स्टफ्ड पाने हा मेडीटीरीअन मधे लोक प्रिय आहे. ग्रीस मधे डोल्म म्हणुन तो विविध प्रकारे शाकाहारी अथवा मांसाहारी बनवला जातो. ईस्रायल मधे ही हा बराच खाल्ला जातो. ज्यु लोकांकरता हा सुक्कोट ( सुगीचा सण) ह्या सणात बनवला जातो. अमेरीकेमधे थॅक्स गीवींग पद्ध्त ह्यातुन सुरु झाली आहे. ह्या सुमारास द्राक्षाची भरपुर पाने उपलब्ध असतात. ( हल्ली कोल्ड स्टोरेज मधे टीन्ड पण मिळतात)
अर्धी वाटी पाइन नटस .. पर्यायी भोप्ळ्याच्या बिया, चरोळ्या इ [ चाईनीज पाइन नट्स घेउ नयेत. नेस्लेच्य्या संशोधनानुसार त्यामुळे तोंडाची चवच काही दिवस बदलते]
२ वाट्या बासमती
कांदे, तीळ वाटुन, पुदिना , लेमन ज्युस, मीठ, मिरपुड [ सर्व चवीनुसार]
२ कप भाताची पेज / व्हेज सुप [ मला स्वतःला रस्सम फार बरे वाटते]
अर्धा कप ऑलिव्ह ऑइल [ मेडीटेरीअन चवीला पाहीजेच.]
१. नट्स कढइत भाजुन घ्या
२. ऑलीव्ह ऑइल मधे कांदा परता
३. बासमती त्यात टाकुन २ मि. परता
४.पेज, सुप, रस्सम त्यात घाला
५. परतत भात अर्धवट शिजवा. रस्सम्/सुप त्यात मुरेल असेच टाका [ भात पुर्ण शिजवु नये ]
६. भात उतर्वुन त्यात नट्स, लींबचा रस, तीळ , पुदीना , मीठ, मीरपुड चवीप्रमाणे टाका.
७. भात थंड होउदेत [फ्रीज नाही]
८. मीठाच्या उकळत्या पाण्यात द्राक्शाची पाने ठेवुन मउ करा
९. पानांची डेखे आणी शिरा काढा
१०. खाली दाखवल्याप्रमाणे पानात राइस स्ट्फ करा
११.पानांचे रोल्स पॅन मधे लावुन घ्या. सुटत नाहीत. पण जर भीती वाटत असेल तर रोल वर दोरा बांधायला हरकत नाही
१२. पेज, रस्सम, ऑलीव्ह ऑइल, लेमन ज्युस पानांवर ओता.
१३. मंद उष्णतेवर ४०/५० मि शिजवा. कुठल्याही परीस्थीतीत उकळु देउ नका.
१४. शिजताना वरुन एखादी बशी उलटी ठेवावी. म्हणजे रोल उघडत नाहीत
१५ शिजल्यावर गरम /गार कुठल्याही आवडत्या सॉस बरोबर सर्व्ह करवी. ताहीनी छान लागतो.
फोटोकरता थांबा
पानांसकट खायचे असतात.
होलिश्केस ह्या पदार्थात द्राक्श पाना ऐवजी पान कोबी ची पाने वापरतात. प्ण चवीत फार फरक पडतो.
वाव... काहीतरी वेगळेच
वाव... काहीतरी वेगळेच आहे.
पानांसकट खायचे असतात.
बरे झाले लिहिलेत ते..
मला अस वाटत एक रोल मधुन कट
मला अस वाटत एक रोल मधुन कट केलेला असा एक फोटो टाका
फोटो थोडे राहिलेत टाकायचे
फोटो थोडे राहिलेत टाकायचे बहुतेक...
मित्रांनो अजुन ८ फोटो टाकायचे
मित्रांनो अजुन ८ फोटो टाकायचे आहेत. झाल्यावर मी फोतोसकट असे लीहीन
नवीन पाकृ.. छान आणी वेगळीही..
नवीन पाकृ.. छान आणी वेगळीही..
छान. मी खाल्ला आहे.
छान. मी खाल्ला आहे.
अविनाश जोशी
अविनाश जोशी धन्यवाद
माझ्यासारख्या ग्।आसपूसवाल्यांचा आवर्जून विचार केलात. तुमची ही सीरीज खरच भन्नाट आहे. एरव्ही मी या विभागात नांदत नाही, पण तुमच्या जाहीरातीमुळे लक्ष वेधलं गेलं...आणि खरंच आगळंवेगळंपण आहे.
मस्त प्रकार. सिंगापूरात
मस्त प्रकार. सिंगापूरात खाल्लेत. सकाळच्या न्याहरीला असायचे.
वेगळाच
वेगळाच प्रकार....
दिनेशदांच्या जोडीला आता हे पण आलेत.. सही
डोल्मा हा प्रकार मला अतिशय
डोल्मा हा प्रकार मला अतिशय आवडतो
इथे व्हेज आनि मीट स्टफिंग असलेले असे दोन्ही प्रकारचे डोल्मे मिळतात...
अविनाश... दोन शंका आहेत, त्या
अविनाश...
दोन शंका आहेत, त्या जरा क्लिअर करा...
१> भारतात 'पाईन नट्स' सहजा-सहजी मिळताना कठीण... त्या ऐवजी बाजारात मिळाणारा 'चारमगज' (भोपळा, कलिंगड च्या सोललेल्या बिया, चारोळ्य... इ. एकत्र केलेला प्रकार) वापरला तर चालेल का?...
