बोगोर बुदुर .. भाग ११

Submitted by अविनाश जोशी on 28 March, 2012 - 05:49

--२५--
समीरला ही तोच प्रश्न पडला होता.

त्याने गणपतीचे गुढच उलगडायचे ठरवले. त्याने कुणालला फोन लावला.

" अरे कुणाल तुला मी जशच्या रीसेप्शनचे फोटो काढायला सांगीतले होते. त्याचे काय झाले"

" काढले, पण त्यात गणपती नाही"

" काय?"

" पाहीजेतर मी इमेल करतो. तुम्ही पाहुन घ्या"

हा ही मार्ग बंद झाला होता.

त्याने कांचनला फोन करायचे ठरवले

" कांचन्भाय अरे माझ्या कामाचे तु काय केलेस?"

" काही नाही. अरे आज सकाळी तर सॅंपल्स माझ्याकडे आली. टेस्टस सुरु केल्या आहेत. उद्या पर्यंत
तुला कल्पना देतो."

चला हा ही डेड एंड!!

आता जशच्या ऑफीसला रात्री भेट देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
दिवसभरात समीरने जश सिक्युरीटीची टेहळणी केली. तशी फार कडक नव्हती. इमारतीच्या प्रवेश्द्वारावरच फ्क्त होती आणी ती ही फारशी हायटेक नव्हती. तरीसुद्धा समीरर्ने कुठलाही धोका पत्करायाचा नाही असे ठरवले.

रात्र पडताच तो बाहेर पडला.

कोपऱ्यावर उभी केलेल्या एका जुनाट फियाट मधुन त्याने BKC कडे जायचे ठरवले.

ती गाडी दिसायला पिवळ्या काळ्या टॅक्सी सारखी होती. समीर अशा वेगवेगळ्या गाड्या तयार ठेवत असे. आज त्याच्या अंगावर खास खाकी ड्रेस अगदी बिल्ल्यासहीत होता.

साडेअकराच्या सुमारास तो जशच्या निमारतीपाशी पोहोचला. गाडी त्याने मागच्या बाजुला नेली. तिथले फ्राइट लिफ्टचे कुलुप म्हणजे समीरच्या हातचा मळ होता. तो मुद्दामहुन दोन मजले वर गेला आणी चालत खाली आला.

जशचे दार उघडुन आत जाणे त्याला अवघड गेले नाही. आत भरपुर प्रकाश होता. त्याला रिसेप्शन मधे गणपती दिसला नाही, त्या जागी एक गरुडाची मुर्ती होती.

माखानीची केबीन त्याला माहीत होती. त्याचेही कुलुप उघडुन तो आत शिरला.

अगोदर त्याने मोर्चा माखानीच्या कंप्युटरकडे वळवला. दोन मिनीटातच त्याने पासवर्ड हॅक केला. तो डाटा बघण्यात फारसा वेळ घालवत बसला नाही. त्याने खिशातुन एक सॅटेलाइट फोन काढला. तो जोडुन त्याने सर्व माहीती त्यच्या घरच्या कंप्युटरकडे पाठवायला सुरुवात केली. ते काम चलु असतानाच त्याने केबीनची बारकाइने तपासणी करायला सुरुवात केली. महत्वाच्या फाइल्सचे तो डिजीटल फोटोहि घेत होता.

सर्व पेपर्स चाळल्यावर त्याने ऑफीसच्या सेफकडे मोर्चा वळवला. सेफ एक गणपती सोडला तर पुर्ण रिकामी होती. हिच मुर्ती समीरने रिसेअप्शनमधे पाहीली होती. आता तर त्याला गणपतीचे गुढ जास्तच सताउ लागले. काहीतरी हालचाल केल्याशिवाय पुढचा मार्ग दिसणार नव्हता. त्याचा डाटा ट्रान्स्फरही पुर्ण झाला होता. गणपतीची मुर्ती जड असली तरी समीरला हलवण्यासारखी होती. त्याने गणपतीची मुर्ती फ्राईट लिफट पाशी आणली. सर्व ऑफीस बंद न करता त्याने सताड उघडे टाकले.

