बोगोर बुदुर .. भाग १३

Submitted by अविनाश जोशी on 31 March, 2012 - 01:32

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १ http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २ http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३ http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4 http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर भाग ५ http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६ http://www.maayboli.com/node/33730
बोगोर बुदुर भाग 7 http://www.maayboli.com/node/33764
बोगोर बुदुर भाग 8 http://www.maayboli.com/node/33765
बोगोर बुदुर भाग 9 http://www.maayboli.com/node/33778
बोगोर बुदुर भाग १० http://www.maayboli.com/node/33788
बोगोर बुदुर भाग ११ http://www.maayboli.com/node/33842

माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे,
कथा “सवत माझी लाडकी” http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास http://www.maayboli.com/node/33369
--३०--

राणे साहेब , समीर बोलतोय”

“बोला. कुठे आहे आता मुडदा”

“राणे.मी तुम्हाला क्लु देतोय”

“कशाबद्द्ल?”

“गणपतीबद्द्ल”

“अरे देवा! तुझ्या डोक्यातुन हे खुळ कधी जाणार?”

“राणे तुम्हाला प्रमोशन नको झालेले दिसते. अहो जरा ASI च्या डायरेक्टरला फोन करुन गणपती बद्दल विचारा. इंटरपोल ची नोटीस आहे त्याबद्दल”

“तुला कोणी सांगीतले?”

“मला कर्णपिशाच्च वश आहेत”

“बर चल दे नंबर”

“राणे तुमच्या नेट्वर्क वरुन होउ देत फोन. त्यांनी कसला कार्यक्रम आखलाय?”

“थांब. मी तुलाही लुप्मधे ठेवतो. गावडे जरा ASI च्या डायरेक्टर घ्या आपल्या फोनवर”

“सहाय स्पिकींग”

“राणॆ. DCP Crime”

“Yes Rane. What I can I do for you?”

“It is regarding what you have not done, which is an offence” राणेंचा पोलीसी हिसका

“I do not understand”

“Look Sahay” राणेही आता एकेरीवर आले “ You have called CM and other dignitaries for some Ganesha function”

“Yes”

“Sahay , there is Interpol notice for that article and you are aware of it. You should have intimated us “

“ DCP Rane, this matter is looked by Mr Kanchan, I will transfer it to him”

“Kanchan here”

“कांचन , समीरने फोन करायला सांगीतला होता” राणेंचा एक प्रयत्न

“समीर कोण समीर?” शेरास सव्वाशेर “ आणी हा फोन तर सहाय कडुन ट्रान्स्फर झालाय”

“अरे त्या गणपतीची काय भानगड आहे?”

“राणेसाहेब तुम्ही जरा आमच्या ऑफीसला या. ंअणजे प्रत्यक्ष बोलता येइल आणी काही दाखवीता येल”

“बर. तासाभरात येतोच”

“काय समीर , येणार काय?”

“ नाही तुम्हीच जाउन या”

समीरनेही या गोष्टीकडे जरा दुर्लक्षच केली होते.
शहाच्या खुनाच्या तपासातही काही प्रगती नव्हती.

दहा दिवसांनी मात्र मीडीयाला नव खाद्य मिळाले. ASI मधील संचालकांनी पत्रीकार परीषद बोलावुन इंडोनेसियातुन चोरी झालेला गणपती ASI च्या प्रगत तंत्रज्ञानाने व त्यांच्या बुद्धीमतेमुळे कसा सापडला ते सांगीतले.

परीषदेला इंडोनेसीयन राजदुत, दोन तीन मंत्री , इंटरपोलचे अधीकारी असे उपस्थीत होतेच. अर्थातच पोलीस तपास सुरु आहे असे सांगुन त्यांनी तो गणपती त्यांच्याकडे कसा आला, हे सांगण्याचे मात्र कॊशल्याने टाळले.

त्या नंतर काही दिवस इंडोनेसिया, त्याचे पर्यटन, त्याची हिंदु संस्कृती , तेथील देवळे ह्यावर रकानेच्या रकाने छापले. मीडीयात अचानक नवीन तज्ञ उगवले आणी काही दिवस तरी खाद्य मिळाले.

पोलीसांच्या दृष्टीने निराशाच झाली. ज्या माणसाने तो गणपती तेथे दिला होता त्याला शोधायचे सर्व प्रयत्न निष्फ्ळ ठरले. एकतर त्याचा पत्ता हॉटेलचा होता. त्याने ओळख्पत्र म्हणुम नाय्जेरीयन पासपोर्टची प्रत दिली होती आणी फी रुपयातच भरली होती. तेथील सिक्युरिटी कॅमेरा मधे एक अस्पष्ट निग्रो दिसणाऱ्या माणसाचा फोटो आला होता. यातुन त्याचा शोध घेणे पोलिईसांनाच काय पण इंटरपोललाही अशक्य होते. म्हणजे सर्व तपास झाले पण त्याचे उत्तर सगळ्यांनाच माहीती होते.