२> स्टेप क्र. ८ मधे मीठ आनी पाणी यांचं प्रमाण किती ठेवावं लागेल?...
विवेक चारमगज चालेल. नुसत्या
विवेक
चारमगज चालेल. नुसत्या भोपळ्याच्या बिया सुद्धा चालतात.
पाण्यात एक्/दोन चमचेच मीठ टाकावे. जास्त नको.
वॉव! वेगळाच प्रकार!
वॉव! वेगळाच प्रकार!
वत्सला, आपल्याकडे टीन्ड
वत्सला, आपल्याकडे टीन्ड डोल्मा वुलवर्थ्स मधे मिळतात. किंवा 'अलीबाबा' सारख्या लेबनी टेकअवे/रेस्टॉरंट्स मधे ही मिळतात.
मस्त पाककृती!
मस्त पाककृती!
लेबनीज रेस्टॉरेंट्स मधून
लेबनीज रेस्टॉरेंट्स मधून मिळणारा डोल्मा ही मस्त लागतो, खीमा भरून..
रस्सम... वेल.. माहीत नाही कसा लागेल...
चित्रविचित्र सीरीज मस्त चाललीये..खूपच इंटरेस्टिंग
वत्सला, आपल्याकडे टीन्ड
वत्सला, आपल्याकडे टीन्ड डोल्मा वुलवर्थ्स मधे मिळतात. किंवा 'अलीबाबा' सारख्या लेबनी टेकअवे/रेस्टॉरंट्स मधे ही मिळतात.>>> धन्यवाद लाजो, नक्की ट्राय करते.
मस्त!!
मस्त!!
एक विनंती - धागा सार्वजनिक
एक विनंती - धागा सार्वजनिक करा, सगळ्यांनाच पाहता येईल.
मस्त!!
मस्त!!
आगळा वेगळा पदार्थ! ट्राय
आगळा वेगळा पदार्थ! ट्राय करायला हरकत नाही!!:)
पण द्राक्षाची पाने? ती शोधावी लागतील चांगल्या बागेत फवारणी न केलेली आणि कीडविरहीत!
अविनाश जोशी, फोटो टाकायची खबरदारी घेतलीत ह्यावेळी हे छान केलेत!
कृष्णाजी द्राक्श पाना ऐवजी
कृष्णाजी
द्राक्श पाना ऐवजी पान कोबी ची पाने वापरतात. प्ण चवीत फार फरक पडतो.
किती सुबक केलेत रोल्स !! मस्त
किती सुबक केलेत रोल्स !!
मस्त पाककृती
खाल्ले होते हे रोल्स इथल्या "चिकन टिक्का" मध्ये पण कसं केलं असेल हा प्रश्न होता........फार छान उत्तर मिळालं
छान! एवढ्या निगुतीने घरी केला
छान! एवढ्या निगुतीने घरी केला याचे कौतुक वाटले.
theshiksa.com/2011/10/12/vege
theshiksa.com/2011/10/12/vegetarian-stuffed-grape-leaves/
पदार्थ वेगळा आहे, दिसतोयही
पदार्थ वेगळा आहे, दिसतोयही छान. पण तुमची स्वतःची रेसिपी नाही. तेही ठिक. खाली श्रेय देऊ शकला असतात. पण फोटोही तुम्ही वर चिनूक्सने दिलेल्या लिंकवरुन जसेच्या तसे उचलले आहेत. त्याचा निषेध.
http://theshiksa.com/2011/10/
http://theshiksa.com/2011/10/12/vegetarian-stuffed-grape-leaves/
चिनूक्स +१
सायो +१
अरेरे ! बाकीच्या कृती/फोटो पण
अरेरे ! बाकीच्या कृती/फोटो पण असेच (चोरलेले) का ?
ज्यावेळेस सेरीज टाकाय्बद्दल
ज्यावेळेस सेरीज टाकाय्बद्दल विचारणा केली त्याच्वेळी "फोटो मस्ट" अशी डीमान्ड आली
त्याच्वेळचे माझे उत्तर वाचावे. खाली दिले आहे. आपण ते अजुन रेफर करु शकता. त्यावेळेसच ह्या कॉमेंट्स आल्या असत्या तर बरे झाले असते. असो ह्या सर्व डीशेस लगेच करुन त्याचे फोतो काढणे शक्य नसल्याने मी सेरीज बंद करत आहे. भावना दुखावल्याअ अस्ल्यास क्ष्मस्व!!
============
मैत्रैयी
Vote up!टाका की मग लवकर. फोटो मात्र मस्ट त्याशिवाय मज्जा नाही !
प्रतिसाद सर्वोत्तम उत्तर आबासाहेब. | 27 March, 2012 - 16:20
0Vote up!तर पहीली आहे बेगर चिकन... >>>>>>>>> येऊ द्या.
प्रतिसाद सर्वोत्तम उत्तर अविनाश जोशी | 27 March, 2012 - 16:30
0Vote up!बर!! मै / वै
कुठुन तरी शोधुन चित्र टाकतो
कुणी फोटो विचारले तर ते इथे
कुणी फोटो विचारले तर ते इथे जसेच्या तसे टाकण्यापेक्षा ब्लॉगची लिंक देऊ शकला असतात. लोकांचं इंप्रेशन काय झालं की ही रेसिपी तुमची स्वतःची आहेच आणि फोटोही तुमचे आहेत.
अॅडमिन तुम्हांला कॉपीराईट बद्दल काय ते सांगू शकतील.