शेकटाच्या शेंगांची भजी

Submitted by टोकूरिका on 27 March, 2012 - 00:04
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ शेकटाच्या(शेवग्याच्या) शेंगा.
एक वाटी बेसन
दोन चमचे तिखट
एक चमचा हळद
धणे-जिरे पूड
पाव वाटी गूळ
थोडी चिंच
थोडा ओवा,
चवीनुसार मीठ.
पाणी

रेसिपी बनवायच्या अर्धा तास आधी चिंच आणि गूळ पाण्यात भिजत ठेवावेत.

क्रमवार पाककृती: 

१. शेंगांच्या शिरा काढून त्यांचे बोटाएवढे तुकडे करून घ्यावेत. हे तुकडे+थोडं मीठ्+अर्धा चमचा हळद कुकरमध्ये टाकून एक शिट्टी काढून उकडून घ्यावेत.

२. शिट्टी येइपर्यंत कळसण तयार करावे. त्यासाठी बेसन, भिजवलेला गूळ आणि चिंच, मीठ, हळद, तिखट, धणे-जिरे पूड,ओवा आणि थोडे पाणी घालून भज्यासाठी जाडसर बॅटर तयार करावे. (हाताने लावता येईल इतपतच पाणी घालावे, खूप पातळ नको.) ५ मिनिटे मुरू द्यावे.

३. उकडलेल्या शेंगांच्या बिया काढाव्यात. त्यावर वरील बॅटर चोळून गरम तेलावर शॅलो फ्राय करावे.

आता गरम गरम भजी खायला सुरूवात करावी Proud
DSC00196_0.JPG

वाढणी/प्रमाण: 
४-५ जण
अधिक टिपा: 

१. ही भजी दोन पद्धतीने बनवता येतात. माझ्या माहेरी आम्ही नेहमी उकडलेल्या शेंगा नेहमीइतक्या पातळ बॅटरात बुडवून डीप फ्राय पण करायचो. वर दिलेली पद्धत माझ्या सासरची आहे. या पद्धतीने कुरकुरीत आणि खमंग होतात भजी. Happy

२. चिंच थोडी जास्त घातली तर मस्त आंबटगोड चव लागते. ही भजी कशाच्याही सोबत किंवा नुसतीच खा Happy

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वेगळीच पध्दत.. आंम्हाला फक्त डाळ, सांबार किवा भाजी करण्याचीच पध्दत माहित होती. बनवायला आवडेल.. Happy

धन्यवाद लोक्स Happy
दिनेशदा ह्या फोटोत शॅलो फ्राय केलेल्या शेंगाच आहेत. डीप फ्रायमधे शेंग दिसतच नाही, नुसतच आवरण दिसतं, बटाटा भज्यासारखं. Happy
मयु, भुंगेश Wink यू नेव्हर नो! Wink
व्हीमिनल तो मी चुकून चिकन ६५ चा फोटो टाकलेला Proud

छान.

आम्ही शेकटाच्य शेंगा चिंच गुळ घालून फोडणी देऊन करतो त्याही चविष्ट लागतात. भजी मी डायरेक्ट करते. वाफवत नाही. शॅलोफ्रायच करते. बेसन ऐवजी तांदळाच्या पिठाने अजून कुरकुरीत होते.

शेवग्याची शेंग माझा माझा अत्यंत नावडता प्रकार. Sad त्यामुळे शेवग्याच्या शेंगांची आमटी कधीच करत नाही. पण हा प्रकार चटपटीत वाटतोय. Happy नक्कीच करून पाहणार Happy

निंबे तुला शेवग्याची शेंग आवडत नाही? Uhoh (स्वगतः मला त बै खुप्प खुप्प आवडते)
नवर्‍याची पण फेवरेट्ट! त्यामुळे कुठलाही प्रकार असु देत, आमच्या घरी आम्ही पाव किलो शेंगा एका वेळेस फस्त करतो... Proud
धन्यवाद किशोर Happy
शेफू Happy