पनीर चिली शेजवान

Submitted by टोकूरिका on 26 March, 2012 - 01:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२०० ग्रॅम पनीर
४ मोठ्या सिमला मिरच्या उभ्या पातळ चिरून
४ हिरव्या मिरच्या दोन भाग करून मधे चीर दिलेल्या
१ मोठा कांदा उभा पातळ चिरून
जाडसर चिरलेला भरपूर लसूण
पाणी+ २ चमचे कॉर्नफ्लोर यांची पेस्ट.
३ चमचे तेल
मीठ चवीनुसार.
शेजवान सॉस ४ चमचे.
सोया सॉस १ चमचा

क्रमवार पाककृती: 

पनीरचे छोटे तुकडे करून तळून टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या व लसूण घालावा, लगेच कांदा घालून परतावा.
सिमला मिरची व मीठ घालून झाकण ठेवावे.
वाफ आल्यावर सिमला मिरची शिजते. आता शेजवान सॉस्+सोया सॉस्+पनीर घालून चांगले एकजीव करावे.
त्यात कॉर्नफ्लोर पेस्ट घालून हलवावे. गॅस बंद करावा.

खायला तयार झटपट पनीर चिली शेजवान. Happy

Paneer.JPG

वाढणी/प्रमाण: 
३ जण
माहितीचा स्रोत: 
चायनीज कॉर्नर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कधीही फोटो नाही टाकत........ ऑफिसमधून घरी जाताना वेगवेगळ्या हॉटेल्स्मधून रेसीपी लिहून घेते बहुतेक Proud

अरे हो हो! बघितली पाकृ की लागले लगेच फोटो फोटो करायला. हावरट खादाड कुठचे! Proud
चिऊ प्रतिसादाला प्रचि ची तमा नसावी असे थोर संत म्हणून गेले. Wink
भुंग्या टवळ्या चिकन ६५ चा फोटू पाहिला नैस का?
दिनेशदा फोटो अनिवार्य आहे, आणि म्हणूनच मी तो टाकणारही आहे, पण उद्या.
अवलतै केव्हाही ये गं, कल्याण आपलाच आंसा... Happy
लाजो , अनु फोटो टाकते ग उद्याच...नक्कीच्या नक्की Happy

आला आला... फोटो आला Happy

मस्त Happy

मोबाईलने काढलायस का? थोडा ब्लर वाटतोय.. की तिखट चिलीमुळे माझ्या डोळ्यात पाणी आलय???? Uhoh

मोबाईलने काढलायस का? थोडा ब्लर वाटतोय.. की तिखट चिलीमुळे माझ्या डोळ्यात पाणी आलय???? >>
लाजो Proud

टोके, रेसिपी इतनी बढिया और फोटु इतना धुंदला. ये बात (पाककृती) कुछ हजम नही हुइ Wink

नेडु पनीर च्या जागी चिकन घातल कि चिकन चिल्ली पण तॅयार Happy
चिकन चे नाव कढताच पाणी सुटले तोंडाला Sad
छान ..
मि करेल आता चिकन चिली Lol

टोक्स.... गुड वन... Happy

फायनली..... व्हेज रेसिपी लिहिलीस.... Proud

निंबे सेलवरून काढला ग
>>>>>>>>>>>

फोटो धूसर आहे..... टोकूला सिनेमाची तिकिट्म पण स्कॅन करून पाठवा...... ती पण धूसर Proud Rofl