नाही म्हणायला राणेंना समीरचा संशय आला होता पण त्याच्याकडुन उत्तर मिळणे त्या नायजेरीयन माणसाच्या शोधापेक्षा अवघड आहे हे ते जाणुन होते. तरी सुद्धा ते संध्याकाळी लालमहालवर पोहोचलेच. समीर त्यच्या अभ्यासीकेत कॉम्पुटरवर बसला होता आणी उत्तेजीत दिसत होता.

" या राणे ! कमाल आहे.म्हणजे तुम्हाला वास लागला तर. "

" कसला वास. मी तुला त्या गणपतीबद्दल विचारयाला आलो होतो. "

" सापडला तुम्हाला? "

"वात्रटपणा करू नकोस. तु पेपर वाचत नाहीस असे दिसते."

" तो होय. तो तर छोटासा आहे. मी जश मधे पाहीलेला अडीच फुट होता."

" तुझा ASI गणपतीत काय हात आहे?"

" काही नाही. राणे माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. ऎवढा कोटीतला ऐवज मी सोडीन का ?"

" हो. आवळा देउन कोहळा काढण्यात तु पटाइत आहेस"

" जाउद्या हो. मी आता तुम्हाला कोहळाच देतो. तारीचा मृत्युच कारण सिक्युटॉक्झीन होते हे तुम्हाला
आठवतच असेल. "

" हो"

" मी आत्ता जरा गुगलवर सिक्युटॉक्झीन आणी इंडोनेसिया यावर सर्च करत होतो तर मला water hemloc च्या झाडाचा संदर्भ मिळाला. त्याची मुळ थेट गाजरासारखी दिसतात."

" काय म्हणतोस ? "

" मला वाटते तुम्ही प्रयोगशालेतले ते तुकडे एखाद्या वनस्पतीतज्ञाकडुन तपासुन घ्या. "

" त्याने काय होइल?"

" जर तेच झाड असले तर हा अनैसर्गिक मृत्यु नसुन खुनच होता असे सिद्ध होइल."

" कसे?"

"कारण ते झाड अमेरीकेत, युरोपमधे कीवा इंडोनेसीयात सापडते. त्यामुळे गाजराबरोबर आपल्याइथे ते विकण्याची शक्यता शुन्य आहे. अर्थातच ते कुणितरी खुनाच्या उद्देशानेच ठेवले असावे."

" माय गॉड "

" अस झाल . तर तुमचा भाव खात्यात निष्णात तपास अधीकारी म्हणुन वाढेल"

राणेंनी एकदा नजर बारीक करून समीरकडे पाहीले आणी फोनवरुन तावडेंना सुचना द्यायला सुरुवात केली.

" समीर. थॅंक्स! आता तुला काय पाहीजे.?"

" राणे मी तुम्हाला कोहळा देत आहे पण मला आवळा सुद्धा नको आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का?"

" काय?"

" खुनी फसला आहे. कारण ज्याने हा झाडाचे मुळ ठेवले त्याला तारीच्या आवडीनिवडी माहीती असल्या पाहीजेत"

"म्हणजे काय?"

" तो दारु पिताना गाजर निश्चित खाणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला बरीच माहीती असणार आणी त्याचा इंपोर्ट्चा व्यवसाय असणार "

" oh! "

" मला तरी असे वाटते की शहाच्या आणी तारीच्या खुनाचा जशच्या व्यवसायाविषयी संबंध आहे. तुम्ही त्याच्या मागे लागलात तर बरे होइल."

"अवघड आहे. कारण वरचे सर्व जरी खरे असले तरी जश च्या मागे लागण्यासारखे त्यात काही नाही"

" खर आहे. मलाच काहीतरी शोध घेतला पाहीजे. पण राणे हे सत्र इथेच थांबेल असे वाटत नाही"
--३१--

राणे गेल्यावर कुणाल आणी समीर बोलत होते.

" कुणाल, ह्या जश मधे काहीतरी पाणी मुरतेय"

" मलाही तसच वाटतय. "

" शहा आणी तारी दोघेही जशशी संबंधीत होते. मी तुला सांगीतलेला जशच्या रीसेप्शनचा गणपती थेट त्या इंडोनेसियन गणपतीसारखाच होता. " हे सांगताना त्याने तो छोटा गणपतीही जशची संबधीत होता हे सांगण्याचे टाळले.

" पण ह्या दोन्ही गुन्ह्याची कारणे कळत नाहीत."

" कुणाल , कारणे कळली की खुनी सापडेलच. अजुन बघ गाजराअसारखी वनस्पती भारतातली नाही. जशचा ही परदेशाशी भरपुर व्यापार आहे. "

" पण सर्व व्यवहार तर पारदर्शक आहे. जश मधे यार्न येते ते चीन, इजिप्त, इंडोनेसिया या देशातुन. फॅक्टरीमधील फ़ॅब्रीक जगभर एक्स्पोर्ट होते. "

" तुझी त्या सोनलशी खास दोस्ती आहे ना? तीचा काही उपयोग होइल का? "

" छे ! ती तर एकदम गरीब मुलगी आहे"

" हो पण त्या माखांनीची पीए आहे ना. तीला तर सगळ्या भानगडी माहीतीच असतील. "

" विचार करण्यासारखे आहे "

"एक काम करना. संध्याकाळी तु तीला जेवायलाच घेउन ये ना"

" बघतो विचारुन"

" विचारतोस कसला. सांग. "

तेवढ्यात त्याला राणेंचा फोन आला.