खाली आल्यावर गणपती डीकीत टाकेपर्यंत त्याचा सुद्धा दम निघाला होता. गाडी सुरु करणार तेवढ्यात एका इन्स्पेक्टरने गाडी थांबवली.

" चल बे जरा बोरीवली "

" नाही साहेब मला ठाणयाला जायचय"

" अरे काय् माज आला काय? का मी"च तुला ठाण्याला घेउन जाउ"

" नाही साहेब आत्ता नाही येणार. हवे असेल तर कंप्लेंट करा. माझा मीटर मी बंद केला आहे. तुम्ही जबरदस्ती केलीत तर उद्या शहरातल्या गाड्या बंद होतील. मी तुम्हाला दुसरी तॅक्सीपर्यंत घेउन जातो."

इन्स्पेक्टर चडफडत होता. पण ड्रायव्हर सेनेचा असला तर भलतेच अंगलट यायचे म्हणुन तो कसाबसा तयार झाला. समीरला खात्री होती तो त्याला परत पाहीले तरी ओळखु शकणार नाही. त्याने सायनला त्याला सोडले. इन्स्पेक्टर उतरताना त्याचा नंबर घ्यायला विसरला नाही.

काही वेळ इस्टर्न एक्स्प्रेस वर गेल्यावर गाडी वळवुन घरी नेली. गणपती त्याने उतरवुन तानाजीला त्या संबधात सुचना केल्या. आता ती मुर्ती जवळ्जवळ गुप्त झाल्यात जमा होती.

गाडीच्या नंबर प्लेटस त्याने बदलल्या आणी गाडी त्याने भेंडीबाजारमधे सोडुन दिली. गाडीचा प्रत्येक भाग सकाळपर्यंत वेगळा होइल ह्याची त्याला खात्री होती. घरी जाउन त्याने मस्त ताणुन दिली.

सकाळी तो खाली आला तो राणेंचा आरडाओरडा त्याला ऐकु येत होता. खाली आलो तर तानाजीवर त्यांची सरबत्ती चालु होती.

" हं सांग. तुझा मालक काल रात्री कुठे होता. ?"

" राणे त्याल का छळता. मी येथेच आहे."

" या. आज जरा झोप जास्तच झालेली दिसते."

" खरय. काल घेलाशेटबरोबर बसलो होतो. बोलता बोलता तीन कधी वाजले कळलेच नाही."

" घेलाशेटनी काय टॅक्सीचा धंदा सुरु केला काय?"

" अस तुम्हाला का वाटल?"

" एक सांग BMY 2792 गाडी तुझी आहे?"

" हो. माझी पहीली गाडी?"

" काल रात्री एक वाजता तु BKC मधे काय करत होतास?"

" राणे मी काल रात्री घेलाशेटबरोबर होतो "

" काल आमच्या एका इस्पेक्टरने तुला तीथे पाहीले"

" नाही म्हणजे त्याची ड्युटी जरा जास्त झाली असेल."

" त्याला मी इथेच बोलावले आहे. येइलच तो इतक्यात."

" बर काय चहा घेणार?"

" त्या अगोदर मला घेलाशेट्शी बोलु देत."

" खुशाल" समीरने अगोदरच फील्डींग लावली होती. तेवढ्यात कालचा इन्स्पेक्टरही आला. कालचा समीर आणी आजचा ह्यात जमीन अस्मानाचे अंतर होते.

" जाधव. काल तुम्ही ह्याला भेटला होता?" समीरकडे बोट दाखवत राणे म्हणाले.

" नाही साहेब. तो जरा बुटका आणी जाडा होता."

" गाडीचा तुम्ही घेतलेला नंबर काय होता?"

" BMY 2792 साहेब"

" समीर ही गाडी तुझी आहे? "

" हो. दाखवु का?"

" चला. " समीरने गॅरेजमधील मर्क दाखवली. जाधव दोन्दोनदा नंबर चेक करत होते.

" साहेब ती फीयाट टॅक्सी होती"

" काय समीर काय चावटपणा आहे?"

