पोट तुडुंब भरल्यावरही परत परत खावासा वाटतो एखादा चमचमीत, मसालेदार पदार्थ...
साग्रसंगीत जेवणानंतरही कधीकधी जिभेवर चव रेंगाळते एखाद्या मस्त जमलेल्या मसालेदार पानाची. ..
तसंच अनेक कविता, लेख वाचूनही परतपरत आठवते, मनात घर करते एखादी फक्कड जमलेली चारोळी!
'मसाला' या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या चारोळ्यांच्या स्पर्धेतलं हे दुसरं छायाचित्र...
चला तर मग... अन्नदाता आणि चारोळीकर्ता सुखी भव !!
स्पर्धेचं स्वरूप आणि नियम http://www.maayboli.com/node/33622 इथे दिले आहेत.
या स्पर्धेच्या विजेत्यास मिळतील 'मसाला' चित्रपटाच्या मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या खेळाची दोन तिकिटं..
***
वरील छायाचित्र kspoddar यांच्या सौजन्यानं (Creative Commons Attribution-Share Alike 2.0 Generic license अंतर्गत)
भुंगा फुलं सोडून तंदूरी
भुंगा फुलं सोडून तंदूरी चिकनवर मँडरायला लागला का? ....
मामी........ हिंदीचा पुरस्कार
मामी........ हिंदीचा पुरस्कार सुरू केलायेस का??? "मँडरायला" काय
माझे नाव चिकन तंदुरी आधी होते
माझे नाव चिकन तंदुरी
आधी होते मी लुसलुशीत
मस्साला लेवून भट्टीत गेले
नी आता झाले बघा चमचमीत!
"मँडरायला"
"मँडरायला"
मँडरायला मंदार चारोळी आवडली
मँडरायला
मंदार चारोळी आवडली पण यमकात जरा दुरुस्ती हवीये..
कोंबडी सजून, तंगडी
कोंबडी सजून, तंगडी धरून,
तंदूर बघाया घुसली
नडली हुशारी, उत्सुकता सारी
डायरेक्ट 'शिगेला' पोचली
अस्सल कौतुक
अस्सल कौतुक
अश्शी लाल आणि मसालेदार कोंबडी
अश्शी लाल आणि मसालेदार
कोंबडी पाहून तुमची भूक चळली
माझ्या रसनेचे लाड करायला
कांदाभजी शीगेत ओवून खाल्ली
मामी, कौतुक, अक्के , सगळेच
मामी, कौतुक, अक्के , सगळेच
कोंबडी भाजली तंदूरमधे
फासुन गरम मस्साला......
शाकाहार्यांनी मुरडली नाकं
मांसाहार्यांची ला-ग-ला.....
मसाल्यात मुरली तंदूरमध्ये
मसाल्यात मुरली
तंदूरमध्ये भाजली
तिच्या शृंगाराने
लाळ सगळ्यांची गळली!
लय भारी!
लय भारी!
माझ्याकडुन अजुन
माझ्याकडुन अजुन एक......
तंगडीत तंगडी कोंबडी ची होss कोंबडीची
गरम मसाल्यात मुरवायची होss मुरवायची
सळईमध्ये घुसवायची होss घुसवायची
तंदूरमध्ये शेकायची होss शेकायची...
अश्शी तंगडी चविष्ट बाई प्लेटीतss काढावी
अश्शी प्लेट सुरेख बाई हातातss धरावी
अस्सा हात हावरट्ट बाई धीर तोss धरेना
उचलली तंगडी, घातली तोंडी, खा खा खल्ली...ढेकरss दिली हो
पोट सुटले, वजन वाढले... आता??? इकडेss धावा हो.....
लाजो
लाजो
लाजो .....
लाजो .....
लाजो...
लाजो...
(No subject)
लाजो यांना पुढील किमान तीन
लाजो यांना पुढील किमान तीन चित्रपटांची प्रत्येकी दोन तिकिटे द्यावीत ही मा.प्रा. यांना विनंती
टोके, बेटर लक नेक्स्ट टाईम
लाजो यांना पुढील किमान तीन
लाजो यांना पुढील किमान तीन चित्रपटांची प्रत्येकी दोन तिकिटे द्यावीत ही मा.प्रा. यांना विनंती
अनुचिकन
(No subject)
चुप बस भुंग्या!
चुप बस भुंग्या!
झणझणीत मसाला, लसूण आणि
झणझणीत मसाला, लसूण आणि आलं
दोन तास चिकन मेरीनेट केलं
शिगेला लावून कोळश्यावर धरा
चटकदार तंदुरी गट्टम करा
----------------------------------------
सिख कबाब ची लज्जतच न्यारी
मसाल्यात घोळवलेले दिसतात मस्त
स्मोक फ्लेवर ने तोंडाला पाणी सुटते
टेबलावरची डिश होते मिनटात फस्त
मसालेदार चिकन तंदुरी चा
मसालेदार चिकन तंदुरी चा टाकून फोटो
भागवली नुसती डोळ्यांची भूक
मायबोलीकरांना चारोळ्या करायला लावून
कोठे पळून गेला हा कूक ?
कैफ ' चढला कोंबडीला ! उलटी
कैफ ' चढला कोंबडीला !
उलटी टांगलेली पाहून!
तडक पळाली मुंबईला!
तंगडीत चप्पल धरुन!
अब्रूचे झाले नुकसान!
दावा कोंबडीने ठोकला!
कोंबडाही मग सरळ!
उपोषणास बसला !
---------------------------------------------------
अमोल केळकर
ब्रॉयलर कोंबडी मसाल्यात
ब्रॉयलर कोंबडी
मसाल्यात घोळली
तंदूर मध्ये पोळली
चटकदार रूप बघून भूक चाळवली.....
मला काय आठवल असेल ,,,एक
मला काय आठवल असेल ,,,एक सुप्रसिद्ध गाण
कोंबडी पळाली ,,तंगडी धरुन ,,लंगडी घालायला लागली
वाव सुन्दर \\\
वाव सुन्दर
\\\
Pages