कळलंच नाही

Submitted by रीया on 27 March, 2012 - 12:39

कळलंच नाही

भातुकलीचा खेळ खेळता खेळता
कधी मोठी झाले कळलंच नाही

तुझ्या पदराआड लपता लपता
डोईवर पदर ल्याले कळलंच नाही

तुझी अंगाई ऐकता ऐकता
मंगलाष्टके ऐकू आली कळलंच नाही

तुझा हात धरून कित्येकदा पार केलेल्या
वाटा कशा परक्या झाल्या कळलंच नाही

आधाराने तुझ्या जग जिंकले मी आई
आज विश्व माझे वसले कळलंच नाही

छायेतून तुझीया कधी बाहेर न आले
आज क्षितीज गवसले कळलंच नाही

गोष्टी ऐकता ऐकता राजकुमाराच्या
त्याची स्वप्ने मी पहिली कळलंच नाही

तुझी छोटीशी बछडी आता दूर निघाली
दुसर्‍याची ही झाली खरच कळलंच नाही

saptpadi by arati tai.jpg

छायाचित्र श्रेय : आरतीतै (अवल)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

प्रिया

कविता पद्यात आहे. प्रयत्न आश्वासक आहे. जो प्रसंग या कवितेत आहे तो तुला याहीपेक्षा छान रंगवता येईल. त्यासाठी त्या मुलीचा माहेर सोडतानाचा हुंदका तुझ्या गळ्यातही यायला हवा. तेव्हां ते भाव कवितेत येतील.

पुलेशु

काय गं?

ठरलं का?

उडली विकेट एकदाची

आता कवितांचा मारा कमी होईल

पाठवण करणारा दादा म्हणून लाडाने म्हंटले हो?

शुभेच्छा

मंगलाष्टके व अंगाई या उल्लेखांच्या ओळी अतिशय सुंदर आहेत Happy

आकृतीबंध आशयापुढे उभे राहायची हिम्मत करत नाही - हे विधान नंतर 'खुलासवेन' Happy

-'भूषण कटककर'!

युरी गागारीन ह्यांच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत.

रचनेत आईपासून वेगळे होण्यातला गहीवर/हुंदका दिसला नाही असे प्रामाणिकपणे म्हणावेसे वाटते.

प्रिया, आपल्यामध्ये बरेच काही सांगण्याचे पोटेन्शियल आहे असे मात्र वाटत रहाते.

आधी मित्र-मैत्रीण होतात ना ?
भलतेच विसराळू दोघेही..
>>>>
आम्ही आधीपासुनच ताई-दादा होतो.
तुच विसराळु आहेस.

युरी, उमेशजी : धन्यवाद. आणि माझं लग्न ठरलेलं नाहिये. सहजच सुचली म्हणुन लिहिली.

रचनेत आईपासून वेगळे होण्यातला गहीवर/हुंदका दिसला नाही असे प्रामाणिकपणे म्हणावेसे वाटते.
>>>
अनुभव नाहीये ना त्यामुळे असेल कदाचित.

प्रिया, आपल्यामध्ये बरेच काही सांगण्याचे पोटेन्शियल आहे असे मात्र वाटत रहाते.
>>
धन्यवाद

धन्स ग आर्यातै
मी लग्न झालेल्या एखाद्या स्त्रीच्या प्रतिक्रियेची वाटच पाहत होते
तिला त्या भावना जास्त माहित असणार ना Happy

छान आहे. भावना अगदी पोचल्या. Happy ते प्रचि पण अगदी समर्पक आहे. तु कविता लिहितेस त्या आई-बाबांना दाखवतेस का? ही तरी आईला दाखवु नकोस. 'द डे' च्या आधीच रडवशील तिला. Happy

धन्स मिलींद दादा
Happy

मने माझी आईच तर पहिली श्रोता असते माझ्या सगळ्या लिखाणाची
आणि झालं तीचं रडुन Happy
माझ्यासाठी ती सगळ्यात मोठ्ठी पावती होती बघ Happy
आणि प्रचिबद्द्ल म्हणशील तर क्रेडीट गोज टू आरतीतै Happy
धन्यु तुला Happy

छान! एकदम छान कविता!
आवडली! Happy

तांत्रिक चुका कवितेच्या आशयावर जोवर परिणाम करीत नाही तोवर त्यांचा विचार न केलेलाच बरा!

रच्याकने! अभिनंदन! Happy

Pages