" कसला चावटपणा साहेब? तुम्हीच मला त्रास देताय. तो सुद्धा माझाच चहा पिउन. RTO मधुन तुम्ही
गाडीच्या मालकाचे नाव काढलेत, त्याच वेळेसच गाडी मॉडेल पण काढले असते तर तुमचा आणी माझा वेळ वाया गेला नसता. बर काय भानगड आहे? "

" छान म्हणजे भानगडी तु कर आणी आम्हाला विचार?"

" तरी?"

" जशच्या ऑफीसमधे काल चोरी झाली"

" मग काय गेले"

" भुरटा चोर असावा. कारण तिजोरीतुन दहा बारा हजार गेले."

" आणी त्याकरता तुम्ही मधे पडलात?"

" तुझे नाव आले म्हणुन मला इन्व्हॉल्व व्हावे लागले."

" पण मी इतकी भुरटी चोरी करायला जाइन का?"

" समीर तु कधी काय करशील ते कळणे अवघद आहे"

"राणे आणी ती टॅक्सी शोधा. उगिचच माला बदनाम करतोय."

" मला खात्री आहे की त्या टॅक्सीचे आत्तापर्यंत स्पेअर्स झाले असणार.. चल निघतो आम्ही. "

--२६--

राणे गेल्यावर समीर बागेतच विचार करत बसला. तेवढ्यात कांचनचा फोन आला.

" समीर, बाळा ही मुर्ती तुला कुठे सापडली ? "

" अशीच भंगारात. "

" मला तरी जागा दाखव. अजुन मुर्ती सापडता आहेत का ते बघतॊ."

" म्हणजे ?"

" तु दिलेली मुर्ती नवव्या शतकातली असुन तीची कींमत सहज एक कोटीवर आहे. मुख्य म्हणजे इंडोनेसियातील देवळातुन व बाली, बुदुर व पुर्वकला संग्राहालयातुन गेल्या काही वर्षात कितेक मुर्तींची तस्करी झाली आहे. तु ज्या अडीच फुट मुर्तीचा उल्लेख केलास ती मुर्तीही त्या यादीत आहे. तीची कींमत सहज ७० कोटीवर जाइल."

" Oh! I See "

" काय दिसले तुला ? मला तर काही दिसत नाही. आणी तुझे काम म्हणजे सर्व लफड्याचीच. ह्या मुर्तीकरता ईंटरपोलची नोटीस आहे"

" सोप आहे. आठ दिवस जाउदेत. नंतर तुझा संशय तु वरिष्ठांकडे बोलुन दाखव. व त्यांच्या सल्ल्यप्रमाणे कर. "

" अरे पण तु बाराच्या भावात जाशीलना. तुझ्यामागे ससेमीरा लागेल ना ?"

" कांचन ..जरा देणार्याचे नाव पत्ता बघ. प्रत्येक वेळेला मी नवीन ओळख वापरतो. उलट तुलाच छान प्रसिद्धी मिळेल. "

कांचनचा फोन बंद करुन समीर विचारात पडला. कॊड्याचे काही भाग जुळत होते पण शहाच्या खुनाचे धागेदोरे कुठेच सापडत नव्हते. कुणालशी बोलुन त्याने तारीच्या खटल्याविषयी विचारुन घेतले. दुसऱ्याच दिवशी पुढची तारीख होती.

शेवटची जबाब तारीचाच होता. निकम फारशा उत्साहात नव्हते. नाव पत्ता असे जुजबी प्रश्न विचार्ल्यावर त्यांनी सुरुवात केली.

" तु तेथे गेला होतास."

" होय साहेब "

" का गेला होतास ?"

"मेरी ला त्या हलकटाने फ्लॅटवर नेल्याचे कळले म्हणुन "

" म्हणजे तु रागात होतास ?"

" हो"

" रागाच्या भरात तु शाहाचा खुन केलास. "

" नाही साहेब "

" का. मेरीनेच खुन केला ?"

" माहीत नाही साहेब"

" तु तीथे पोचल्यावर काय झाले ?"