" संमीर. अरे तुझा अंदाज खरा ठरला. ते गाजर नसुन विषारी वनस्पतीचे मुळच होते. आता तारीचा खुन झाला हे निश्चीत. "

"मग तुमचा भाव वधारला असेल. "

" हो ना. तो परब माझ्यावर दात ठेवुनच होता. तारीचा मृत्यु ही त्याला मला डीवचायला आयतीच संधी मिळाली होती. "

"पुढे काय ? "

" तोच तर मोठा प्रश्न आहे. मला असा संशय आहे की ह्यात कुठे तरी जशचा संबंध आहे. पण कुठेच काही धागादोरा मिळत नाही. "

" राणे अस म्हणतात की एखादी गोष्ट जर लपवायची असेल तर ती उघड्यावर ठेवावी, कुणालाही सापडत नाही. "

" अरे पण दोन्ही खुन इतक्या सफाइने केले आहेत की काहीच धागा दोरा सापडत नाही. शहाचा खुन त्याच्या इमारतीच्या आवारात झाला. शस्त्रही त्याचेच होते. त्याला कुणी शत्रु नव्हते. त्याच्या घराच्या झडतीत काही पॉर्न सोडता काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. त्याच्या घरात कुठेही चोर कप्पा चोर खण नव्हता. त्याची तिजोरीलाच कील्ली होती आणी आत पैसे, शेअर्स व इतर कागदपत्रे होती. थोडक्यात कुणावर नाव घ्यावे असे काही नव्हते. "

" खर आहे"

" बर तो तारी सापडला, त्याचे हाताचे ठसे सापडले. त्याच्याकडे खुनी हत्यार सापडले. त्याच्या जागेत कपडे सापडले. वरवर पाहता तोच शहाचा खुनी असल्याचा भास झाला. पण तो असणे शक्यच नव्हते. "

" तुम्हाला पुर्वीपासुनच तसे वाटतच होते "

" आणी गम्मत म्हणजे त्याला कुणीही ह्या प्रकरणात अड्कवले नव्हते. त्याचा तोच अडकत गेला. खुनी फक्त हत्यार कारपाशीच सोडुन गेला. "

" आतातर तारीचाही खुन झाला. "

" हो ना. ह्या दोन खुनात काहीतरी दुवा आहे. पण काय तो लक्षात येत नाही. तारीला शहाच्या खुनाबद्दल काही माहीती होती म्हणुन त्याचा खुन झाला म्हणावे तर तो काहीतरी बोलला असता. त्याने काहीतरी जबाबात क्लु दिला असता."

" तारीला मेरीबद्दल फोन कुणी केला कळले का ? "

" फोन कोहीनुर मधल्याच पे फोन वरुन केला होता. कुणी केला होता ते मात्र कळले नाही "

"ती व्यक्तीतर खुनी नसेल ?"

" हो पण त्या व्यक्तीला खुन करायला इमारतीत तर यावे लागेल. आम्ही फोनच्या वेळेपासुनचे डोअर रजीस्टर चेक केले. त्यात असलेली प्रत्येक एंट्री तपासली. कुणाबद्दल्ही संशय घ्यायला जागा नव्हती. "

" बापरे. पोलिस एवढे काम करतात माहीत नव्हते. "

" बर त्या तारीचा खुन तर इतक्या बेमालुमपणे झालाय. एकुलता एक आधार म्हणजे कुणी छमकछल्लो रात्री तीथे आली होती. तीचा शोध घ्यायचा आम्ही बराच प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी संगीतलेल्या वर्णनाच्या शेकडो पोरी आजुबाजुला धंदा करताना सापडतील"

" त्या दिवशी मेरी कुठे होती "

" ती ही आई बरोबर दवाखान्यात होती. आणी तीला तारीचा खुन करायचे कारणच नव्ह्ते. तो सुटावा म्हणुन तीने केवढे प्रयत्न केले. ह्या केसेस माज्याकडेच का आल्या ते कळत नाही "

क्रमशः

गुलमोहर: 

अविनाश जोशी,

>> “समीर कोण समीर?” Lol

तुमच्या विनोदबुद्धीला दाद द्यावीशी वाटते! कथाही मस्तच आहे. रंगत चालली आहे. पहिल्या गुन्ह्यातील (शहाचा खून) संशयिताचा (=तारीचा) खून करून मुख्य गुन्हेगार लपवणे ही जुनीच रीत आहे. अश्या प्रकारची एक केस मुंबईत झाली होती (अदमासे २००५). पहिल्या गुन्हा एका खूप बड्या धेंडाविरुद्ध घडला होता. मात्र मुख्य संशयिताची हत्या झाली आणि सर्वच तपास थंडावला. तेव्हाचं वातावरणही अगदी असंच होतं. गोंधळात टाकणारं!

Happy

आ.न.,
-गा.पै.