गुढी पाडवा व आपल्या नवीन वर्षाचे संकल्प

Submitted by मंदार-जोशी on 22 March, 2012 - 02:02

उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा. आपल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातला पहिला दिवस, नवीन वर्षाची सुरवात.
म्हणजेच उद्या गुढी पाडवा. सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.

23-March-padwa.jpg23-March-padwakalnirnay.JPG

उद्या डॉ. हेगडेवार जयंती तसेच जागतिक हवामान दिन सुद्धा आहे. तर आपल्या नवीन वर्षात आपण कोणते संकल्प करणार आहोत?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मी १ जानेवारीला (म्हणजे जोशी यांच्यानुसार खिस्ती नववर्षाला) संकल्प सोडला आहे.

माझ्या अनुसार नव्हे. ते खिस्ती नववर्षच आहे. Happy
आपले आजपासून सुरू होते.

हो पण अट्टाहासाने सांगणारा तूच म्हणून...
माझ्यासाठी काय सगळी नववर्षे आपलीच आहेत...ख्रिस्ति काय, हिंदू काय, हिंदू व्यापार्यांचे काय....नविन वर्षे सुरु होतय ना..त्यात कसला आपरभाव करायचा...हे आमचे नाही...ते त्यांचे...कैच्याकै

तेच माझे म्हणणे आहे.. एवढे अट्टाहासाने ते ख्रिस्ती आहे असे कशाला सांगायचे...नविन वर्षे नुसते नविन वर्ष असूच शकत नाही का..
ख्रिस्ती नववर्षाच्या शुभेच्छा, हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा, पारशी नववर्षाच्या शुभेच्छा अजून कुणाच्या काही असतील तर त्या...च्यायला नुसत्या शुभेच्छा देताना त्यात पण पुन्हा वर्गवारी

सकल जनांना गुढी पाडव्याच्या नव वर्षाच्या शुभेच्छा!

आणि हो येऊ घातलेल्या नव्या अर्थिक नव वर्षाच्या देखिल शुभेच्छा!!

भोका भोकांनी बनलेल्या मंदारची सर्व भोके या ना त्या प्रकाराने भरली जावोत ही शुभेच्छा!
कठीण आहे इतकी भोके भरायची म्हणजे..

छान धागा.
नवीन मराठी वर्षाच्या आणि नव्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा !

तसेच आजच्या दिवशी (एक एप्रिल ) आद्य सरसंघचालक यांना त्यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

गुढीपाडव्यालाही संकल्प करू शकतो का? मला वाटलेले new year resolution वगैरे हे फॅड ब्रिटींशाचेच आहे, म्हणून ते एक जानेवारीलाच करायचे.

फॅड प्रत्येकाचे काही ना काही असतेच. फक्त फरक ईतकाच की प्रत्येकाची वेगवेगळी असतात.
उदाहरणार्थ केक कापून वाढदिवस करायचे फॅड ब्रिटीशांचे. आपण ते अंगीकारले म्हणून आपण आपला वाढदिवस ख्रिस्ती कॅलेंडरनुसार साजरा करतो.

"उदाहरणार्थ केक कापून वाढदिवस करायचे फॅड ब्रिटीशांचे. आपण ते अंगीकारले म्हणून आपण आपला वाढदिवस ख्रिस्ती कॅलेंडरनुसार साजरा करतो." - मला हे अदर वे अराऊंड वाटत होतं. Wink केक कापण्याची पद्धत स्वीकारली म्हणून ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारलं हे लॉजिक अजब आहे. Happy

फेरफटका हे आधी कोंबडे की आधी अंडे या सारखे आधी केक की आधी कॅलेंडर असे आहे..
ब्रिटीश आपल्या देशात केक आणि कॅलेंडर दोन्ही एकाच वेळी घेऊन आले. आपण त्यातले पहिले काय स्विकारले हे तर तेव्हाचा कोणी आता जिवित असेल तर तोच सांगू शकतो. ज्याची शक्यता फार कमी आहे.

रुन्मेषभौ संकल्प करायला कसला आलाय दिवास >>>>>> हे ही खरेय,. माझे बरेच संकल्प मी रात्रीच केले आहेत. संकल्प कश्याला, माझे सत्तर टक्के धागेही रात्रीच काढले जातात.

गुढी पाडव्याला हिंदु नववर्ष का म्हणतात बरे?? मी मराठी लोकांव्यतिरीक्त कुणालाच गुढी पाडवा साजरा करताना पाहिलेलं नाही. शोभायात्रेमधे देखिल मराठी तरुण्/तरुणी दिसतात. मंदार-जोशी मायबोलीवर नसावेत पण इतर कुणि या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल कां?

हो ना, दिवाळी पाडव्याला पण कुणी व्यापाऱ्यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नाहीत.
मुळात आपण एका वर्षात किती नवीन वर्षांचे स्वागत करतो ही संशोधनाची गोष्ट आहे.

आणि मंजो माबोवर नसतील अशा भ्रमात राहू नका. ती व्यक्ती नाही प्रवृत्ती आहे, ते कुठल्या ना कुठल्या अवतारात असतीलच.

Pages