" मी कार थांबताना पाहीली आणी मीनीटभरातच मेरीला कारमधुन उतरुन लिफ्टकडे जाताना पाहीले"

"त्या वेळेला शहा जिवंत होते"

" माहीत नाही साहेब. "

" मग पुढे काय झाले ?"

" मी. मेरीच्या मागे जाईपऱ्यंत ती वर निघुन गेली. मीही तीच्या पाठोपाठ गेलो. "

" वर सोनल मॅडम बघुन मी जरा हादरलो होतो, पण मेरी दिसताच माझा ताबा सुटला. "

" मग तु काय केलेस ?"

" एक कानफाटात लावुन दिली साहेब."

" मग सोनल मॅडमनी आम्हाला आतल्या खोलीत जायला सांगीतले. शहासमोर उगीच तमाशा नको म्हणल्या"

" मग?"

" काही नाही साहेब.मी मेरीला नको नको ते बोललो. शिव्या घातल्या आणी तेथुन खाली गेलो. "

" आणी मग त्याच भरात तु खुन केलास"

"नाही साहेब. मी खाली आलो तर शाहाच्या गाडीची काच उघडी होती. मी खरतर त्याला शिव्या घालायलाच गाडीकडे गेलो. पण त्याचा कुणीतरी गेम केला होता. "

" तुच केलास ना?"

"नाही साहेब."

"बर ते रिव्हॉल्वर काय त्याने तुला मरता मरता दिले?"

"नाही. ते कारजवळच पडले होते. ते मी उचलुन घेतले"

"तारी तु खोटे बोलत आहेस. तु शहाशी भांडलास. त्याने पिस्तुल तुझ्यावर रोखले. तु ते हिसकावुन घेतलेस आणी त्याच पिस्तुलाने शहाला चार गोळ्या घालुन खलास केलेस."

"नाही साहेब.पण ज्याने केले ना त्याने सर्व पोरींवर फार उपकार केले "

" your witness"

जेम्सने तपासणीस नकार दिला.

" जेम्स बचावातरफे तुम्हाला काही पुरावे सादर करायचे आहेत. ?"

" नाही. "

" ठीक आहे. उद्या arguments व्हायला काही हरकत नाही"

--२८--
तस पाहीले तर खटल्यातला दम केव्हाच निघुन गेला होता. कदमांनी सर्व भर परिस्थीतीजन्य पुराव्यावरच दिला.

" मिलॉर्ड. आरोपी हा चार्जशीटर आहे. त्याच्यावर पुर्वीचे खटले आहेत. त्याच्या मेरीला घेउन शहा गेल्यामुळे चिडुन त्याने त्या दोघांचा पाठलाग केला. संधी साधुन शहाचा खुन केला. खुनाचे हत्यार तसेच रक्ताने माखलेले कपडे त्याच्याच घरात सापडले. रिव्हॉल्वर वर तसेच गाडीच्या दारावर त्याच्या हाताचे ठसेही मिळाले आहेत. हे सर्व पुरावे त्याच्यावर आरोप सिद्ध करण्यास पुरेसे आहेत. आरोपी ला ३०२ खाली शिक्षा व्हावी"

जेम्सचा बचाव जास्त शास्त्रशुद्ध होता.

" मिलॉर्ड. खुनाला मोटिव्ह असायला लागतो, शस्त्र असावे लागते आणी संधी असावी लागते.
मोटीव्हचा प्रश्नच नाही. हत्यार ही होते. आता राहीला प्रश्न संधीचा.
आरोपीला खुन करायची संधी दोन वेळेला होती. एकतर गेल्यागेल्या किंवा परत येताना.
गुरख्याच्या नोंदिनुसार आरोपी शहानंतर पाचच मिनिटात तेथे पोहचला व इतर साक्षीनुसार मेरीच्या पाठोपाठच वर गेला.
तसेच फोन कंपनीच्या रेकॉर्डवरुन शहाचा शेवटचा कॉल ११/१२ मिनीटे चालु होता.
म्हणजेच तारी वर गेला तेव्हा शहा जिवंत होता.
तारीचे व मेरीची बोलाचाली १५/२० मिनीटे झाली.
शहाचा कॉल संपल्यावर तो मेरीकरता लगेचच वर आला असता.
पण तो आला नाही कारण त्याचा त्या दरम्यान तारी वर असतानाच खुन झाला होता.
खाली थांबुन तो कुठलाही दुसरा फोन करत नव्हता कींवा कुणाशीही गप्पा मारत नव्हता. निदान तसा कुठलाही पुरावा आपल्यासमोर नाही.
आरोपीला निर्दोषी सोडावे अशी माझी विनंती आहे."

