक अहवाल आले होते.

" गावडे काय म्हणतय पोस्ट?"

" तीन बुलेट्स निघाल्या. एक सरळ एक मानेत , आणी एक खांद्यात"

" अजुन काय"

" ०. ३८ कॅलीबरच्या आहेत. जवळुनच झाडल्या आहेत. डोक्यातील गोळी प्राणघातक आहे. "

" म्हणजे खुनी शहाच्या ओळखीचा असावा."

" कसे साहेब ?"

" अरे. शहा फोन करत होता. त्याला वर जायची घाई असणार. अशा वेळेला कोणी ओळखीचे दिसले तरच तो खीडकीची काच खाली घेइल."

" पण त्या वेळेला त्याच्या ओळखीचे कोण येणार ?"

" गुरखा , कूणाल, त्या दोन पोरी, त्या बिल्डींगमधील रहाणारे, आणी गुरख्याला पटवुन कीवा भींतीवरुन उडी मारुन आलेले कुणीही. "

" पुढे काय?"

" उद्या डायरेक्टर बोर्डाची मीटींग आहे. त्या अगोदर कुणाकुणाकडे फायर आर्मसचे लायसंस आहे ते बघ. डायरेक्टर्स, मॅनेजरस. वाटल्यास अजुन माणस घे"

" बर"

" वॉरंट घे आणी फोरेन्सिकला घेउन पंच घेउन. शहाचा फ्लॅट पिंजुन काढ "

"हो साहेब"

" गाडीवरचे आणी फ्लॅटवरचे प्रिंट्स उद्याच हवेत म्हणव. तसेच गाडीतल्या आणी बॉडी वरच्या सामानाची यादी लगेच घेउन या"

" साहेब परबांचा दोनदा फोन येउन गेला. प्रगती काय झाली विचारत होते"

" त्या परबला घेउन जा फ्लॅटवर यादी करायला. आता परत फोन आला तर सी एम कडे गेलो आहे सांग. नसती कटकट साली . लगेच रिझल्ट लागायला हे काय २०/२० आहे?"

गावडेने हसू दाबले.

" बर गावडे मी आता जरा घरी जाउन पडतो. तु ही लोकांना कामाला लावुन आराम कर. उद्या सकाळपासुनच कामाला लागु"

--६--

रात्री त्यांना जाग आली तेव्हा फोन वाजत होता. हा नंबर थोड्या लोकांकडेच असल्याने राणेंनी फोन उचलला.

" साहेब "

" बोला गावडे"

" जश मधुन फोन होता की मीटींगची वेळ बदलली आहे. आता सकाळी दहा वाजता मीटींग आहे. "

" बर मी जाइन. कुणा दुसऱ्याला गाडी घेउन पाठवुन द्या. तुम्ही काल सांगीतलेली काम चालु ठेवा. "

सकाळी साडेनउला राणे जश ला पोहोचले. सोनल रिसेप्शन्मधेच होती.

" या ना सर. बोर्डरुम मधेच जाउ " सोनल आता मि वरुन सर वर आली होती.

बोर्डरुम मधे माखानी आणी दोघ होती.

" माखानी मी मुद्दामच लवकर आलो. मला सगळ्यांचा परिचय करुन घ्यायला आवडेल. "

" सर आमचे ८ संचालक आहेत शहा धरुन. मी तुम्हाला सगळ्यांची नाव आणी व्यवसाय देतो. तसेच आल्या आल्या ओळख ही करुन देतो. "

" आजचा कार्यक्रम काय आहे "

" पहा ना आजचा अजेन्डा "

अजेन्डा

1. सभेकरता चेअरमन निवडणे
2. शहांना श्रद्धांजली अर्पण करणे
3. मागच्या सभेचा वृत्तांत फायनल करणे
4. नवीन सी एम डी नेमणे
5. नवीन संचालक नेमणे - याकुब शेख
6. शहांचे नाव रजीस्टर मधुन काढणे
7. नवीन सह्यांकरता अधीकार देणे

" सर सर्व नैमित्तिक कामे आहेत. आणी हि डायरेक्टरस ची यादी"

संचालक मंडळ
जयंत शहा

राहुल माखानी
जश
चुनाभट्टी

रुप बाटलीवाला
इंडस्ट्री
कुलाबा

राकेश मोदी
लॉ
वरळी - शहाच्याच इमारतीत

अतुल साने
इंडस्ट्री
सायन

केशव जरीवाला
सिनेजगत
जुहु

मीना थोडानी
सिनेजगत
गोरेगाव

कीरण मोरे
कामगार प्रतीनीधी
लालबाग

" मला वाटत राकेश मोदींशीच एकदा बोलायला लागेल."

तेवढ्यात राणेंचा फोन वाजला. गावडेंचा होता. अर्जंट असल्याशिवाय गावडेंनी फोन केला नसता.

" बोला गावडे"

" साहेब आपल्याला लगेच निघायला हवे नाला सोपाऱ्याला"

" का रे. मीटींग संपल्यावर निघु. "

" साहेब प्रींट रिपोर्ट आला आहे. बरेच प्रींटस आहेत. शहाचे आणी कुणालचे सोडता ७/८ तरी आहेत. "

" बर."

" ब्युरोनी त्यातले दोन आयडेंटीफाय केले आहेत."

" काय ?"

" एक राधा नावाच्या बारबालेचा आहे "

" दुसरा?"

" तारीचा. मुख्य म्हणजे तारीचा प्रींट गाडीच्या दारावर आहे आणी त्याला रक्त आहे त्याला आर्मड रॉबरी करता ४ वेळेला पकडले होते . दोनदा तो आतही होता."

" बर तु अस कर. येथे ये. आपण निघु"

" काय साहेब काही प्रॉब्लेम" माखानी

" नाही. दुसऱ्या केसची इमर्जन्सी आली आहे. मी आता थांबत नाही"

" सर आपण माखानींच्या केबीन्मधे गाडी येइपर्यंत बसा. कॉफी घ्या." सोनल

" बर चल"

केबीन मधे जाण्यासाठी बाहेर पडले तर रिसेप्शन मधे कुणाल दिसला.

"काय रे तु इथे काय करतोयस?"

" मला ही केस कव्हर करायला सांगीतली आहे"

" केसच कव्हर कर. दुसरी कडे कव्हर करु नकोस. आणी मला संध्याकाळी भेट."

सोनलचा गोरामोरा चेहरा राणे.च्या नजरेतुन सुटला नव्हता.

गुलमोहर: 

छान झालेत तीनही भाग, सगळ्यांची प्रतिक्रिया येथेच देत आहे.
पुढचे भाग लवकर टाकले तर इंटरेस्ट टिकुन राहील. + १