चारोळी स्पर्धा...मसाला मार के...(२)

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 March, 2012 - 10:41

पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे दुसरं छायाचित्र...

चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!

Chickentandoori_MCharoli_2.jpg

स्पर्धेचं स्वरूप आणि नियम http://www.maayboli.com/node/33622 इथे दिले आहेत.
या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..
***
वरील छायाचित्र kspoddar यांच्या सौजन्यानं (Creative Commons Attribution-Share Alike 2.0 Generic license अंतर्गत)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोंबडी सजून, तंगडी धरून,
तंदूर बघाया घुसली
नडली हुशारी, उत्सुकता सारी
डायरेक्ट 'शिगेला' पोचली

मामी, कौतुक, अक्के , सगळेच Lol

कोंबडी भाजली तंदूरमधे
फासुन गरम मस्साला......
शाकाहार्‍यांनी मुरडली नाकं
मांसाहार्‍यांची ला-ग-ला..... Lol

माझ्याकडुन अजुन एक......

तंगडीत तंगडी कोंबडी ची होss कोंबडीची
गरम मसाल्यात मुरवायची होss मुरवायची
सळईमध्ये घुसवायची होss घुसवायची
तंदूरमध्ये शेकायची होss शेकायची...

अश्शी तंगडी चविष्ट बाई प्लेटीतss काढावी
अश्शी प्लेट सुरेख बाई हातातss धरावी
अस्सा हात हावरट्ट बाई धीर तोss धरेना

उचलली तंगडी, घातली तोंडी, खा खा खल्ली...ढेकरss दिली हो
पोट सुटले, वजन वाढले... आता??? इकडेss धावा हो..... Lol

लाजो यांना पुढील किमान तीन चित्रपटांची प्रत्येकी दोन तिकिटे द्यावीत ही मा.प्रा. यांना विनंती Happy

टोके, बेटर लक नेक्स्ट टाईम Proud

लाजो यांना पुढील किमान तीन चित्रपटांची प्रत्येकी दोन तिकिटे द्यावीत ही मा.प्रा. यांना विनंती

Proud अनुचिकन

झणझणीत मसाला, लसूण आणि आलं
दोन तास चिकन मेरीनेट केलं
शिगेला लावून कोळश्यावर धरा
चटकदार तंदुरी गट्टम करा
----------------------------------------
सिख कबाब ची लज्जतच न्यारी
मसाल्यात घोळवलेले दिसतात मस्त
स्मोक फ्लेवर ने तोंडाला पाणी सुटते
टेबलावरची डिश होते मिनटात फस्त

मसालेदार चिकन तंदुरी चा टाकून फोटो
भागवली नुसती डोळ्यांची भूक
मायबोलीकरांना चारोळ्या करायला लावून
कोठे पळून गेला हा कूक ?

कैफ ' चढला कोंबडीला !
उलटी टांगलेली पाहून!
तडक पळाली मुंबईला!
तंगडीत चप्पल धरुन!

अब्रूचे झाले नुकसान!
दावा कोंबडीने ठोकला!
कोंबडाही मग सरळ!
उपोषणास बसला !
---------------------------------------------------
अमोल केळकर

मला काय आठवल असेल ,,,एक सुप्रसिद्ध गाण
कोंबडी पळाली ,,तंगडी धरुन ,,लंगडी घालायला लागली Happy

Pages