खटल्याचा निकाल लागुन तारी सुटला. त्याचप्रमाणे पोलीसांवर ताशेरेही ओढले गेले. मेरीचा आनंद तीच्या चेहऱ्यावर दिसत होता.

समीरला कोडे काही सुटत नव्हते. तारीलाच एकदा गाठावे असा त्याने विचार केला. कुणालशीही तो ती गोष्ट बोलला.

पण कोडे इतक्या चटकन सुटायचे नव्ह्ते. दुसऱ्या दिवशी तारीकडे दोघांनी जयचे असे ठरवले. समीर व कुणाल दोघेही बातमीदार म्हणुनच जाणार होते.

एका अगदी साध्या गाडीतुन दोघेही सकाळी सातलाच नालादोपारा पोहोचले. समीरने पत्ता शोधायचे नाटक केले.

दोघेही चाळीशी पोहोचले तेंव्हा सात वाजुन गेले होते. चाळीत लगबग सुरु झाली होती. खोलीपाशी पोचुन दोघांनीही दार वाजवले. बराच वेळ झाला तरी आतुन कसलाच आवज नव्हता. दार लोटलेलेच होते. दार ढकलुन आत पोहोचले. आत दारुचा दर्प सुटला होता. साफ न केल्यामुळे इतरही असंख्य वास सुटले होते.

पलंगावर तारी पडला होता. जमीनीवर भेळेचे कागद, गाजराचे तुकडे, अर्धा भरलेला दारुचा ग्लास होता. तारीचा श्वास धापा टाकल्यासारखा होता व चेहराही वेदनेत पिळवटलेला होता. त्याला बोलताही येत नव्हते.

कुणालने अम्बुलन्सला आणी समीरने राणेंना फोन केला. लोकांच्या मदतीने तारीला खाली आणुन त्यांनी जवळच्या सुश्रुत हॉस्पीटलला नेले. समीर मागेच थांबला आणी कुणाल दवाखान्यात गेला. आता बरीच गर्दी जमली होती. समीरने कुणालचा कॅमेरा ठेवुन घेतला होता. तो बातमीदार आहे असे सांगीतल्यावर त्याच्याभोवती गर्दी जमा झाली होती.

" काल तारी सुटुन आला, तेंव्हापासुन पीतच होता. " एक टपोरी

" पहील्यांदा दुकानात आणी मग एक पोरीबरोबर घरात. "

" पोरीबरोबर? " समीरने कान टवकारले.

" हो ना.. फारच छमकछल्लु होती. भाड्यावर आणली असावी " दुसरा

" कोण होती?"

" करीना होती. काय राव अशा पोरी काय नावगाव सांगुन येणार आहेत का?"

तेवढ्यात कुणालचा फोन आला

" समीर आम्ही इथे दवाखान्यात पोहोचलो आहे. पण इथे तारीला DOA ( death on arrival ) घोषीत केले आहे. बिचारा रस्त्यातच मेला "

" ठीक आहे. मी राणेंना कळवतो आ0णी त्यांना आपली स्टेट्मेंटस घ्यायला घरीच बोलावतॊ "

क्रमशः

गुलमोहर: 

रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १ http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २ http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३ http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4 http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर भाग ५ http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६ http://www.maayboli.com/node/33730
बोगोर बुदुर भाग 7 http://www.maayboli.com/node/33764
बोगोर बुदुर भाग 8 http://www.maayboli.com/node/33765
बोगोर बुदुर भाग 9 http://www.maayboli.com/node/33778
माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे,
कथा “सवत माझी लाडकी” http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास http://www.maayboli.com/node/33369